शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रात्रीच्या अंधारात पाकिस्तानचा भारतीय चौक्यांवर गोळीबार; ऑपरेशन सिंदूर पुन्हा सुरु होणार?
2
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
3
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
6
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
7
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
8
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
9
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
10
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
11
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
12
"तुमची सेवा करणं हे सरकारचं प्राधान्य"; मुख्यमंत्र्यांसमोर लोकांनी मांडल्या समस्या
13
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
14
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
15
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
16
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
17
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
18
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
19
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
20
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स

विशेष लेख: महाराणी ताराबाईंच्या जीवनकार्याची संघर्षकथा

By वसंत भोसले | Updated: January 24, 2025 10:05 IST

Jaisingrao Pawar: ख्यातनाम इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी लिहिलेल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने...

- वसंत भोसले(संपादक, लोकमत कोल्हापूर)हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूनबाई आणि ज्यांनी मोगलशाही विरोधात एक हाती सात वर्षे संघर्ष केला, शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण केले, अशा स्वराज्य सौदामिनी महाराणी ताराबाई यांचे पहिले समग्र चरित्र आज (शुक्रवार, दिनांक २४ जानेवारी) प्रसिद्ध होत आहे.  ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.  जयसिंगराव पवार यांनी अनेक वर्षांच्या संशोधनातून सिद्ध केलेला हा ग्रंथ एक नवीन दृष्टी देऊन जातो. 

महाराणी ताराबाई म्हणजे करवीर संस्थानच्या संस्थापिका. त्यांनी केलेला संघर्ष, मोगलशाहीविरुद्ध दिलेली झुंज आणि छत्रपती घराण्यामध्ये दुही माजल्यानंतर त्यांनी दिलेला लढा  खूप महत्त्वाचा आहे. १६८० मध्ये महाराजांचे निधन झाल्यानंतर आणि औरंगजेब महाराष्ट्रावर चाल करून आल्यानंतर त्याच्या निधनापर्यंत सव्वीस वर्षे जो संघर्ष मराठ्यांनी केला, त्यातील तीन ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांचा समग्र इतिहास समोर यायला हवा होता. त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज यांच्या संघर्षाचा इतिहास विविध अंगाने मांडण्यात आलेला आहे.  छत्रपती राजाराम महाराज यांच्याविषयी कमी-अधिक प्रमाणात इतिहासाने नोंद घेतलेली आहे. या कालखंडात शिवरायांच्या स्वप्नातील स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या महाराणी ताराबाई यांच्यावर मात्र इतिहासकारांनी अन्याय केला. महाराणी ताराबाईंचा हा संघर्ष डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात दोन खंडांमध्ये मांडला आहे. 

छत्रपती राजाराम महाराज यांच्या निधनानंतर १७०७ मध्ये औरंगजेबचे निधन होईपर्यंत मोगलांच्या विरोधात ताराराणी यांनी अविरत संघर्ष केला.  औरंगजेबाच्या  निधनानंतर मोगलांनी उत्तरेकडे परतण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र शाहूराजे आणि येसूबाई यांची सुटका झाली आणि छत्रपती घराण्याच्या गादीच्या वारशावरून संघर्ष सुरू झाला. ताराराणी या (विधवा) स्त्रीने छत्रपती घराण्याचा वारसा पुरुष हक्काप्रमाणे शाहूराजे यांच्याकडे सोपवून मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहायला हवे होते, असाच सूर अनेक इतिहासकारांनी आजवर लावला होता. महाराणी ताराबाई यांनी मराठेशाही टिकविण्यासाठी,  मोगलांचे अतिक्रमण परतवून लावण्यासाठी दिलेल्या संघर्षाकडे इतिहासाने तसे दुर्लक्षच केले. डॉ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या पाच दशकांच्या इतिहास संशोधनाच्या कार्यकाळात सातत्याने महाराणी ताराबाई यांच्या जीवनाचा आणि संघर्षाचा वेध घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या अटकेनंतर छत्रपती राजाराम महाराज यांना जिंजी किल्ल्यावर संरक्षणार्थ आश्रय घ्यावा लागला. त्या काळात हिंदवी स्वराज्य नेतृत्वहीन झाले होते, असा निष्कर्ष काढून इतिहासकारांनी महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिलेल्या लढ्याकडे साफ दुर्लक्ष केले. छत्रपतींच्या गादीवर शाहूराजे यांनी हक्क सांगितला तेव्हा शाहूराजे यांच्या विरोधात महाराणी ताराबाई यांनी दुसरा लढा केला. शाहूराजे यांना हाताशी धरून पेशवाई पुढे आली आणि सातारची राजधानी पुण्याला स्थलांतरित झाली. मराठ्यांचे स्वराज्याचे तात्त्विक अधिष्ठान जपले पाहिजे, यासाठी पेशव्यांच्या विरोधातदेखील संघर्ष करण्यासाठी महाराणी ताराबाई  प्रयत्नशील राहिल्या. असे संघर्षमय जीवन जगणारी ही लढवय्यी स्त्री इतिहासाच्या पानांमध्ये दुर्लक्षितच राहिली.  

डॉ. जयसिंगराव पवार यांनी या चरित्र ग्रंथाचे दोन खंडांमध्ये वर्गीकरण केले आहे. महाराणी ताराराणी यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासून ते औरंगजेबच्या विरोधात केलेल्या संघर्षापर्यंतचा पहिला खंड आहे. शाहू राजे यांची सुटका आणि महाराणी ताराबाई यांचा संघर्ष हे सारे दुसऱ्या  खंडात येते. ‘शिवछत्रपतींच्या राजनीतीचे पुरस्कर्ते कोण?- महाराणी ताराबाई की शाहूराजे?’-  याचा शोध डॉ. पवार यांनी या चरित्रामध्ये घेतला आहे.  शिवछत्रपतींनी पाहिलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेसाठी अखेरपर्यंत लढत राहिलेल्या एका रणरागिणीचा हा इतिहास नव्या स्वरूपात समोर येतो आहे. त्याचे स्वागत केले पाहिजे.     vasant.bhosale@lokmat.com

 

टॅग्स :marathaमराठाhistoryइतिहासMaharashtraमहाराष्ट्र