शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

लेख: कुत्र्यांचे चावे सवयीचे, पण अलीकडे मांजरीही माणसांना चावतायत, असं का बरं होतंय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 09:37 IST

वाघाच्या मावशीच्या नखांचे ओरखडे, चावे आणि नवे प्रश्न

डॉ. सुनील देशपांडे, श्वान-मार्जार आरोग्यतज्ज्ञ

अगदी रुबाबदार, स्वॅग, स्टाइल असणाऱ्या ज्या प्राण्याला आपण ‘वाघाची मावशी’ म्हणतो, ती ‘फेलिस कॅट्स’, असे शास्त्रीय नाव मिरवणारी मांजरे मनुष्यप्राण्यांना चावत असल्याच्या बातम्या अलीकडे मोठ्या प्रमाणावर दिसतात. हे प्रकरण गंभीर प्रकरण बनल्यास सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतात. ही जोखीम कमी करण्यासाठी आपण काय करू शकतो?

मांजरीच्या लाळेमध्ये असणाऱ्या बार्टोनेला हेन्सेले नावाच्या जिवाणूमुळे ‘कॅट स्क्रॅच डिसीज’ हा ‘मांजर स्क्रॅच रोग’ होतो. हे जिवाणू महाशय मांजर चावल्यावर त्या व्यक्तीच्या/प्राण्याच्या शरीरात प्रवेश करून आपले कारनामे सुरू करतात. या आजारात ताप, डोकेदुखी, चाव्याची जखम असणाऱ्या त्वचेवर लाल फोड येणे, लसिका ग्रंथी उपाख्य लिम्फ नोड्स सुजणे, फ्लूसारखी लक्षणे, भूक न लागणे, ताप, थकवा आणि अस्वस्थता, अशी लक्षणे दिसू शकतात. साधारणपणे आजार स्वतःहून बरा होतो. काही वेळेला प्रतिजैविकांची आवश्यकता भासू शकते. जर चाव्याची जखम खोल असेल, तर संक्रमित जीवाणू आसपासच्या ऊतींमध्ये पसरून सेल्युलाइटिस हे पेशींचे दुखणे निर्माण होते. जिवाणू रक्ताद्वारे शरीराच्या इतर भागांतही आपले हात-पाय पसरू शकतात, ज्यामुळे रक्त विषबाधा नावाची भयंकर स्थिती उद्भवते. प्राण्यांमधला कुप्रसिद्ध विषाणूजन्य आजार म्हणजे रेबीज. मांजरीला संसर्ग झालेला असल्यास, त्या मांजरीच्या चाव्याद्वारे किंवा ओरखड्यांद्वारे रेबीज पसरू शकतो. विशेषतः लहान मांजरीचा चावा दुर्लक्षित करू नये.

मांजरीच्या ओरखड्यांमुळे होणारी दुखापत तीव्र असते, कारण अत्यंत तीक्ष्ण, वाकडी नखे त्वचेत खोलवर जातात आणि जखमेच्या खोलवर जीवाणू-विषाणू टोचतात, तिथे ते विसावतात, वाढतात आणि मग ते त्यांची कुकर्मे सुरू करतात. धनुर्वात हा गंभीर आजारसुद्धा मांजरीच्या चावण्यामुळे किंवा ओरखडण्यामुळे होऊ शकतो. क्लॉस्ट्रीडीयम टिटॅनी नावाचा जिवाणू चाव्याच्या ठिकाणी खोल भागात रुजून, वाढून स्नायूंना ताठरता, सूज आणि कडकपणा आणतो.

मांजरांना धोका, भीती किंवा चिंता वाटते, तेव्हा ती चावतात अगर ओरखडे काढतात. दुसरे कारण म्हणजे ‘टेरिटोरियल बिहेवियर’. मांजरी खाजवून, ओरखडे मारून किंवा चावून त्यांच्या प्रदेशाचे रक्षण करू शकतात. ‘यह हमारा इलाका हैं’ हे इतर मांजरांना/बोक्यांना दाखवण्यासाठी हे केले जाते. मांजरींना असणारी वेदना किंवा अस्वस्थता आणि खेळतानाची आक्रमकता हेही या मार्जार हल्ल्यामागचे कारण असते. संधिवात, दातांचे आजार किंवा हायपरथायरॉईडीझम असलेल्या मांजरी अधिक चिडचिड्या आणि आक्रमक होऊन ओरखडतात किंवा चावतात. फार काळ बंदिस्त ठेवल्याने, चिडचिड होऊनही असे होते. आता हे मार्जार कुळातून होणारे हल्ले होऊच नयेत, यासाठी काय करावे ? आपल्या मांजरीची किंवा बोक्याची नसबंदी शस्त्रक्रिया केल्याने त्यांच्यातील आक्रमकता आणि प्रादेशिक वर्तन कमी होऊ शकते. आपल्या मांजरांसाठी सुरक्षित वातावरण बहाल करायला हवे. त्यांची राहण्याची जागा सुरक्षित, आरामदायी आणि धोक्यांपासून मुक्त असल्याची खात्री करायला हवी. मांजरींना हळूवारपणे, काळजीपूर्वक आणि त्यांच्या देहबोलीकडे लक्ष देऊन हाताळायला हवे. मांजरांची नियमित लसीकरणे केल्याने त्यांना जीवघेण्या आजारांशी दोन हात करता येतात.

मांजरीने ओरखडे किंवा चावल्यानंतर जखम ताबडतोब साबणाने आणि पाण्याने धुवायला हवी. रक्तस्त्राव झाला असल्यास शक्यतो अँटी-रेबीज लस घ्यावी. मागील पाच वर्षांत धनुर्वाताचे इंजेक्शन घेतले नसल्यास तेही घ्यावे. ओरखडे किंवा चावल्यानंतर ताप, सूज किंवा लालसरपणा यांसारखी लक्षणे दिसली, तर त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी. मांजरींशी सुरक्षितपणे संवाद कसा साधावा हे मुलांना शिकवायला हवे. सौम्यपणे हाताळणे आणि अचानक हालचाली टाळणे याचे भान ठेवायला हवे.

drsunildeshpande@gmail.com

टॅग्स :dogकुत्राAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार