शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

...आता कुणीही भारताला थांबवू शकत नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 07:48 IST

‘मेक इन इंडिया’ची दशकपूर्ती हा भारताच्या वाटचालीतला महत्त्वाचा टप्पा आहे. सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेणारे चैतन्य देशात निर्माण झाले आहे!

नरेंद्र मोदीपंतप्रधान

मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्षे पूर्ण झाली. या उपक्रमाला घवघवीत यश मिळवून देणाऱ्या प्रत्येकाला सलाम करण्याचा हा प्रसंग आहे. हे अथक परिश्रमाचे  सामूहिक अभियान आहे, ज्याने एका स्वप्नाचे एका शक्तिशाली चळवळीत रूपांतर केले आहे.

मेक इन इंडिया’च्या प्रभावातून हेच सिद्ध होते की, आता भारताला कुणीही थांबवू शकत नाही. भारत केवळ आयातदार नाही, तर निर्यातदारदेखील आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादन क्षेत्रात भारताच्या प्रगतीला चालना देणे  या एका महत्त्वाकांक्षी उद्देशाने दहा वर्षांपूर्वी  हा प्रयत्न सुरू झाला. एकशे चाळीस कोटी भारतीयांच्या सामर्थ्य आणि कौशल्याने  आपल्याला दूरचा पल्ला गाठून दिला  आहे. ‘मेक इन इंडिया’चा ठसा सर्व क्षेत्रांमध्ये दिसू लागला आहे. मी एक-दोन उदाहरणे देतो..

मोबाइल निर्मिती. २०१४ मध्ये संपूर्ण देशात मोबाइल निर्मिती करणारे केवळ दोन कारखाने होते. आज हा आकडा २०० हून अधिक झाला आहे. आपली  मोबाइल निर्यात अवघ्या  १,५५६ कोटींवरून तब्बल १.२ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. ही वाढ ७५००% इतकी अवाढव्य आहे! आज भारतात वापरले जाणारे ९९% मोबाइल फोन ‘मेड इन इंडिया’ आहेत. जागतिक स्तरावर आपण दुसऱ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे मोबाइल उत्पादक बनलो आहोत. त्याचबरोबर भारत पूर्णतः प्रक्रिया केलेल्या पोलादाचा निर्यातदार बनला आहे. २०१४ पासून उत्पादनात ५०% पेक्षा जास्तीची वाढ झाली आहे. सेमी कंडक्टर उत्पादन क्षेत्राने १.५ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक आकर्षित केली असून, दररोज एकत्रितपणे ७ कोटी चिप्सचे उत्पादन घेण्याची क्षमता असलेल्या पाच प्रकल्पांनाही मंजुरी देण्यात आली आहे. नवीकरणीय ऊर्जेच्या बाबतीत आपण जागतिक पातळीवर चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे उत्पादक ठरलो आहोत. एका दशकात आपली क्षमता ४०० टक्क्यांनी वाढली आहे. आपले इलेक्ट्रिक वाहन उद्योग क्षेत्र, जे खरे तर २०१४ मध्ये अस्तित्वातच नव्हते, ते आता ३ अब्ज डॉलर्स मूल्याचे झाले आहे. संरक्षण उत्पादनांची निर्यातही १,००० कोटी रुपयांवरून वाढून २१,००० कोटी रुपयांवर पोहोचली आहे आणि आपण ८५ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करू लागलो आहोत.

खेळणी उद्योग क्षेत्राची गरज मी उपस्थित करताच, ही बाब प्रत्यक्षात कशी साकारावी हे भारतीय नागरिकांनीच सरकारला दाखवून दिले! गेल्या काही वर्षांत या क्षेत्रातली आपली निर्यात २३९ टक्क्यांनी वाढली असल्याचे आणि त्याच वेळी आयातीत निम्म्याने घट झाली. यामुळे खेळणी उद्योगातल्या स्थानिक उत्पादकांना आणि विक्रेत्यांना लाभ झाला आहे, लहान मुलांना तर निश्चितच झाला आहे! 

आपल्या देशाची ओळख बनलेल्या अनेक बाबींपैकी असलेल्या मुख्य बाबी म्हणजे आपली ‘वंदे भारत’ रेल्वेगाडी, ब्राम्होस क्षेपणास्त्रे आणि आपल्या हातात असलेले मोबाइल फोन. या सगळ्यांवर आता अभिमानाचा ‘मेक इन इंडिया’चा शिक्का लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्सपासून ते अंतराळ क्षेत्रापर्यंतचे हे यश भारतीय कल्पकता आणि गुणवत्तेची साक्ष देणारेच आहे.

‘मेक इन इंडिया’ या उपक्रमामुळे  गरिबांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आणि आकांक्षा बाळगण्याचे बळ मिळाले आहे. या उपक्रमाने त्यांना ते  साधनसंपत्तीचे निर्माते बनू शकतात हा आत्मविश्वास दिला आहे. या उपक्रमाचा सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगक्षेत्रावर पडलेला प्रभावही तितकाच दखल घेण्याजोगा आहे. सरकार म्हणून आम्ही हे चैतन्य अधिक ऊर्जस्वल करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आमची दशकभरातील कामगिरी पुरेशी बोलकी आहे. उत्पादनाशी संलग्न प्रोत्साहन- पीएलआय योजना परिवर्तनक्षम ठरल्या आहेत. त्यांनी हजारो, करोडोंची गुंतवणूक शक्य केली असून लाखो नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. व्यवसाय करण्यात सुलभता आणण्याच्या बाबतीतही सरकारने लक्षणीय पावले टाकली आहेत.

भारताला अनुकूल असे बरेच काही आज घडते आहे- लोकशाही, लोकसंख्या आणि मागणी या तीन महत्त्वाच्या सूत्रांचे आपला देश हे परिपूर्ण मिश्रण आहे. जागतिक पुरवठा साखळीमध्ये कळीची भूमिका बजावण्यासाठी आवश्यक त्या सर्व कळीच्या गोष्टी आपल्याकडे आहेत.  व्यवसायातील विश्वासार्ह भागीदार म्हणून भारताकडे पाहिले जात आहे. आपल्या अभूतपूर्व युवाशक्तीचे यश स्टार्टअप जगतात प्रत्येकाला पाहता येत आहे. एकूणच, गती भारताला अनुकूल आहे. जागतिक ‘महासाथी’सारखी अनपेक्षित आव्हाने येऊनही भारताच्या वाढीची वाटचाल सातत्यपूर्ण राहिली. आज, आमच्याकडे जागतिक वाढीचा प्रेरक म्हणून पाहिले जात आहे. 

मी माझ्या युवा मित्रांना पुढे येण्याचे, ‘मेक इन इंडिया’त सहभागी होऊन हा उपक्रम नव्या उंचीवर नेण्याचे आवाहन करतो. सर्वोत्कृष्टतेसाठी सर्वांनीच प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. दर्जेदार पुरवठ्यासाठी आपण वचनबद्ध राहिले पाहिजे. शून्य त्रुटी हा आपला मंत्र असला पाहिजे. 

टॅग्स :Make In Indiaमेक इन इंडियाNarendra Modiनरेंद्र मोदी