शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

विशेष लेख: भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥

By विश्वास मोरे | Updated: June 18, 2024 08:45 IST

आषाढी वारीसाठी शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत.

डॉ. विश्वास मोरे, मुख्य उपसंपादक, लोकमत, पुणे

महाराष्ट्राचे सांस्कृतिक, आध्यात्मिक वैभव म्हणजेच वारी. वारीला आध्यात्मिक, धार्मिक संदर्भ आहेत, तसेच ही वारी संसाराच्या फेऱ्यात गुरफटलेल्यांसाठी स्वानंदाची, स्वयंपूर्णतेची अनुभूती देणारीही ठरते. आषाढी वारी तोंडावर आली आहे, तर शासनाने दिंड्यांना २० हजार रुपये अनुदानाची घोषणा केली आहे. त्यावरून वारकरी संप्रदायात मत-मतांतरे सुरू झाली आहेत. शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या देवस्थानांनी याबाबत सावध भूमिका घेतली आहे. कुणाचीही मदत न घेता वारीची वाट चालणाऱ्या संतांच्या पायिकांनी विरोध दर्शविला आहे. 'मुख्यमंत्री साहेब, दिंड्यांना अनुदान नको, सेवासुविधांचे सक्षमीकरण करा', असा सूर आळवला जात आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानदेव माउलींपासून संतश्रेष्ठ तुकोबारायांपर्यंतच्या सकल वारकरी संतांनी आषाढी वारीचे महत्त्व विशद केले आहे. 'बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव', या संतश्रेष्ठ तुकोबारायांच्या वचनांची अनुभूती वारीत गेल्याशिवाय मिळणार नाही. देहू, आळंदीहून निघणारा हा भक्तीचा प्रवाह जीवन आणि जगण्याचे भान देतो. वास्तविक वारीत कोणतीही दिंडी कोणाचीही मदत न घेता वारीची वाट चालते. ती स्वयंपूर्ण असते. स्वयंपूर्णता ही वारकऱ्यांची जीवननिष्ठा आहे. कोणीही मागणी केली नसताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी घोषणा केली आहे. ती म्हणजे दिंड्यांना वीस हजार रुपये अनुदान देण्याची. त्यावरून नवा वाद सुरू झाला आहे. देहू-आळंदी देवस्थानच्या आजी माजी पदाधिकाऱ्यांत मत-मतांतरे सुरू झाली आहेत. खरे तर, शासनास मदतच करायची झाल्यास पालखी तळ जागा, तेथील सुविधांवर लक्ष केंद्रित करायला हवे. आध्यात्मिक सोहळ्याचे स्वरूप आता जगण्याचे भान देत आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी...' असे संतांचे वचन कृतीत आणण्याची गरज आहे. आळंदी देवस्थानाचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांच्या मते, वारीच्या मार्गावर वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची मोहीम, पर्यावरणाची वारी करण्याची गरज आहे. 'निर्मलवारी' संकल्पनेतून स्वच्छतेला बळ द्यावे, वैद्यकीय सुविधा सक्षम कराव्यात. सेवासुविधांचे सक्षमीकरण करावे. अनुदानाबाबत दोन मते आहेत. सर्व मतांचा विचार व्हावा.

देहू देवस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांच्या मते, 'संतांच्या वारी सोहळ्यास वळ देण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे, ही चांगली वाव आहे. आम्ही निर्णयाचे स्वागत करतो.' संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज प्रशांत महाराज मोरे यांनी अनुदानाला कडाडून विरोध दर्शविला आहे. ते म्हणाले, 'भिक्षा पात्र अवलंबणे। जळो जिणे लाजिरवाणे॥' शासनाच्या वीस हजार रुपयांच्या मदतीवर वारी म्हणजे, वारी या भक्तिरसपूर्ण शब्दावर आणि परंपरेवरच आघात आहे. यामुळे निष्काम वारीपासून दिंडी आणि वारकरी दुरावणार आहे. पंढरीची वारी ही एक साथना आणि व्रत आहे. त्यामुळे पंढरीची वारी आहे माझे घरी; पण ती शासनाच्या वीस हजारी उपकारावर, अशी लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होणार आहे. स्वकमाईतून दिंडीला पाचशे ते काही हजार त्या वारकऱ्यांकडून भिशी दिली जाते. अनेक ठिकाणी दिंड्यांच्या पंगती ठरलेल्या असतात. अनेक ठिकाणी अन्नदात्यांकडून अन्नदान केले जाते. त्यामुळे पंढरीच्या वारकऱ्यांना या मदतीची आवश्यकता नाही. तो निधी सरकारने वारीच्या वाटेवर सोयी-सुविधांसाठी किंवा इतर मदतीसाठी खर्च करावा, खऱ्या आचार, विचार आणि उच्चार करणाऱ्या पंढरीच्या वारकऱ्यांनी ही मदत स्वीकारू नये किंवा शासनाने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.' छत्रपती शिवरायांनी पाठवलेला नजराणा तुकोबारायांनी स्पर्श न करता परत पाठवला होता आणि 'तुमचे येर वित्त धन। ते मज मृत्तिकेसमान॥' असा त्या धनाचा माती म्हणून उल्लेख केला होता. त्यामुळे खरा वारकरी किंवा दिंडीप्रमुख अशी शासनाकडे कोणतीही मागणी करणार नाही. वारीसाठी शासन दरवर्षी खर्च करण्याचे ढोल बडवीत असले तरी प्रत्यक्षात आजही मार्गावर वारकऱ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तोकडे अनुदान देण्यापेक्षा आध्यात्मिक सुख देणाऱ्या वारीतील सुविधांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरPandharpur Wariपंढरपूर वारी