शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

विशेष लेख | अधूनमधून : चला, केबिन तोडू, नवे सोफे आणू, सगळे चकाचक करू!

By अतुल कुलकर्णी | Updated: January 5, 2025 07:09 IST

काहीजण कसे उत्साहाने कामाला लागले आहेत ते बघा. त्यांनी आपल्या मंत्री कार्यालयाची रचना बदलण्याचेही काम सुरू केले आहे.

अतुल कुलकर्णी, संपादक, मुंबई

आपण मंत्री झालात. आपल्याला आवडी-निवडीचे खाते मिळाले. झाले गेले गंगेला मिळाले... आता आपण लवकरात लवकर मंत्रिपदाचा पदभार घ्या. काही जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण काम सुरू केले नाही. विरोधक त्यावरून तुमच्यावर टीकेचे बाण सोडत आहेत. पण, तुम्ही चिंता करू नका. विरोधकांचे काम टीका करण्याचेच असते. आपण मंत्री होताच नागपूरचे अधिवेशन सुरू झाले. अधिवेशनात मंत्री म्हणून काय करावे लागते, याचा अनुभव मिळावा, म्हणून आपण सगळे आठवडाभर बिन खात्याचे मंत्री राहिलात. केवढा हा त्याग. आपल्यावर थेट कुठलीही जबाबदारी आली नाही. तरीही, आपण कोणत्याही विभागाच्या, कुठल्याही प्रश्नावर सभागृहात उत्तरे दिली. त्यानंतर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाने सात दिवसांचा दुखावटा जाहीर झाला. या काळात कोणी मंत्रिपद स्वीकारते का ? आपली दुःख विरोधकांना काय माहिती ? 

हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे?हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे!

आपल्याला काय करायचे होते?, आपण काय केले?, कशाची अपेक्षा होती?, काय मिळाले? याची आपल्यालाच टोटल लागत नाहीय. त्यात हे विरोधक टीका करत आहेत. पण, तुम्ही लक्ष देऊ नका. अजूनही प्रयत्न करा. एखादे खाते बदलून मिळू शकते का ते बघा. त्यासाठी देवाभाऊंचा धावा करा. तुमच्या जुन्या आठवणींचा संदर्भ द्या. देवाभाऊ पावले, तर चांगलेच आहे. नाही तर राग ठेवू नका, देवाभाऊ के पास देर हैं अंधेर नहीं. मी पुन्हा येईन, असे ते म्हणाले होते. आले ना परत. एकदा त्यांनी शब्द दिला, तर ते नक्की मदत करतील. त्यांच्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला दुसरा कुठला पर्याय आहे का?

काहीजण कसे उत्साहाने कामाला लागले आहेत ते बघा. त्यांनी आपल्या मंत्री कार्यालयाची रचना बदलण्याचेही काम सुरू केले आहे. त्यासाठीच मंत्रालयात काही वास्तुतज्ज्ञ फिरत आहेत. या बाजूने खुर्ची ठेवा. त्या बाजूने व्हिझिटर्स बसवा. या बाजूला पत्रकारांना बसवा, म्हणजे आपल्या विरोधात बातम्या येणार नाहीत. अशा सूचना ते देत असल्याची माहिती आहे. बांधकाम विभागाचे काही अधिकारी या वास्तुतज्ज्ञांना घेऊन येतात, अशी माहिती आहे. कोणत्या पद्धतीचे फर्निचर केले, म्हणजे मंत्री कार्यालय लाभदायक होईल, यासाठी ते दोघे अभ्यास करून सगळा रिपोर्ट देतील. त्यावर विश्वास ठेवा. त्यांनी सांगितलेल्या बिलावर चुपचाप सही करून टाका. तसेही ते पैसे तुमच्या खिशातून जाणार नाहीत.

जुन्या सोफ्यांना, नवीन कापड लावले की सोफे नवीन दिसतात. जुन्या खुर्च्यांना पॉलिश केले, कापड बदलले की, खुर्च्या नवीन दिसतात. मात्र, जुन्याच फर्निचरला नवीन केले आणि नव्याचे बिल लावले, असे विरोधक बोलतील. त्याकडे लक्ष देऊ नका. बांधकाम विभागाचे अधिकारी आणि विरोधक काय ते बघून घेतील. तुम्ही त्यात पडू नका. तुम्हाला जो पीए, पीएस हवा आहे, त्याचे नाव मुख्यमंत्र्यांकडे पाठवताना सगळ्यात शेवटी ठेवा. पहिलेच नाव ठेवले, तर ते नाकारले जाण्याची शक्यता असते. चुकून मुख्यमंत्री कार्यालयाने आपल्याला हव्या असणाऱ्या पीएसबद्दल विचारले, तर पटकन चांगले मत देऊ नका. नाहीतर तिकडून चटकन त्याचे नाव कट होईल. सगळा स्टाफ बदलला, म्हणून विरोधक नावे ठेवतील. कोणत्याही मंत्री कार्यालयाला इन्स्टिट्यूशनल मेमरी असते. तेथे काम करणाऱ्या ऑपरेटरला, शिपायाला तेथे येणारे पत्रकार, अधिकारी, नेते, बिल्डर माहिती असतात. त्यामुळे त्यांना बदलू नका, असे काहीजण सल्ले देतील. त्यांचे ऐकू नका. तुम्ही कोणाशी काय बोलता?, काय करता? ही माहिती त्यांनी विरोधकांना दिली, तर आपली पंचायत होईल. सगळे नवीन असले की, काही चुकले तरी नव्या माणसाच्या नावाने बिल फाडता येते किंवा मुद्दाम केलेल्या चुकाही नव्या माणसाच्या नावावर ढकलता येतात. त्याला ही मंत्री कार्यालयात राहायचे असते. त्यामुळे तो खाली मान घालून ऐकून घेतो. हे गुपित फक्त तुमच्या जवळच ठेवा. तुम्ही आपले आहात म्हणून तुम्हाला सांगितले!

आता तुमच्या विभागाचे अधिकारी तुम्हाला ब्रीफिंग करतील. एक किस्सा सांगून ठेवतो. असेच एक नेते मंत्री झाले. अधिकारी ब्रीफिंगला आले, तेव्हा त्यांनी थेट विषयाला हात घातला. ‘आपल्याला कुठून, कसे आणि किती प्रमाणात ‘गांधी’दर्शन होऊ शकते? हे पटकन सांगा. बाकीच्या गोष्टी नंतर बघू’, मंत्रिमहोदयांनी थेट विचारले. त्या अधिकाऱ्यानेही सुटकेचा नि:श्वास टाकला. त्यांनी लगेच ‘गांधी’दर्शनाचे मार्ग सांगितले. त्या नेत्याची पुढची वर्षे आनंदात गेली. पुढे त्या नेत्याची एक सीडी ‘ईडी’कडे गेली. नेते हुशार होते, त्यांचा लगेच पक्षांतराचा सोहळा झाला. आता ते आनंदात आहेत. यातून तुम्हाला जो बोध घ्यायचा तो घ्या. नाहीतर तुम्हीच म्हणाल, एवढ्या जवळचे असून, तुम्ही या गोष्टी का सांगितल्या नाहीत. छान काम करा. आपल्या पुढच्या पिढ्यांना गांधी दर्शनाची गरज पडू नये, इतका ‘गांधी’विचार आत्मसात करा. आपल्याला खूप-खूप शुभेच्छा. - आपलाच बाबूराव.

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रministerमंत्री