शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
2
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
3
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
4
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
5
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
6
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
7
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
8
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
9
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
10
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
11
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
12
मराठा आंदोलनानंतर आता ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार; तारीख ठरली
13
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या
14
अवघ्या १५ दिवसांच्या बाळाला फ्रीजमध्ये ठेवून झोपली आई; कारण समजताच कुटुंबीय हादरले!
15
संतोष देशमुख हत्या खटल्याची सुनावणी लांबविण्याचा प्रयत्न; विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचा न्यायालयात आरोप
16
भारतातून पळालेल्या झाकीर नाईकला झाला एड्स? आता मलेशियामधून समोर आली अशी माहिती
17
IND vs UAE: अभिषेक शर्माची रेकॉर्ड बूकमध्ये नोंद, 'अशी' कामगिरी करणारा चौथा भारतीय
18
हृदयद्रावक! शाळेत खेळता खेळता श्वास थांबला; ११ वर्षांच्या मुलीचा कार्डिएक अरेस्टने मृत्यू
19
मंगळावर खरंच जीवसृष्टी होती? NASA रोव्हरने शोधून काढली अशी गोष्ट, तुम्हीही व्हाल अवाक्
20
दोन iPhone 17 च्या किंमतीत मिळू शकते एक कार, इतक्या पैशांत सामान्य व्यक्ती काय काय खरेदी करू शकते?

अन्वयार्थ: सध्या देशात अनेकांना फार अस्वस्थ वाटते आहे, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2023 09:51 IST

राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तिगत शत्रू नव्हेत, हे लक्षात घेणे गरजेचे आहे!

अश्वनी कुमार, माजी केंद्रीय कायदामंत्री

भारताच्या राज्यघटनेची पायमल्ली होत असल्याची उदाहरणे हल्ली वारंवार समोर येत आहेत. लोकशाहीचे सत्त्व आणि खोली यावर त्यामुळे प्रश्नचिन्ह लागताना दिसते. अलीकडच्या काळात विरोधी पक्षनेत्यांनी संसदेत केलेल्या निवेदनांच्या नोंदी कामकाजातून वगळण्यात आल्या. राज्यसभेत पंतप्रधानांच्या भाषणात अडथळे आले. काही अपवाद वगळता लोकप्रतिनिधींचे सभागृहातले वागणे  बालिशपणाचे असल्याने संसदेचे पावित्र्य नष्ट होत आहे. जातीवरून भेदभाव केला गेल्याने आलेला मानसिक ताण असह्य होऊन देशाच्या अग्रगण्य शिक्षणसंस्थेत एका १८ वर्षांच्या मुलानेआत्महत्या केली ; तसेच १६ वर्षांच्या एका विद्यार्थ्याला प्राचार्यांनी बदडून काढले ; कारण तो मुलगा त्यांच्या बाटलीतील पाणी प्यायला होता. या सर्व घटना सामाजिक विषमता अजूनही थैमान घालत असल्याचे यातनादायी स्मरण देणाऱ्या होत.उत्तर प्रदेशमध्ये विरोधी पक्षाच्या एका विद्यमान आमदाराला १५ वर्षांपूर्वी वाहतूक अडवल्याच्या प्रकरणात दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली ; ही शिक्षाही अवाजवीच होती. राज्याच्या विधानसभेतील या सदस्याची आमदारकी त्यामुळे गेली. खटल्यांच्या कामकाजातून दमनचक्र फिरवले जात आहे. न्याय यंत्रणेची चाके फिरली की, अनेकांच्या प्रतिष्ठा धुळीला मिळतात. ही एक मानभंगाची उपाय नसलेली, न संपणारी कहाणी होऊन बसली आहे.

ही अशी संस्थात्मक अस्वस्थता देशाच्या घटनात्मक लोकशाहीच्या इमारतीला तडे जात असल्याचे सांगते. मात्र, या ढासळत्या लोकशाहीविषयी आपल्या राजकीय व्यासपीठांवर कोठेही फारसे बोलले जात नाही.  राजकीय पक्षांचे नेते भूतकाळ उकरून काढत एकमेकांवर चिखलफेक करतात. आपली राजकीय भाषाही अत्यंत दांभिक आणि व्यक्तिगत द्वेषाने भरलेली, राजकीय संकुचितपणा दाखवणारी झाल्याने वातावरण कलुषित होते. परस्परांचा आदर राखला जाईल, असे वचन घटनेने दिले. त्याला या वातावरणात नख लागते. त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडतो. भाषा, संस्कृती, कल्पनाशक्ती आणि इतिहास हे घट्ट धाग्याने बांधलेले आहेत, हे आपल्याला ठाऊक आहे. आरडाओरडा करून नव्हे तर सभ्यपणे बोलूनच जे म्हणायचे ते लोकांपर्यंत पोहोचत असते.

आपल्या आदरणीय पूर्वजांनी त्यांची भव्य स्वप्ने गद्य -पद्यातून व्यक्त केली, ती आदर्शवादाने ठासून भरलेली होती. भव्य, उदात्त अशा ध्येयांसाठी त्यांनी मने प्रज्वलित केली. त्यांची भाषा हृदय आणि बुद्धी यांच्यातील दुवा झाली. लोकशाहीची भाषा सगळ्यांचे समजून घेणारी, संतुलित विचारांची आणि समजावून सांगणारी असते. ती कोणाला दुखावत नाही. उलट आदर करते. राजकीय विरोधक म्हणजे ज्यांच्यावर  राग धरावा, ज्यांची थट्टा करावी किंवा ज्यांना चिरडून टाकावे, असे व्यक्तीगत शत्रू नव्हेत ! लोकशाही म्हणजे एखाद्या बलदंड माणसाने दीन दुबळ्यांवर हुकूमत गाजवणे नव्हे. अतिरेक टाळून मध्यममार्ग स्वीकारणे लोकशाहीत अपेक्षित असते. सहज संवादातून हे उद्दिष्ट गाठता येते.

नेतेमंडळी बोलतात कसे याला लोकशाहीत महत्त्व असते. सार्वजनिक जीवनातील व्यक्तीचे स्थान त्यांच्या उच्चारणावर ठरते. आपण कोण आहोत, हेही त्यातून सांगितले जाते. म्हणून असे म्हणावेसे वाटते की, भारतीय लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी राजकीय संवादाचा दर्जा वाढवला पाहिजे. सभ्यतेची म्हणून काही ताकद असते. यावर विश्वास असणारे तर्कसंगत असे बोलणे व्हायला हवे.

सत्तारूढांनी लोकसत्ता योग्य प्रकारे वापरावी, हेच प्रजासत्ताकात अभिप्रेत आहे. सत्तेचा गैरवापर होत असेल तर, विरोधकांना त्याविरुद्ध निर्भयपणे आवाज उठवता आला पाहिजे. सदसद्विवेकबुद्धीचा आवाज ऐकून जनमताचा कानोसा घेतल्यावर जे समोर येईल त्यावरच आपले राजकीय विश्व उभे आहे. याची वैभवशाली देशाचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी निदान कल्पना करावी आणि ते टिकून कसे राहील हे पहावे. तेच त्यांच्यापुढचे  सर्वात मोठे आव्हान आहे.

टॅग्स :Politicsराजकारण