शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

विशेष लेख: ‘गॅसमुक्ती’चा ‘बारीपाडा पॅटर्न’: नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री

By किरण अग्रवाल | Updated: April 5, 2026 11:18 IST

इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल या संघर्षामुळे जागतिक स्तरावर इंधन टंचाईचे संकट ओढवले आहे. अशा स्थितीत पर्यायी इंधन व्यवस्थेकडे लक्ष वेधले जाणारच. धुळे जिल्ह्यातील तीन पाड्यांनी एकत्र येत, सहा महिन्यांपर्यंत स्वयंपाकासाठीच्या गॅसचा वापर पूर्णपणे बंद करून, पारंपरिक चूल पेटविण्याचा घेतलेला निर्णय पथदर्शी आहे.

किरण अग्रवाल, कार्यकारी संपादक, जळगाव

पश्चिम आशियातील संघर्ष थांबण्याची चिन्हे नसून, त्याचा परिणाम जागतिक स्तरावर होत आहे. विशेषतः इंधन टंचाईने सारेच चिंताग्रस्त झाले आहेत. शेजारच्या श्रीलंकेसारख्या देशात कडक ‘रेशनिंग’ सुरू झाले असून, आठवड्यातील एक दिवस शाळा, कार्यालये बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे. आपल्याकडे अजून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सरकारकडून सांगितले जात असले तरी, पेट्रोलपंपांवर वाहनधारकांच्या व गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा लागत आहेत. इंधन वितरणात काही ‘मर्यादा’ही घातल्या गेल्या आहेत. 

अशात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा, मोहगाव व चावडीपाडा या ३ पाड्यांतील ३०० कुटुंबांनी एकत्र येत गॅस टंचाईला सामोरे जाताना आपला खारीचा वाटा म्हणून येत्या सहा महिन्यांसाठी एलपीजी गॅसचा वापर बंद करून पारंपरिक गोवऱ्या व जंगलातील वाळलेला लाकूडफाटा या नैसर्गिक संसाधनांनी चुलीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात अजूनही काही प्रमाणात नैसर्गिक साधनांची उपलब्धता असल्याने ‘प्रासंगिक पर्याय’ म्हणून या प्रयोगाकडे आशेने पाहता यावे. टंचाई निवारणात पूर्णांशाने नव्हे, पण अल्पशी का होईना मदत याद्वारे घडून येणारी आहे.

सातारा जिल्ह्यातील मान्याची वाडी, कोल्हापूरची शेळके वाडी, अहिल्यानगर जिल्ह्याचे राळेगणसिद्धी व हिवरेबाजार, धाराशिवच्या शिराढोण, रांझणी आदी गावांनी सौरऊर्जा व बायोगॅसचे वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्प साकारून नव-नवे आदर्श निर्माण केले आहेत. याच मालिकेत बारीपाडासह तीन पाड्यांनी ‘गॅसमुक्ती’चा निर्णय घेतला आहे. तब्बल ८० लाख वृक्षांच्या लागवडीची मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पद्मश्री चैत्राम पवार यांच्या पुढाकारातून हा ‘गॅसमुक्ती’चा बारीपाडा पॅटर्न आकारास आला आहे. ही आजच्या समस्येवरील केवळ तात्पुरती सोय नसून, इंधन बचत व स्वयंपूर्णतेच्या दृष्टीने मोठे पाऊल आहे. 

पूरक पर्याय कोणते?

भारताला लागणाऱ्या इंधनातील मोठा हिस्सा आयात करावा लागतो. यातील अर्थकारण व अवलंबित्व टाळण्यासाठी इथेनाॅल, डायमिथाईल इथर (डीएमई), बायो डिझेल असे काही पूरक पर्याय हाताळता येणारे आहेत. याचसोबत शक्य असेल तेथे पारंपरिकपणे वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक संसाधनांचाही वापर करून टंचाईशी सामना करता येणार आहे.

नैसर्गिक संसाधनांच्या लाभाची त्रिसूत्री...

स्वयंपाकासाठी एलपीजी गॅसऐवजी नैसर्गिक इंधन वापरल्याने कंपन्यांवरील अवलंबित्व संपुष्टात येऊन स्वयंपूर्णता किंवा आत्मनिर्भरता साधता येऊ शकते. एलपीजी हे जीवाश्म इंधन असल्याने त्याचे उत्खनन व वाहतुकीतून पर्यावरणाचे काही प्रश्न निर्माण होतात. याउलट नैसर्गिक इंधनातून कार्बन संतुलन राखणे शक्य असते. गॅस सिलिंडरची उपलब्धता व त्यासाठीचा खर्च पाहता नैसर्गिक इंधन उपलब्धता व खर्च तुलनेने शून्य आहे.

देशहितासाठी आपण संयम पाळला व नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर केला, तर कोणतीही कठीण परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही.-चैत्राम पवार, बारीपाडा

किती बचत?

बारीपाडा येथे १२०, मोहगाव, चावडीपाड्यात ८५ गॅस कनेक्शन्स आहेत. तिन्ही पाड्यांत महिन्याला १५० सिलिंडर लागतात. या हिशेबाने सहा महिन्यांत ९०० सिलिंडर वाचतील, असा अंदाज आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Baripada Pattern: A natural resource solution to gas shortage.

Web Summary : Faced with gas scarcity, three hamlets in Dhule adopted traditional methods. Inspired by Padmashri Chaitram Pawar, they're foregoing LPG for six months, using firewood instead. This 'Baripada Pattern' promotes self-sufficiency and environmental balance, saving approximately 900 cylinders.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरCylinderगॅस सिलेंडरLPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईDhuleधुळे