प्रसिद्धीचा हव्यास सुटेना!
सचिनसारखा व्यक्ति जेव्हा आत्मचरित्र लिहितो तेव्हा ते एखाद्या चित्रपटाच्या नायकाप्रमाणो सचिनने स्वत:ला केंद्रस्थानी ठेवून ‘प्लेईंग इट माय वे’ अशा पद्धतीने हा चित्रपट सुपर हिट होणो अपेक्षित होते. मग त्यासाठी ग्रेग चॅपेल या खलनायकाची एन्ट्री करून घेण्याची आवश्यकता नव्हती आणि जरी केली असली तरी ती ठळकपणो समोर येणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती, सचिनसारख्या व्यक्तिकडून हे पथ्य पाळले गेले नाही याची सल सच्या सचिनप्रेमींना नक्कीच राहील.
मैदानात असताना सतत ग्लॅमरस दुनियेत असणा:या
या मंडळींना निवृत्तीनंतर प्रसिद्धीपासून दूर राहणो अवघड होऊन बसते, मग एखादे आत्मचरित्र प्रकाशित करून त्यातून चर्चेत राहण्याला पसंती दिली जाते. आत्मचरित्र लिहीण्याविषयी आक्षेप असण्याचे कारण नाही, पण त्यातून काय मांडले जाते ते महत्त्वाचे आहे.
एखादा चित्रपट हिट होण्यासाठी त्यात बडी स्टार कास्ट, कथा, संगीत, अॅक्शन याची सांगड घालावी लागते. हे सर्व करूनही तो चित्रपट हिट होईल याची शाश्वती नसल्याने मग त्यात थोडीशी कॉन्ट्रोवर्सी निर्माण करून चर्चेत राहून चित्रपटात गुंतवलेले पैसे वसूल करायचे, हा मार्केटिंग फंडा अलीकडच्या काळात रूढ होत चालला आहे. चित्रपटाच्या यशाच्या मार्केटिंगचा हा फंडा आता अनेक जण आपल्या वैयक्तिक आयुष्यात वापरू लागले आहेत. स्वत:चे आयुष्य, जीवनप्रवास आत्मचरित्रच्या माध्यमातून एखाद्या चित्रपटाप्रमाणो प्रोजेक्ट करून त्यातून चर्चेत राहण्याची केविलवाणी धडपड अनेक जण करू पाहत आहेत. गेल्या काही वर्षातली प्रकाशित होणारी आत्मचरित्रे पाहिली तर आपल्या लक्षात येते की यामध्ये क्रीडा क्षेत्रतल्या मंडळींनी आघाडी घेतली आहे. आत्मचरित्र लिहिणारी ही क्रीडा क्षेत्रतली मंडळी आपल्या रोजच्या माहितीतली असतात. त्यांची खडान्खडा माहिती वेळोवेळी प्रसिद्धिमाध्यमांतून आलेली असते. सगळा जीवनप्रवास अगदी खायच्या आवडीनिवडी, शाळेतले दिवस, एकूण जडणघडण, करिअरच्या काळातील चढ-उतार सगळे अगदी ‘खुली किताब’प्रमाणो आपल्यासमोर असते. असे असतानाही ही मंडळी आत्मचरित्रतून नेमके वेगळे काय देऊ पाहत असतात हा मुद्दा उरतो. खरी सुरुवात येथूनच होते एवढे सगळे दुनियेला माहीत आहे, मग वेगळे काय मांडायचे असा प्रश्न समोर येतो आणि येथेच ‘मार्केटिंग’ची संकल्पना जन्म घेते. ‘मार्केटिंग’ आले की मग आपोआप त्यातील बाजाराचे सूत्र लक्षात घ्यावे लागते. मग समोर दिसतो तो ग्राहक आणि त्याला आकर्षित करता येतील अशा गोष्टी! त्यामुळे आत्मचरित्र लिहिताना अर्थातच त्याचे सूत्र हे बाजारात कशाची चर्चा होईल आणि ते कसे विकले जाईल याभोवती गुंफले जाते.
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे आत्मचरित्रही अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे, त्यामुळे या विषयाची नव्याने चर्चा करायला निमित्त मिळाले आहे. चर्चेत राहण्याचा किंवा प्रसिद्धीचा मोह कोणाला सुटलेला नाही, त्याला सचिन तेंडुलकर अपवाद राहण्याचेही काही कारण नाही, मात्र क्रिकेट क्षेत्रतला अनभिषिक्त सम्राट म्हणून ओळखल्या जाणा:या सचिन तेंडुलकरला आत्मचरित्रतल्या कॉन्ट्रोवर्सीच्या माध्यमातून चर्चेत राहण्याची आवश्यकता का भासावी, हा प्रश्न तमाम क्रीडाप्रेमींना संभ्रमात, बुचकळ्यात टाकणारा आहे. सचिनचे आत्मचरित्र अनेक युवा क्रिकेटपटूंना प्रेरणादायी ठरेल, त्याच्या जीवनातील विविध पैलू चाहत्यांसमोर अधिक स्पष्टपणो येतील ही गोष्ट स्वागतार्ह आहे, पण त्या गोष्टींना प्राधान्य देण्याऐवजी ग्रेग चॅपेलसंबंधी वादग्रस्त ठरावी अशी माहिती ज्या पद्धतीने समोर आणली गेली ते दुर्दैवी म्हणावे लागेल.
मिल्खा सिंगच्या ‘दी रेस ऑफ माय लाइफ’, मेरी कोमच्या ‘अनब्रेकेबल एम सी मेरी कोम’ या आत्मचरित्रत मांडलेला त्यांचा प्रवास, मेहनत आणि जिद्द हे सर्व प्रेरणा देणारे होते. युवराज सिंग यानेही आपल्या ‘दी टेस्ट ऑफ माय लाइफ : फ्रॉम क्रिकेट टू कॅन्सर अॅण्ड बॅक’ यामध्ये त्याच्या आयुष्यात आलेल्या उतार-चढावांचे अचूक लेखन केले होते. वाचकांना नेमके हेच वाचायला आवडते. कशा परिस्थितींवर मात करून आपण घडतो.. हा प्रवास वाचकांर्पयत पोहोचवण्याचे काम होणो आवश्यक आहे. पण, त्याला व्यावसायिकतेची झालर लावल्याने आत्मचरित्रची परिभाषा, व्याख्या बदलत गेली, त्यातला साहित्यस्पर्शही दुरावला आणि आत्मचरित्रचा मूळ गाभाच हरवून गेला.
- स्वदेश घाणोकर