शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जैन उद्योगसमूहाची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 03:12 IST

एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली

एखाद्या उद्योगसमूहाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेले योगदान पाहायचे असेल तर निश्चित जळगावात यावे लागेल. ज्या जळगावात सात हजार रुपयांच्या भागभांडवलावर भवरलाल जैन यांनी उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच जळगावात या उद्योगाची भरभराट झाली. सात हजार कोटींवर उलाढाल पोहोचली. जगभर विस्तार झाला. परंतु उद्योगसमूहाचे मुख्यालय जळगावातच कायम ठेवण्याच्या आग्रही भूमिकेत जळगावविषयी असलेले जैन परिवाराचे प्रेम, आपुलकी आणि बांधिलकी अधोरेखित होते. जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या या जळगावचे ऋण फेडण्याचे प्रयत्न या उद्योगसमूहाने सुरुवातीपासून केले ते अविरत कायम आहेत.जळगावात कला, साहित्य, संस्कृती, क्रीडा, शिक्षण, सामाजिक, आरोग्य म्हणजे जीवनाशी निगडीत सर्व अंगांचा व्यापक विकास व्हावा, मूलभूत सोयीसुविधांअभावी जळगावातील तरुण मागे पडू नये हा उद्देश ठेवून जैन उद्योगसमूहाने प्रयत्न केलेला आहे. जैन चॅरिटीज्, त्यानंतर भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या माध्यमातून मोठे प्रकल्प उभे करण्यात आले.न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गांधी रिसर्च फाऊंडेशनची स्थापना करून अल्पावधीत ‘गांधीतीर्थ’ हे जगातील गांधीजींविषयी अमूल्य असे संग्रहालय उभारण्यात आले. केवळ संग्रहालयापुरते कार्य सीमित न ठेवता गांधी विचारांवरील अभ्यासक्रम, कार्यशाळा, ग्रामविकास यासंबंधी निरंतर कार्य सुरू आहे. जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या माध्यमातून क्रिकेट, बुध्दिबळ, जलतरणासह अनेकविध क्रीडा प्रकारांमध्ये प्रशिक्षण, स्पर्धा आयोजनासह खेळाडू दत्तक योजनेसारखे उपक्रम अव्याहत सुरू आहेत. भारतीय संस्कृती आणि विचारावर आधारित परंतु जागतिक दर्जाची ‘अनुभूती’ नावाची शाळा सुरूकरीत असतानाच ‘अनुभूती २’ ही दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या पाल्यांसाठी मोफत शिक्षण देणारी दर्जेदार व उपक्रमशील शाळादेखील सुरू करण्यात आली.गांधीजी, टाटा, नेहरू यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या भवरलाल जैन यांनी सामाजिक बांधिलकीची रुजवात करून दिली. त्यांच्यानंतर पुत्र अशोक, अनिल, अजित व अतुल यांनी व्यवसायासोबत ही बांधिलकी अधिक दृढ केली. कोणताही राजकीय पक्ष, विचार, जात-धर्म असा भेद न बाळगणाºया या उद्योगसमूहाने चांगले काम करणाºया व्यक्ती, संस्थांना कायम मदतीचा हात दिला आहे.महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असल्याने विकासाचा मोठा अनुशेष आहे. अशा स्थितीत जळगावकरांशी असलेल्या बांधिलकीला हा उद्योग समूह जागला आहे. मग पाणीटंचाई काळात पीव्हीसी पाईप तातडीने उपलब्ध करून देणे असो की, गणेशविसर्जन मार्गावरील रस्त्यांची आपत्कालीन दुरुस्ती असो हा समूह अग्रभागी राहिला. लोकसहभागातून मेहरुण तलावाची गळती थांबवून गाळ काढण्याचा उपक्रम महापालिकेने हाती घेतला असताना या समूहाने मोलाचा वाटा उचलला. नागरी सुविधा पुरविण्यात महापालिका अपुरी पडत असताना उद्यानांची उभारणी आणि पुनर्बांधणी, चौकांचा विकास अशी कामे या उद्योगसमूहाने स्वत:हून हाती घेऊन वेळेत लोकार्पण केली.- मिलिंद कुलकर्णी

milind.kulkarni@lokmat.com