शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

फुसक्या फटाक्यांचा धूर

By admin | Updated: November 9, 2016 01:58 IST

दिवाळीच्या एक दिवस अगोदर औरंगाबादच्या मध्यवस्तीत असलेल्या फटाका मार्केटला आग लागली आणि जवळपास दहा कोटींचे नुकसान झाले.

दिवाळीच्या एक दिवस अगोदर औरंगाबादच्या मध्यवस्तीत असलेल्या फटाका मार्केटला आग लागली आणि जवळपास दहा कोटींचे नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी झाली नाही; पण नागरी वस्तीत दर वर्षी भरणारा हा बाजार किती धोकादायक आहे याची प्रचिती आली. ही आग शेजारच्या स्वातंत्र्य सैनिक कॉलनीत पसरली असती तर, ही शंकाच थरकाप उडवणारी आहे.हा बाजार पूर्वी शहराबाहेर आमखास मैदानावर होता; परंतु १९८७ च्या दंगलीनंतर तो इकडे हलविण्यात आला. आगीनंतर कारणांचा तपास सुरू झाला, त्यावेळी परवाना, आगप्रतिबंधक आणि सुरक्षा यंत्रणेचा किती बोजवारा उडाला होता हे उघड झाले. तिथे अग्निशमन यंत्रणाच नव्हती, यापेक्षा यंत्रणेचा भोंगळपणा काय असणार. परिणामी अग्निशमन विभागाचे प्रमुख शिवाजी झनझन यांना पालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी निलंबित केले. पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करा, कारण पालिका प्रमुख म्हणून अंतिम जबाबदारी त्यांचीच आहे, असा पवित्रा घेत पोलीस आयुक्तांना साकडे घालण्याचे दबावतंत्र केले गेले आणि फटाक्याच्या धुराआड पालिकेत राजकारणाचे प्रदूषण पसरले. बकोरिया आल्यापासूनच सत्तेचा रस ओरपणाऱ्या नगरसेवकांना अडथळा ठरले आहेत. त्यांच्यावर खरा राग म्हणजे शहराचा विकास आराखडा उच्च न्यायालयाने फेटाळला याचा. या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यास बकोरिया यांनी नकार दिल्याने विकास आराखड्यात ‘विकास’ करून घेण्यासाठी आसुसलेली मंडळी नाराज झाली. उच्च न्यायालयाचा निकाल म्हणजे सत्तेच्या रसात पडलेली माशी व ती काढण्यास बकोरिया तयार नाहीत. पावलापावलावर त्यांची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू झाले. एक महाशय तर त्यांना दिवसातून ८०-८० वेळा फोन करीत. या साऱ्या प्रकाराला बकोरिया पुरून उरले. सर्वसाधारण सभेने तयार केलेल्या आराखड्याशी महापालिकेचा संबंध नाही अशी भूमिका त्यांनी घेतली. याच प्रकरणात पालिकेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात पत्र दाखल केले नाही. त्यांचीही गच्छंती झाली. दुसऱ्याच दिवशी हे प्रतिवादीचे वकील म्हणून उभे दिसले, यावरून विकास आराखड्याच्या लाभार्थींची साखळी किती मजबूत आहे हे उघड झाले. विकास आराखड्यात २०० कोटींची उलाढाल झाल्याची चर्चा आहे. हातातोंडाशी आलेला हा लोण्याचा गोळा मातीत पडला तर जळफळाट तर होणारच.हे प्रकरण रंगात आले आणि बकोरियांना घेरण्याची संधीच शोधत असणाऱ्यांना फटाक्याच्या आगीचे कोलीत मिळाले. या मुद्यावर सर्व पक्षीय नगरसेवकांना एकत्र आणण्याचे कामही एका नगरसेवकानेच केले; पण प्रयत्न फळाला आले नाहीत. तब्बल आठ दिवसानंतर या आगीचा गुन्हा दाखल झाला. आगीचे कारण गुलदस्त्यात आहे. ते बाहेर येईल तेव्हा येईल; पण या आगीत आणखी किती फटाके फुटतात हे दिसून येईल. कारण अधिकाऱ्यांची चौकशी कोणत्या आधारे करतात, असा सवाल एकेकाळी पालिकेचे सर्वेसर्वा असलेले प्रदीप जैस्वाल यांनी केला. त्यांच्या या प्रवेशाने अनेकांना आश्चर्य वाटले. यापूर्वीचे आयुक्त प्रकाश महाजन यांच्यावर नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव आणल्याने त्यांना जावे लागले. बकोरिया ऐकत नाहीत हेच पुन्हा दुखणे आहे. तिकडे वर भाजपा आणि शिवसेनेच्या हायकमांडनी या नगरसेवकांची पत ओळखली आहे. निवडणुकीच्या तोंडावर जातीय समीकरणाची फोडणी देऊन जनभावना चाळवणे आणि निवडणूक जिंकणे यापेक्षा वेगळे काही पंचवीस वर्षांत घडले नाही. स्मार्ट सिटीचा गजर करणाऱ्या शहरात रस्ते, पाणी, स्वच्छता, दिवे, आरोग्य हेच प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत आहेत. सामान्य जनता समाधानी नाही, त्यामुळे यांचा वकूब वर लक्षात आल्याने आयुक्तांविषयीची तक्रार कोणी ऐकून घेत नाही हेच खरे दुखणे आहे. हा खेळ म्हणजे फुसक्या फटाक्याचा धूरच.- सुधीर महाजन