शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

विश्वाचा आकार

By admin | Updated: March 14, 2017 23:37 IST

महाविद्यालयाला नवे प्राचार्य मिळाले़ सुटाबुटात वावरणारे, सुधारणावादी़ त्यांच्या प्रयत्नातून वाङ्मयीन चर्चा, परिसंवाद, पिकनिक, अ‍ॅन्युअल सोशल गॅदरिंग जोरात व्हायला लागले़

डॉ. गोविंद काळेमहाविद्यालयाला नवे प्राचार्य मिळाले़ सुटाबुटात वावरणारे, सुधारणावादी़ त्यांच्या प्रयत्नातून वाङ्मयीन चर्चा, परिसंवाद, पिकनिक, अ‍ॅन्युअल सोशल गॅदरिंग जोरात व्हायला लागले़ विद्यार्थीवर्ग खूश़ त्यांनी ‘देव नाही’ या विषयावर गावच्या मंदिरातच व्याख्यान दिले़ तरुण मंडळी एकदम फि दा झाली़ देवाचे अस्तित्व नाकारणारा हा प्राचार्य म्हणजे मोठा क्रांतिवीर ठरला़ मंदिराचा पुजारी व्याख्यान ऐकून धास्तावला़ ज्येष्ठ मंडळी हवालदिल झाली़ साधीभोळी माणसे मनातूनच हादरली़ म्हणे देव नाही! आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी प्राचार्यांच्या घरी जाण्याचा योग आला़ प्राचार्य चक्क सोवळ्यात, कपाळी भस्माचा पट्टा, अनामिकेमध्ये दर्भाचे पवित्रक़ चर्चा झाली तसे प्राचार्य म्हणाले आलाच आहात तर थोडी खीर घेऊन मग जा़ कारण आज माझ्या वडिलांचे श्राद्ध आहे़ खीर भक्षण करून कडवट चेहऱ्यांनी प्राचार्यांचे घर सोडले़ देव नाही असे व्याख्यान देणारा हा प्राचार्य वडिलांचे श्राद्ध मात्र व्यवस्थित करतो़ त्यांचा दुटप्पी स्वभाव समजल्यामुळे त्यांच्या व्याख्यानाची गर्दी ओसरू लागली़ त्यांची बदली होऊन नवे प्राचार्य त्यांचे जागी रुजू झाले़ ते गुड मॉर्निंगऐवजी नमस्कार म्हणत़ कपाळी अष्टगंध, धार्मिक वृत्तीचे वाटत़ ‘देवाचे अस्तित्व’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले़ संस्कृत भाषेतील असंख्य अवतरणे सांगून त्यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकले़ मंदिरातही त्यांना व्याख्यानासाठी निमंत्रित केले़ त्यांची लोकप्रियता वाढली़ तरुणाईसुद्धा त्यांच्या व्याख्यानाला गर्दी करू लागली़ गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एका रविवारी पुष्पगुच्छ घेऊन प्राचार्यांच्या भेटीसाठी गेलो़ प्राचार्य उठले नव्हते़ खोलीतील दर्प सोसवत नव्हता़ प्राचार्य आल्यावर त्यांच्या पायावर डोके टेकवून पुष्पगुच्छ अर्पण केला. त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांच्या हातावर चमचा चमचा साखर घातली़ ‘थँक यू’ म्हणून निरोप घेतला़ देवाला न मानणारा वडिलांचे श्राद्ध मनोभावे घालतो आणि देव मानणाऱ्याला गुरुपौर्णिमेचे महत्त्व कळू नये़ हे असे कसे? विद्यार्थ्यांची द्विधा मनोवस्था झाली़ देव आहे का नाही? दोन्ही प्राचार्यांचे एकही भाषण न ऐकलेला माधव म्हणाला, आमच्या शेजारी गंगूबाई नावाच्या वृद्ध बाई राहतात़ त्यांच्याकडे जाऊ़ विद्यार्थ्यांनी गंगूबाईच्या दारात गर्दी केली़ एकाने विचारले - गंगूबाई तुम्ही देवाला मानता का? आम्हाला समजावून सांगा की, गंगूबाई बोलू लागल्या ‘मी फारशी शिकलेली नाही़ बालवाडीला शिकविण्यात माझे आयुष्य गेले’. एक सांगते, ‘तुमच्या मानण्या न मानण्यावर त्याचे अस्तित्व अवलंबून नाही़ तुम्हाला तुमचे डोके आहे का नाही? अरे! हे मानणे न मानणे म्हणजे बुद्धिभेदाचे खेऴ मी थोडी भगवद्गीता अभ्यासली आहे़’ न बुद्धिभेदं जनयेत् अज्ञानां कर्मसंगिनाम्’. बुद्धिभेद होऊ देऊ नका़ चांगला अभ्यास करा़ पास व्हा़ आईवडिलांची सेवा करा़ गरिबांना मदत करा. नसती उठाठेव कशाला रे, विश्वाचा आकार केवढा, ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा, मानला तर देव नाही तर दगड़ ’गंगूबाईच्या रूपात देवच भेटला़