शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

पाप आणि पुण्य

By admin | Updated: July 2, 2014 08:46 IST

पाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात.

अध्यात्मब्रह्मलीन क्षीरसागरमहाराजपाप-पुण्याचे परिणाम या जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत भोगून पूर्ण करावे लागतात आणि जर पूर्ण झाले नाहीत, तर पुढच्या जन्मातही ते भोगावे लागतात. पापाची व पुण्याची आपापसांत वजावट होऊन उरलेले पाप किंवा पुण्य भोगावे लागते, अशी एक चुकीची समजूत सामान्यांमध्ये असलेली दिसून येते. पाप-पुण्याची बेरीज वजाबाकी कधीच होत नाही.संशय व दारिद्र्य हे ज्या ठिकाणी वास करीत असतील, त्याला पाप समजावे आणि संतुष्ट होणे व सदा सुखी राहणे याला पुण्य समजावे. अशाच पद्धतीने सर्वांनी आचरण करावे. पापाचे क्षालन झाल्यावरच मानवाच्या जीवनात पुण्याची वाढ होते व जीवनात शांती-समाधान निर्माण होते. असे समाधान जेव्हा जीवनात प्राप्त होते, तेव्हाच आयुष्यवर्धन होते.प्रत्येक मनुष्यात दोन प्रवृत्ती वास करीत असतात. एक सात्त्विक वृत्ती व दुसरी राक्षसी वृत्ती. पाप कर्मामुळे व्यक्तीचे विचार व वृत्ती पाप कर्माकडेच वळतात. सुधारण्याची शक्यता फारच कमी राहते. मनुष्याला जन्मातच पाप-पुण्याची कल्पना येते. मानवाचा जन्म मिळाल्यावर नीती-नियमांनुसार वागावे व योग्य धर्माचरण करावे. देवाच्या दृष्टीने सर्व लोक समान आहेत. देवाचा न्याय कधीच चुकत नाही. जो पुण्य कर्म करील, त्याला चांगल्या कुळात जन्म मिळेल. पाप कर्मे केलेल्यांनाही जन्म मिळतो, पण तो फक्त दु:ख भोगण्यासाठीच असतो आणि हेच नेमके सामान्य लोकांना समजत नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जरी सर्व सारखेच असले, तरी जन्म मिळताना पाप-पुण्याचा, पात्रतेचा विचार झालेला असतो. कोणत्याही कुळात का असेना, मनुष्यजन्म मिळाल्याबद्दल देवाचे आपण आभारच मानावयास हवेत. काही लोकांची कल्पना असते, की त्यांचा जन्म हा केवळ मागील जन्मांची पापे फेडण्याकरिता झालेला आहे, म्हणून ते उद्धाराचा कोणताही प्रयत्न न करता, चाकोरीबद्ध जीवन जगत असतात. मानवाकडून चुका होतात, काही वेळा नकळत मोठे अपराधही घडतात. काहींच्या मनात पश्चात्तापाची भावना असते; परंतु योग्य परिमार्जन होत नाही म्हणून एक प्रकारची बोच असते. अशा वेळेस धर्मग्रंथांचे वाचन केल्याने फायदा होतो. कोणत्याही धर्माचे धर्मग्रंथ याच तत्त्वांवर आधारित असतात. धर्मग्रंथांचा अंतिम उद्देश, लोकांना नीतिनियमाप्रमाणे वागण्यास शिकविणे, जर चुका झाल्या असतील, तर पापक्षालनाचा मार्ग दाखविणे हाच असतो. आपल्याकडून जराशीही चूक झाली, तर श्रीगुरूंचे अथवा देवाचे नामस्मरण करा. सतत नामस्मरणाची सवय लागल्यावर हातून पापकर्मे घडत नाहीत.