शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

अप्रिय पण दूरगामी निर्णयांची हिंमत दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 02:41 IST

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच.

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २६ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. सुमारे चार लाख कोटी रुपयांच्या कर्जाच्या बोजाखाली दबलेले सरकार आपला ‘मॅग्नेटिक’ अर्थसंकल्प सादर करेलच. नव्या जोमाने कामाला लागलेले वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पेटा-यातून काय काय निघते या बाबत उत्सुकता आहे. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार सध्या होत आहेत. ‘वन ट्रिलियन एकॉनॉमी’कडे साध्य करण्याचा राज्यकर्त्यांचा निर्धार आहे. प्रचंड औद्योगिक गुंतवणुकीतून उद्या मोठा रोजगार निर्माण होऊन राज्य संपन्न होईलही पण वाढता प्रशासकीय आस्थापना खर्च, अव्यवहार्य योजनांवरील कोट्यवधींचा अनाठायी व्यय, अधिकाºयांची आणि सत्ताधा-यांची कंत्राटदारधार्जिणी मानसिकता याला आवर घालत नाही तोवर सरकारचा आर्थिक डोलारा सावरणार नाही.अनेक महामंडळे अशी आहेत की त्यातील कर्मचारी बिनाकामाने नुसते पोसले जात आहेत. ज्या उद्देशाने ती सुरू करण्यात आली होती त्यावर १०-१५ टक्केच निधी ‘सत्कारणी’ लागतो आणि ८०-८५ टक्के निधी हा निव्वळ आस्थापनेवर खर्ची होतो. ही महामंडळे बंद करून वा काहींचे एकत्रीकरण करण्याचे सूतोवाच सध्याच्या राज्यकर्त्यांनी केले पण प्रत्यक्षात काहीही झाले नाही. असंघटित कामगारांसाठीची मंडळे आणि योजना एकाच छताखाली आणण्यास माथाडी कामगारांच्या नेत्यांनी विरोध करताच कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी लगेच माघार घेतली. प्रसंगी जनतेला अप्रिय वाटतील पण राज्याच्या व्यापक हिताचे आणि पुढे चालून जनहित साधतील असे निर्णय घेण्याची हिंमत आणि क्षमता राज्यकर्त्यांनी दाखविली पाहिजे. विनापयोगी शासकीय मालमत्ता (जमिनी आदी) विकून वा त्यांचा व्यावसायिक वापर करून मोठा पैसा उभारण्याचे संकेत मुनगंटीवार यांनी मागे केले होते. मात्र, काहीही झाले नाही. या मालमत्तांच्या योग्य वापरातून राज्याच्या तिजोरीला हातभार लागू शकेल हा विचार मांडण्यात गैर काय आहे? राज्याचे आर्थिक वास्तव जनतेला सांगायचे की लोकानुनयी वागतबोलत राहायचे हे एकदा ठरवा. तसे केले नाही तर ती राज्याची आणि तुमची स्वत:चीही फसवणूक असेल. सध्याच्या सिंचन प्रकल्पांची दुरुस्ती आणि देखभालीवर कोट्यवधींचा खर्च येणार आहे. नवीन प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी ७५ हजार कोटी रुपयांची गरज आहे. अशावेळी निदान मोठ्या धरणांच्या खासगीकरणाचा विचार करायला हवा आणि ते करताना शेती, पिण्याच्या पाण्याची दरवाढ होणार नाही ही हमी सरकारने द्यायला हवी. जगातील अनेक देशांनी आज हे सूत्र स्वीकारले आहे. आघाडी सरकारच्या काळात हा विचार झाला होता. लोकानुनयी निर्णयांच्या नादी लागलेली सरकारे कठोर निर्णयाची वेळ आली की डगमगतात. सरकारी कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग हा द्यावाच लागेल. त्याचा आर्थिक बोजाही सहन करावा लागणार आहे.मात्र, एकीकडे बेरोजगारांची प्रचंड संख्या असताना सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याचे काय कारण? सर्वांना असे हो हो म्हणत जाल तर कसे होईल? राज्यकर्त्यांनी प्रसंगी नाही म्हणायलादेखील शिकले पाहिजे. नाणारची रिफायनरी असो की नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग दोन्हींना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. तसे होऊ नये म्हणून महत्त्वाकांक्षी प्रकल्पांबाबत राजकीय आणि सामाजिक मतैक्य आधी साधले जावे. विकासाला विरोधाची भूमिका शिवसेनेने सोडली तर मराठी माणसांचे भलेच होईल.- यदु जोशी

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस