शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
3
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
4
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
5
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
6
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
7
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
8
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
9
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
10
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
11
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
12
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
13
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
14
जातगणना : मॅजिक की मंडल?
15
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
16
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
17
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
18
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
19
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
20
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...

केवळ उपचार ठरु नये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 22:14 IST

मंत्री अथवा राजकीय नेते ग्रामीण भागात येतात, तेव्हा तेथील परिस्थिती पाहून उद्वीग्न होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही देतात

मिलिंद कुलकर्णीमंत्री अथवा राजकीय नेते ग्रामीण भागात येतात, तेव्हा तेथील परिस्थिती पाहून उद्वीग्न होतात. ही परिस्थिती बदलण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्वाही देतात. संबंधित अधिकाऱ्यांना समक्ष वा दूरध्वनीवरुन तशा सूचना देतात. जनसमुदाय आश्वस्त आणि आनंदी होतो, टाळ्या वाजवून नेत्याच्या संवेदनशीलतेला दाद देतो. समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमांवर दोन-चार दिवस छायाचित्रे, व्हीडीओ, विशेष बातम्या येतात. नेते, आयोजक, जनता सगळे आनंदात असताना काळ लोटतो आणि प्रश्नाचा विसर पडतो. जनतेचा त्रास कायम राहतो, पण आयोजक आणि आश्वासन कर्ते मात्र हा विषय सोयिस्करपणे विसरलेले असतात.हे सगळे आठवण्याचे कारण म्हणजे राष्टÑवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे या चार दिवस जळगाव जिल्ह्याच्या दौºयावर होत्या. संवाद दौरा असे त्याचे नामकरण करण्यात आले होते. दैनंदिन कार्यक्रमाचे स्वरुप निश्चित होते, फक्त तालुका बदलत होता. सकाळी एखाद्या महाविद्यालयात विद्यार्थिनींशी संवाद, दुपारी उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांशी संवाद, महिलांशी संवाद, पत्रकार परिषद असे साधारण स्वरुप होते. दरम्यान मधल्या काळात प्रसिध्द ठिकाणे, स्मारके, तीर्थक्षेत्र यांना भेटी, प्रसिध्द हॉटेलमध्ये स्थानिक खाद्यपदार्थाचा आस्वाद घेतला जात होता. या सगळ्यांची व्यवस्थित प्रसिध्दी स्वत: सुळे आणि पक्ष व स्थानिक कार्यकर्ते करीत होते. सुळे या स्वत: विद्यार्थिनींसोबत सेल्फी काढत होत्या. एखाद्या विद्यार्थिनीला जवळ बोलावून संवाद साधत होत्या. संवाद दौरा म्हणून या गोष्टी करण्यात कुणाला आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु, या संवाद कार्यक्रमात विद्यार्थिनींनी मांडलेल्या समस्यांना इव्हेंटच्या मोहजालात विसर पडता कामा नये. दोन ठळक घटना याठिकाणी नमूद करायला हव्या.धरणगावच्या महाविद्यालयात एका विद्यार्थिनीने गावातील अवैध व्यवसायांमुळे आम्हाला महाविद्यालयात ये-जा करताना त्रास होतो, अशी व्यथा मांडली. सुळे यांनी तातडीने दखल घेत लगेच स्थानिक पदाधिकाºयांना विचारणा केली. आम्ही पोलीस अधीक्षकांना तिनदा निवेदने दिली, मोर्चा काढला, पण पोलीस विभाग दुर्लक्ष करतो, अशी भाववा पदाधिकाºयांनी व्यक्त केली. सुळे यांनी तातडीने पोलीस अधीक्षकांना फोन केला आणि अवैध व्यवसायाची समस्या त्यांच्या कानावर घातली.दुसरी घटना शेंदुर्णी (ता.जामनेर) येथील महाविद्यालयाची. दारुमुळे कुटुंबाची वाताहत झाली आहे. माझे शिक्षण अपूर्ण राहते की, काय अशी परिस्थिती उद्भवली आहे, अशी व्यथा रडत एका विद्यार्थिनीने भर कार्यक्रमात मांडली. सुप्रिया यांनी तिला जवळ घेतले, समजूत घातली आणि तिच्या शिक्षणात व्यत्यय येणार नाही, याची जबाबदारी घेतली.सुप्रिया सुळे यांच्या संवेदनशीलतेचा परिचय या दोन घटनांमधून येतो. त्याचबरोबर ग्रामीण भागातील गंभीर चित्र यानिमित्ताने विरोधी पक्षाच्या नेत्यासमोर आले. विशेष म्हणजे, ही दोन्ही गावे ज्यांच्या मतदारसंघात येतात ती, अनुक्रमे शिवसेनेचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आणि भाजपाचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे आहेत. तुमचे मंत्री दारुची विक्री वाढावी, म्हणून उत्पादनांना महिलांची नावे देण्याची सूचना करतात, अशी राजकीय मल्लीनाथी सुप्रिया यांनी महाजनांचे नाव न घेता केली. परंतु, आवश्यकता आहे की, या समस्या मार्गी लागण्यासाठी राष्टÑवादी कॉंग्रेसच्या स्थानिक पदाधिकाºयांनी पाठपुरावा करण्याची आणि आवश्यकता असेल तेथे सुप्रिया सुळे यांची मदत घेण्याची...हे होईल, का हा प्रश्न आहे.प्रश्न उपस्थित होण्यामागे कारण आहे. सुमारे ५-७ वर्षांपूर्वी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार हे दौºयावर आले असताना जळगाव-पाचोरा या प्रवासात त्यांना अनेक गावात हगणदरी दिसली. सरकार निर्मल गावांसाठी प्रयत्न करीत असताना स्वपक्षाच्याच आमदारांच्या मतदारासंघातील ही स्थिती पाहून त्यांनी संताप व्यक्त केला होता. पवार यांची कार्यपध्दती आणि स्वभाव वैशिष्टयांचा जो बोलबाला आहे, त्यावरुन असे वाटले की, ही समस्या आता मार्गी लागलीच म्हणून समजा. पण समस्या कायम राहिली, बदल एवढाच झाला, मतदारांनी राष्टÑवादीच्या लोकप्रतिनिधींना घरी बसवले.

टॅग्स :JalgaonजळगावSupriya Suleसुप्रिया सुळे