शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

शेंड्यावरचे शेतकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:32 IST

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

मोर्चे व आंदोलन करणा-यांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरण ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतक-यांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.शेतमालाचे भाव पडले की शेतकºयांचा एल्गार आणि भाव वाढले की ग्राहकांचे मोर्चे ही आता राजकीय पक्षाची हत्यारे झाली आहेत आणि ती सोयीनुसार वापरली जात आहेत. यात ना शेतक-यांचे कधी भले झाले ना कधी ग्राहकांना त्याचा फायदा झाला. उसाचा दर वाढवून दिला तेव्हा साखरेचेही दर वाढले. तेव्हा साखर न खाल्ल्याने मरत नाही हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खणखणीत उत्तर अनेकांच्या जिव्हारी लागले असेल. पण व्यवहार बघायला गेले तर चुकीचे काहीच नाही, असे वाटते.आज शेतकºयांच्या दुधाला भाव नाही. भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला जात आहे. अशा वेळी कोणताही राजकीय पक्ष यासाठी मोर्चा काढताना दिसत नाही. कांद्याचे भाव वाढवून द्या म्हणून शेतक-यांच्या मोर्चात सामील होणारेच महागाई कमी करा म्हणून निघणाºया मोर्चात सामील होतात, किंबहुना मोर्चाचे नेतृत्वच करतात. अशा दुतोंडी राजकारणामुळे धड शेतकºयांचे भले होईना, ना ग्राहकांना रास्त भावात माल मिळेना. शेतकºयांच्या नावाने स्थापन झालेल्या बाजार समित्या व सहकारी संस्थांमध्ये शेतकºयांचीच अडवणूक होत आहे. त्यामुळे शेतकरी हा नावालाच शेतकरी असतो. तो एक पीक काढणे वा शेतीच्या फायदा-तोट्याचा फारसा विचार करताना दिसत नाही. शेतकºयांना व्यापारी डोके अजून दिलेलेच नाही. केवळ वरवरचे दिसणारे जग याला भुलून तो पिकांची लागवड करतो. यंदा कांद्याला भाव आला की, सरसकट सगळे शेतकरी कांद्याच्या लागवडीकडे वळतात. त्यामुळे इतर पिकांकडे दुर्लक्ष होते आणि नेमके कांद्याचे भाव गडगडतात, तर ज्याची उपलब्धता नाही त्याचे भाव वाढतात. शेतीमालाचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात, याचा शेतकरी कधी अभ्यास करीत नाही किंवा पिकांची नोंदणी करीत नाही. त्यामुळे राज्यात वा देशात कोणत्या पिकाची किती उपलब्धता आहे, याचा अंदाज येत नाही.दोन वर्षांपूर्वी तुरीला मिळालेला हमीभाव, यामुळे राज्यभर तुरीच्या लागवडीखालील क्षेत्र वाढले आणि राज्यभर तुरीचा लोचा झाला. त्यानंतर तुरीला वैतागून यंदा शेतकºयांनी उडीद, सोयाबीनची लागवड केली. त्याचीही गत तुरीसारखीच झाली. खरिपाच्या अखेरीस अगदी आॅक्टोबरपर्यंत सुरू असलेल्या पावसाने रब्बीच्या पेरण्या लांबल्या आणि शेतकºयांनी अल्पकाळात येणारा भाजीपाला लावून तेवढीच साय खाण्याचा प्रयत्न केला. असे करणाºया शेतकºयांची संख्या वाढल्याने भाजीपाल्याची सध्या माती झाल्याचे आपण पाहत आहोत. हुरळल्या मेंढ्यासारखी शेतकºयांची गत आहे. केवळ चांगला शेंडा मारण्याच्या नादात शेतकºयांच्या पदरी निराशा येत आहे. यासाठी मोर्चे आणि आंदोलन करणाºयांनी ग्राहक आणि शेतकरी जगला पाहिजे, याचा विचार करून धोरणे ठरवण्यासाठी पुढे आले पाहिजे. शेतकºयांसाठी स्थापन केलेल्या संस्था जगल्या पाहिजेत आणि त्यामध्ये पारदर्शीपणा आला पाहिजे, यासाठी सहकार्य करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी