शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

शरदचंद्र पवार हे खरे की ते खरे?

By admin | Updated: December 12, 2014 01:23 IST

देशातील ज्या नेत्याच्या नावाला कोणत्याही उपाधीची गरज नाही, ते शरद पवार आज आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत.

देशातील ज्या नेत्याच्या नावाला कोणत्याही उपाधीची गरज नाही, ते शरद पवार आज आपल्या वयाच्या अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या सुहृदाने जागवलेल्या या आठवणी. सुमारे 43 वर्षापूर्वीच्या छायाचित्रत सर्वश्री शरद पवार, सौगत रॉय, स्वत: लेखक, प्रियरंजनदास मुन्शी, उन्नीकृष्णन, वायलर रवी व दिनेश गोस्वामी.
 
शरद पवार हे एक अजब रसायन आहे. गेल्या पंचेचाळीस वर्षाच्या मैत्रीनंतरही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पूर्ण आकलन झाले, असे मी खात्रीने म्हणू शकत नाही. सुरुवातीला वाटायचे की, होय शरद पवारांचे व्यक्तिमत्त्व आपल्याला समजले आहे, पण कालांतराने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखी एखादा पैलू समोर यायचा व वाटायचे, अरे आपण बांधला त्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आवाका मोठा आहे! पंचेचाळीस वर्षात वाढता वाढता वाढे, असे करीत तो आकार आता अजरुनाने पाहिलेल्या विश्वरूपदर्शनासारखा भासतो आहे. आणि या पवाररूप दर्शनात अनेक घटना व प्रसंग डोळ्यांपुढे येत आहेत.
मुळातच त्यांच्या संघटन कौशल्याचे दर्शन त्यांच्या विद्यार्थीदशेतच होऊ लागले होते. सर्वाना बरोबर घेऊन जाणारा व अडचणीच्या वेळी उपयोगी पडणारा मित्र, अशी त्यांची ख्याती होती. आणि म्हणूनच विद्यार्थीदशेत असलेली त्यांची अनेकजणांची मैत्री आजही टिकून आहे. विठ्ठल मणियार, धनाजी जाधव, कर्नल पाटील, श्रीनिवास पाटील, बाळ अग्रवाल, सायरस पूनावाला, चंदू चोरडिया ही त्यांपैकीच काही नावे. आज हे सगळे एकत्र आले की वाटते, कॉलेज कट्टय़ावर बसलेले हे सोबती आहेत. चर्चेचे विषय व भाषाही कट्टय़ावरची असते. काही मित्र गाणी म्हणत असतात व खासदारकीची झूल उतरवून श्रीनिवास पाटील व आपल्या आयएएस पदाची झूल उतरवून बी. के. अग्रवाल साहेब नाचत असतात. आणि मग आपण संभ्रमात पडतो की, हाताची घडी करून पार्लमेंटमध्ये पुढच्या बाकावर पंतप्रधानासोबत धीरगंभीर मुद्रेत बसलेले शरद पवार खरे की, आजही जिवलग मित्रंच्या नाचाला टाळ्या वाजवून ताल धरणारे पवार खरे?
शरदराव शाळा, कॉलेजच्या सुट्टीच्या दिवसांत त्यांच्या शेतावरील भाजीपाला विक्रीसाठी मुंबईला भाजीच्या ट्रकमध्ये बसून जात. ट्रकमध्ये बसून म्हणजे ट्रकच्या मागे ठेवलेल्या भाजीच्या पोत्या पेटा:यांवर बसून. कारण ड्रायव्हरच्या शेजारी असलेल्या जागेत मोठे बागायतदार बसत. एखाद्या फेरीत कोणी मोठा बागायतदार नसला, तर पवारांना प्रमोशन मिळत असे व ते ड्रायव्हर शेजारच्या जागेत बसत. मंत्रिपदावरून प्रमोशन घेऊन मुख्यमंत्री होण्याचा प्रसंग व ट्रकच्या सामानातून समोरच्या सीटवरच्या प्रमोशनचा प्रसंग ते सारख्याच प्रेमाने सांगत असतात. 
क्रीडा संघटनामार्फत खेळांचा विकास हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. 1967 ते 72 या काळात ते पुणो जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष होते. पुढे ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे व नंतर अखिल भारतीय कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष झाले. खो-खो संघटनेचेही ते असेच पायरी पायरीने चढत त्या खेळाची सर्वागीण प्रगती करीत सर्वोच्चपदी पोहोचले. माङयाकडे क्रीडाखाते असताना त्यांनी मुख्यमंत्री या नात्याने मला खो-खो या खेळाच्या प्रगतीसाठी काय करावे, याची एक टिप्पणी पाठविली. त्यात तेवीस मुद्दे होते व ती सर्व दोन पानी टिप्पणी त्यांनी त्यांच्या स्वत:च्या अक्षरात लिहिली होती. त्या वेळच्या क्रीडा खात्याच्या सचिव मालती तांबे-वैद्य ती टिप्पणी माङयाकडे घेऊन आल्या व मला म्हणाल्या, की बघा, दोन पानी टिप्पणी लिहिण्याइतका वेळ मुख्यमंत्री लिहिण्यासाठी देतात, हे कृत्य खेळावरील आस्था दाखविणारे आहे व सर्व मुद्दे अमलात आणण्याजोगे आहेत! खेळाची जाण व आस्था असलेला हा नेता पुढे क्रिकेटसारख्या बलाढय़ खेळाच्या जागतिक संघटनेचा अध्यक्ष झाला. त्या वेळी अनेकांनी पवारांचा खेळाशी काय संबंध, अशी चर्चा सुरू केली. पण कबड्डी, खो-खो, कुस्तीसारख्या दुर्लक्षित खेळांच्या संघटनांच्या पाठीशी सर्वार्थाने चाळीस वर्षे उभे असलेले पवार त्यांना माहीत नव्हते. किंबहुना, ब:याच लोकांना ते अजूनही माहीत नाही.
खेळाइतकेच त्यांचे नाटक-सिनेमावरही प्रेम आहे. घाशीराम कोतवाल हे नाटक त्यांनी आणि मी किमान दहा वेळा एकत्र पाहिले. या नाटय़कृतीला जगभरातून निमंत्रणो आली. हा दौरा शरदरावांनी आयोजित केला. काही मूलतत्त्ववादी संघटना व काही पुणोकरांनी त्याला कडाडून विरोध केला. पवार नाटय़कर्मीच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर सामना व सिंहासन हे चित्रपट आले. सतत राज्य करण्याची सवय असलेल्या पक्ष कार्यकत्र्याचे पित्त खवळले. माङयाकडे सांस्कृतिक कार्य हे खाते होते. पवार साहेबांनी मला बोलावून सूचना दिल्या की, या उत्तम चित्रकृती आहेत. सरकार म्हणून आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे!
प्रतापराव भोसले यांच्याशी त्यांचे सख्य जगजाहीर आहे. एकमेकांना विरोध करण्याची लहानशी संधीदेखील ते सोडीत नाहीत. हा सामना बरीच वर्षे चालू आहे. दोघेही माघार घेत नाहीत. माघार घेईल तो सातारी कसला! (पवार साहेबांचे मूळ गाव नांदवळ हे सातारा जिल्ह्यात आहे) त्याच प्रतापराव भोसले यांना अपघात झाला व त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असे समजल्यावर मुंबईहून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक हेलिकॉप्टरने तातडीने साता:यालाही पाठवतात. आणि भाऊ ठणठणीत झाल्याची खात्री झाली की लगेच सामना सुरु करतात. 
1969 साली मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, तेव्हा शरदराव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस होते. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत मला तिकीट मिळावे म्हणून त्यांनी फिल्डिंग लावली. मला तिकीट मिळालेही. पुढे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. मी काँग्रेसमध्येच राहिलो. 1983 साली महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुका होत्या. आमदार व्हावे, असे माङया मनात आले. मी दिल्लीला गेलो. ते आणि मी वेगळ्या पक्षात होतो. पण पूर्वी काँग्रेसमध्ये असल्यामुळे पवार साहेबांचे काँग्रेस कमिटीतील सर्व ज्येष्ठ नेत्यांशी वैयक्तिक  संबंध होते. शरदरावांनी फिल्डिंग लावली. मला काँग्रेसचे तिकीट मिळाले. एकाच पक्षात असताना तिकिटाला मदत करणारे शरदराव खरे की, त्यांच्या विरोधी पक्षात असतानादेखील मदत करणारे शरदराव खरे?
सत्तेच्या खुर्चीतून चौदा निवडणुका करून कधीच पडले नाहीत आणि परवा दिल्ली निवासस्थानी हिरवळीवर वेताच्या खुर्चीत बसले असताना पडले. सत्तेच्या खुर्चीत सतत पन्नास वर्षे बसून न पडणारे पवार खरे की, आरामखुर्चीतून कोलमडणारे पवार खरे?
कोणते पवार खरे, हा संभ्रम कालांतराने दूर होतो आणि जाणवते की, दोन्ही पवार खरेच आहेत. आणि म्हणूनच ते शरद पवार आहेत. ते माङो जिवलग मित्र व ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. त्यांचे मैत्र व मार्गदर्शन हा माङया आयुष्यातील मोलाचा ठेवा आहे.
 
विनायक पाटील
माजी मंत्री