शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार यांनी मातीतला खेळ जगभरात नेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:03 IST

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी नेहमीच देशी खेळांना प्राेत्साहन दिले. १९८० मध्ये ते अखिल भारतीय कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष हाेते. तेव्हापासून कबड्डीचा देशभरात, जगभरात प्रसार व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत.

- शांताराम जाधव(अर्जुन पुरस्कार विजेते कबड्डीपटू)शरद पवार यांनी नेहमीच देशी खेळांना प्राेत्साहन दिले. १९८० मध्ये ते अखिल भारतीय कबड्डी असाेसिएशनचे अध्यक्ष हाेते. तेव्हापासून कबड्डीचा देशभरात, जगभरात प्रसार व्हावा यासाठी त्यांचे प्रयत्न राहिले आहेत. त्यांनी प्रथम आशियाई देशांमध्ये ताे रुजविण्याचा प्रयत्न केला. बांगलादेश, नेपाळ, थायलंड, भूतान आदी देशांमध्ये स्पर्धा आयाेजित केल्या. तेथील संघांना भारतात निमंत्रित केले. त्यांच्यामुळेच कबड्डीचा आशियाई स्पर्धांमध्ये समावेश झाला. १९९० मध्ये सर्वप्रथम बीजिंग एशियाडमध्ये कबड्डी दिसली. जपानच्या एका राजकीय दाैऱ्यादरम्यान तेथील टाेग्यानाे शहराच्या महापाैरांशी चर्चा करून त्यांनी कबड्डीबाबत माहिती दिली. याचे फलित म्हणून १९८० मध्ये भारताचे महिला व पुरुष संघ जपानला गेले. त्यामध्ये मी सहभागी हाेताे. टाेग्यानाे शहरातील शाळांमध्ये आम्ही कबड्डीचे सादरीकरण केले. पुढे जपानमध्ये कबड्डीचा प्रसार झाला. मातीतील खेळांचा प्रसार कसा हाेईल, ताे जगभरात कसा पाेहाेचेल, याबाबत पवार नेहमी सजग असतात. कबड्डी ऑलिम्पिकमध्ये पाेहाेचावी, हे ध्येय ठेवून त्यांनी खेळाडू घडविले, त्यांना प्राेत्साहन दिले. अगदी जिल्हा पातळीवरील स्पर्धांच्या आयाेजनावरही ते लक्ष ठेवून असतात. खेळाडूंना नाेकऱ्या मिळाव्यात, त्यांचे करिअर घडावे, यासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. लहान-माेठ्या संस्थांना कबड्डीच्या प्रचार-प्रसारासाठी प्राेत्साहन दिले. आर्थिक बळ दिले. त्यांच्यामुळेच आमच्यासारखे सामान्य कुटुंबातील खेळाडू नाव कमावू शकले. एकेकाळी केवळ एका टी-शर्टवर आम्ही स्पर्धा गाजविल्या. पण, आज गुणवान खेळाडूला एका सिझनसाठी दीड काेटी रुपये मिळतात. हे केवळ पवार यांच्यामुळे शक्य झाले आहे. आज जगभरातील ३५ देशांमध्ये हा खेळ पाेहाेचला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार