शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

बांधाच्या पलीकडे पाहणारे नेते

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:14 IST

Sharad Pawar Birthday : शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी.

- कृषिरत्न विजय अण्णा बोराडे(विश्वस्त, मराठवाडा शेती साहाय्य मंडळ, औरंगाबाद) शरद पवार यांनी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले की, मराठवाड्याचे वाळवंट होते आहे. गेल्या दशकातल्या लागोपाठच्या दुष्काळांनी ते सिद्ध झाले. ग्लोबल वॉर्मिंगबद्दल बोलणारे, धोक्याचा इशारा देणारे ते पहिले राजकारणी. शेतीचा पतपुरवठा वाढला, पेरणीपासून भांडवल मिळाले, तरच शेतकऱ्याला खरा आधार मिळेल हे त्यांनीच सांगितले. मंत्री असताना त्यांनी फलोत्पादन अभियानाला नवी ऊर्जा दिली. महाराष्ट्राला पहिल्या वर्षी १६० कोटी दिल्यानंतर हे खर्च कराल तर दुप्पट पैसे देईन, असे जाहीरपणे सांगितले, पण आपली यंत्रणा ते करू शकली नाही.डॉ.मनमोहन सिंग सरकारची शेतकऱ्यांना ७१ हजार कोटींची कर्जमाफी, हे पवार यांचे कृषिमंत्री म्हणून चर्चेत राहिलेले सर्वांत मोठे योगदान. खरे तर त्यापेक्षा अधिक मोठे योगदान, आयातीसाठी ओळखला जाणारा भारत शेतमालाचा सर्वांत मोठा निर्यातदार बनला हे आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यावेळी शेतकऱ्यांना लाभार्थी बनविण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले. शेती कर्जाविषयीचा पुलोद सरकारच्या काळात त्यांनी बंडिंगच्या कर्जाचे ९ कोटी रुपयांचे व्याज माफ करून सुरुवात केली होती. मात्र वारंवार कर्जमाफी हा शेती व शेतकरी संकटातून बाहेर काढण्याचा कायमस्वरूपी उपाय नाही, हे त्यांनी वारंवार बोलून दाखविले.शेतीवरचा बोजा कमी करायला पाहिजे. दोन किंवा तीन भाऊ असतील, तर एकानेच शेती सांभाळायची, इतरांनी दुसरा काहीतरी उद्योग करून शेतीवरचा आर्थिक ताण कमी होईल, हे पवार  सांगत आले. पवारच बघा, कसं शेतीच्या विरोधात बोलतात, अशी टीका त्यांच्यावर झाली.१९९०-९१ मध्ये मुख्यमंत्री असताना त्यांनी रोहयोखाली १०० टक्के अनुदानाची फलोत्पादन योजना आणली, कोरडवाहू फळबागांचा नवा अध्याय लिहिला गेला. तेव्हाही त्यांच्यावर टीका झाली. अलीकडे त्यांनी शेतीची सगळी कामे रोहयोमधून करायला पाहिजेत, असे सांगितले. तेव्हाही टीका झाली, पण टीकाकारांनी मजुरांच्या टंचाईवर उपाय मात्र सांगितले नाहीत. कृषिपंपाची मीटरवर वीजबिलाची पद्धत त्यांनी बंद केल्याला ४० वर्षे झाली. अश्वशक्तीच्या प्रमाणात वीजबिल देण्याचा त्यांचा प्रयोग अनोखा होता. त्याचप्रमाणे, अनुदानावर शेततळ्यांच्या योजनेमुळे कोरडवाहू शेतीला जणू जीवदान मिळाले. महत्त्वाचे म्हणजे, शेततळ्यांमुळे शेतकऱ्यांना पाणी लीटरमध्ये मोजण्याची सवय लागली. थेंबाथेंबाचा हिशेब मांडला जाऊ लागला.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPoliticsराजकारण