शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार : पैलवानांचा आधार बनलेला नेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2020 04:00 IST

Sharad Pawar Birthday : ज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत.

- दीनानाथसिंहज्येष्ठ नेते शरद पवार हे तब्बल १९७० पासून कुस्तीच्या व पैलवानांच्या पाठीशी आधार बनून राहिले आहेत. ते १९७१-७२ ला मुंबई तालीम संघाचे अध्यक्ष होते व आज ते महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष आहेत. राज्य मंत्रिमंडळात ते १९७२ ला अर्थ व क्रीडा राज्यमंत्री असताना, महाराष्ट्रातील मल्लांचा संघ तेहरान येथील जागतिक कुस्ती स्पर्धेला निघाला होता. त्या संघात महाराष्ट्र केसरी रघुनाथ पवार, श्यामराव साबळे (तुरंबे) व माझा समावेश होता; परंतु त्यास हरयाणाने हरकत घेतली. त्यामुळे आमचा दौरा रद्द होण्याची वेळ आली. आम्ही तातडीने पवारसाहेबांना जाऊन भेटलो. त्यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाशी बोलून महाराष्ट्राच्या संघाचा त्यामध्ये समावेश केलाच; शिवाय दौऱ्याचा खर्चही राज्य शासनाकडून त्यांनी केला. अशा अनेक प्रसंगांत, अडचणींमध्ये पवारसाहेब कुस्ती क्षेत्राच्या पाठीशी राहिले आहेत. लाल मातीतील कुस्तीबद्दल त्यांना कायमच आस्था राहिली. कुस्तीतील पहिल्या पिढीतील दिग्गज गणपतराव आंदळकर, श्रीपती खंचनाळे, मारुती माने यांच्यावर त्यांनी अतीव प्रेम केले. हरिश्चंद्र बिराजदार यांच्या आजारपणाचा सर्व खर्च त्यांनी उचलला. महाराष्ट्रातील अनेक मल्लांच्या आजारपणाच्या काळात त्यांनी पाच-पाच लाखांपर्यंतची मदत केली आहे. मल्ल असोत की अन्य कोणताही कलावंत असो, तो यशोशिखरावर असतो तेव्हा अनेक जण त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतात; परंतु मल्लांच्या उतारवयात आर्थिक स्थिती बेताची असताना त्यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार मानायला आमच्याकडे शब्द नाहीत. कुस्ती असो की पैलवानांच्या जीवनातील व्यक्तिगत काही अडचण असो; त्यासाठी पवार साहेबांकडे गेल्यावर काहीतरी मदत नक्की होणार, हा विश्वास कायमच वाटत आला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारWrestlingकुस्ती