शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

भक्ताचे शंकानिरसन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 05:40 IST

व्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते...

- वामनराव देशपांडेव्याकूळ परमभक्ताच्या मनात काही शंका निर्माण झाल्या, तर भगवंत स्वत:च शंकांचे निराकरण करतो. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हा जो व्याकूळ परमभक्त असतो, त्याच्या हातून चूक केवळ अज्ञान दाटून आल्यामुळे घडते, ती अशी की तो जेवढे जाणतो, त्याच्या मर्यादित बुद्धीला जेवढे झेपेल तेवढेच सत्य आहे अशी त्याची समजूत होते. याचा अभिमान त्या साधक भक्ताला होतो. तो त्या भक्ताच्या पतनाचा क्षण ठरतो. म्हणून भगवंत स्वत: आपल्या भक्ताचे अज्ञान दूर करतो. भगवंत अर्जुनाला या अज्ञानमयी क्षणांच्या समाप्तीचा मार्ग सांगतात.तस्मादज्ञानसम्भूतं हत्स्थं ज्ञानासिनात्मन :।छित्त्वैनं संशयं योगमातिष्ठोत्तिष्ठ भारत।।पार्था, केवळ अज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या आपल्या अंत:करणात घट्ट रुतून बसलेल्या संशयाला, हातात आपण ज्ञानरूपी धारदार तलवार घेऊन त्या अज्ञानाने माखलेल्या संशयाला नष्ट केले पाहिजे, तरच चित्तात समत्व नांदायला सुरुवात होईल. हाच सर्वोत्तम योग अहे. एकदा का चित्त स्थिर झाले, की तू युद्ध करायला सिद्ध होशील. पार्था, कर्मयोगी पुरुषच संशयात्मा नष्ट करू शकतो...या दृश्य सुंदर विश्वात आपल्याला ही मानवी योनी प्राप्त झालेली आहे. हीच भगवंतांची फार मोठी कृपा झालेली आहे. याची कृतज्ञ जाणीव होणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रथम शारीर भाव विसर्जित करणे अत्यंत आवश्यक आहे. आपण जेव्हा शरीराशी तादात्म्य पावतो, तेव्हाच शरीरांतर्गत षड्रिपू सतत बंड करून उठतात. त्यांचा आपल्या नित्य जगण्यावर तीव्र परिणाम होतो. या षड्रिपूंना नष्ट करण्यासाठी भगवंतांनी एकूण २० साधने सांगितली आहेत. ती सर्वांगात भिनणे निश्चितच आवश्यक आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक