शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

शाब्बास भावा यमके!

By राजा माने | Updated: July 30, 2018 03:08 IST

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती.

नमस्कारमंडळी, इंद्रलोकांचा स्टार रिपोर्टर यमकेची तुमची ओळख आहेच! पण यमकेबद्दलची खास ओळख मात्र काही जणांना नसेल. तर इंद्रदरबाराने मराठी भूमीतील बातम्यांसाठी स्टार रिपोर्टर नेमण्याची जबाबदारी नारदमुनींवर सोपविली होती. त्यावेळी हा यमके त्यांना सापडला! यमके हा आमच्या यमगरवाडीचा. त्याचं खरं नाव मन कवडे पण त्याचे मित्र त्याला ‘एमके’ म्हणायचे. पुढे ‘एमके’ या नावाचे ‘यमके’ असे बारसे कधी झाले हे आता कुणालाच आठवत नाही... यमके हा राजकुमार हिरानी यांच्या ‘पीके’चा डुप्लिकेट.समोरच्या व्यक्तीचा हात हातात घेतला की, त्या व्यक्तीची भूतकाळ व भविष्यातील ‘मन की बात’ जाणण्याची दिव्यशक्ती जशी ‘पीके’कडे होती तशीच दिव्यशक्ती यमकेलाही लाभली होती. नेमक्या त्याच कारणाने नारदमुनींनी त्याची इंद्रलोकांचा ‘स्टार रिपोर्टर’ म्हणून नेमणूक केली. तेव्हापासून नारद यमकेचे महागुरू झाले... असा हा यमके आपला रिपोर्ट तयार करायच्या नादात असतानाच त्याला चक्क पीकेचाच फोन आला... रिंगटोन वाजू लागली... बाबा कहता है अब बस्स... अब बस्स...! ( यमकेने फोन घेतला बोलू लागला)यमके : नमस्ते भाई... कैसे याद किया...पीके : शाब्बास भावा यमके!यमके : अरे भाई, वो शाब्बास राहुल है यमके नही! और तुमकू सावज-बिवज की माहिती चाहिये तो मेरे पास नही.पीके : शाब्बास तुझे ही बोला, क्योंकि तूने साप छोडनेवाला रिपोर्ट जो दिया था...यमके : भाई, अब मराठीमेच बोलता... आषाढी वारी हा मराठीभूमीचा श्रद्धेचा सोहळा असतो. तिथे वाईट काम करणाऱ्याला थाराच नसतो...पीके : मुझे मालूम है, लेकिन मैने शाब्बासकी दुसरे कारण से दी है...यमके : हो, बहुतेक महागुरूंनी मराठा आरक्षणासंदर्भात ज्या कंड्या पिकविण्याचा प्रयत्न केला असता तो मी होऊ दिला नाही. म्हणूनच ना...( यमकेने नारदमुनींचे नाव उच्चारताच इच्छा नसताना एखाद्याने फेसबुकवर आपल्याला टॅग करावे अगदी तस्सेच तेथे महागुरू नारद प्रकटले...)नारायण... नारायण!नारद : काय यमके-पीके? कोण आणि कसल्या कंड्या पिकवतो आहे? (महागुरूच्या प्रश्नाने यमके चपापला.. )यमके : प..प्रणाम महागुरू... काही नाही. पीके हिराणींच्या ‘संजू’च्या यशाच्या व हिंदीतील सैराट ‘धडक’ ची भट्टी जमली नसल्याच्या कंड्या मी पिकवत होतो...नारद : असत्य बोलतोस..सरकारला जागे करायचे म्हणजे नक्की काय? प्रत्येक गावात तुमचे दोन गट. एका गटाने काही तरी केले म्हणून दुसरा गट काही तरी करणारच! राज्य पातळीवरील नेत्यांचेही तसेच..अनेक नेते आणि अनेक गट. कुणी गनिमी कावा,कुणी आसूडाची तर कुणी गांधीगिरीची भाषा करतोय. मला कंड्या पिकवतो म्हणता...यमके : गुरुवर्य सगळे नेते त्यांचाच अजेंडा पुढे सरकवताहेत. उद्धवांना अचानक राम मंदिराची ओढ लागलीय. जिनिअस राज आपल्याच ढंगात आहेत. पवारसाहेब पण कडेकडेनेच पोहतायत.नारद : म्हणूनच नरेंद्रभाऊंच्या साक्षीने निघालेला विशेष अधिवेशनाचा मार्ग बरा...

(तिरकस)

टॅग्स :Politicsराजकारण