शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

आत्मनिर्भर कुलकर्णीकाकांचा व्हॅलेण्टाइन प्रॉब्लेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2021 06:43 IST

हल्लीतर ‘लग्नाआधी आम्ही दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये होतो’, असं जाहीर मुलाखतीत सांगतात पोरं. कुलकर्णीकाका काय बोलणार?

- अपर्णा वेलणकर, फिचर एडिटर, लोकमतकुलकर्णीकाका कोथरुडला राहातात. हल्ली व्हॅलेण्टाइन ‘डे’ आला, की बाकी कुणाला फरक पडत नाही; पण काकांना उगीच आशा लागते. जर्मनीत राहाणाऱ्या मुलींची त्यांना फार काळजी आहे. एवढी हुशार मुलगी,  तिचं  ‘रिलेशनशिप स्टेटस’ अजून सिंगल असावं?  बर्लीनचा जॉब घेऊन भुर्र उडाली, तेव्हा काकांचा स्वदेशी ऊर अभिमानाने भरून आला होता!  पण आता पंचविशी  सरली लेकीची, निदान तिने कुणा एकाला ‘कमीट’ करावं असं फार त्यांच्या मनात आहे. व्हॅलेण्टाइन डेचे ते लाल बदाम, फुगेबिगे बघितले की हल्ली काकांना दिवसाढवळ्या स्वप्नं दिसतात. आपली लेक लाल ड्रेस  घालून उभी आहे, तिचा बॉयफ्रेण्ड गुलाबाचं फूल देऊन तिला प्रपोझ वैगेरे करतो आहे.. आहा!! काकू परवाच म्हणाल्या, ‘हल्लीची मुलं आता इतकी  ‘ही’ राहिली नाहीत! नाहीतर जाल उगीच ती बदामाच्या फुग्यांची दुकानं फोडायला!’ - तसे काका गप्पच बसले ! काकू नेमक्या वेळी नेमकी खपली काढतात.

वीसेक वर्षांपूर्वी व्हॅलेण्टाइन  डेची थेरं सुरू झाली तेव्हा रक्त उसळलं होतं काकांचं. शिवसेना उभी राहिली या गुलाबी वादळाच्या विरोधात! मग बजरंग दलवाले.  ‘जहां दिखेंगे बाबू शोना, तोड देंगे शरीरका कोनाकोना’ अशा  तेजस्वी घोषणा ऐकून काका थरारले होते. प्रेमाचा बाजार भरवता काय, म्हणून बहुराष्ट्रीय कंपन्यांचे गळे धरले होते सैनिकांनी ! व्हॅलेण्टाइनचे बदाम विकणारी झगमगती दुकानं फोडली, रस्त्यावर राडे घातले. कॉलेजात हातात हात घालून फिरणाऱ्या  जोड्यांचा पाठलाग केला, जरा लगट दिसली की पोरा-पोरींची गचांडी धरली. काका तेव्हा ऐन तिशीत! पदरात पोर पाच-सात वर्षांची!! प्रेमबिम काय ते चार भिंतींच्या आत आणि लग्नानंतरच, हे त्यांना मान्यच होतं तेव्हा. मुख्य म्हणजे आपल्या देशी मुला-मुलींना अशी खुल्लमखुल्ला प्रेमाची परवानगी देणारा हा विदेशी व्हॅलेण्टाइन  कोण उपटसुंभ, याचा राग होता मनात.मनाने क्रांतिकारी असले तरी वर्तनाने काका मध्यममार्गीच; त्यामुळे बजरंगी सैनिकांचे राडे त्यांनी कोपऱ्यावर  उभे राहून पाहिले होते. पुढे मग सैनिक आणि काकांसारखे त्यांचे संस्कृतिरक्षक समर्थक यांच्याविरोधात कट केल्यासारखी टेक्नॉलॉजीने  सगळ्यांच्याच आयुष्यात घुसखोरी केली आणि रस्त्यावरच्या संस्कृतिरक्षणाची गरजच उरली नाही. काळाबरोबर बदलण्याची समजूत कुलकर्णी काकूंमध्ये असल्याने काकांच्या घरात राडे झाले नाहीत एवढंच! कॉलेजात गेलेल्या लेकीच्या बरोबरीने काकूंनी केसाला कात्री लावली. काकूंच्या पैठणीवर मिसमॅच  स्लीव्हलेस ब्लाऊज आलाय हे बघून तर त्यांना झीटच आली होती; पण काका गप्प राहिले. ग्लोबल तारुण्याने  चर्चेच्या गुऱ्हाळाचा  सोस थांबवून थेट कृतीलाच हात घातल्यावर संस्कृतिरक्षक बेकारच झाले. हल्ली सेम सेक्स रिलेशनशिप आणि लिव्ह-इनचे लढे थेट कोर्टात जाऊन लढतात. लग्नाआधी आम्ही दोन वर्षं लिव्ह-इनमध्ये होतो, असं जाहीर मुलाखतीत सांगतात पोरं.  काय बोलणार?
काकांसारख्यांची घुसमट मोडण्याचं खरं श्रेय मोदीजींचं! ते राज्यावर आले आणि आपलं ते बेमालूम झाकून दुसऱ्याचं  वाकून पाहाण्याला देशप्रेमाचा शिक्का मिळाला, शिवाय संस्कृतिरक्षणाच्या आरोळ्यांना फुकटचे अड्डे ! फेसबुकवर अकाउण्ट उघडल्यापासून, व्हाॅट्सॲपवर  भांडता यायला लागल्यापासून अनेकांच्या ‘स्वदेश-प्रेमा’ची कोंडी एकदम फुटलीच! काकांना मोदीजींचं सगळं पटतं. कधी नव्हे तो देशाचा पंतप्रधान देशाला आत्मनिर्भर करायच्या वेडाने झपाटलेला आहे, तर आपण त्याच्या मागे उभं असायला नको का, असा त्यांचा साधा सवाल आहे. फक्त आपल्या लेकीचं लग्न ठरलं पाह्यजे. तिला जर्मन बॉयफ्रेण्ड मिळाला, त्याच्याशीच लग्न झालं तर मग व्हिसाचे प्रश्नही सुटतील तिचे, हेही काकांना पटलंच आहे.  ती आत्ताच  कुणातरी स्पेशल मित्राबरोबर ‘लिव्ह-इन’मध्ये राहात असावी, अशी सुखद शंका काकांना हल्ली येते. बरंचय की! लग्नाआधीच पुरती ओळख असली की नंतरच्या कटकटी टळतील. त्यातून उद्या व्हॅलेण्टाइन डे... त्यांच्यात काही झालं, आणि लेकीचा व्हिडिओ कॉल आला रात्री तर..? - काकांचं स्वदेशी, आत्मनिर्भर हृदय कधीची वाट पाहातं आहे. नाहीतर पासपोर्ट काढला, तो फुकटच जायचा!aparna.velankar@lokmat.com

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डेShiv SenaशिवसेनाNarendra Modiनरेंद्र मोदी