शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठांना हवी सुरक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 01:53 IST

वृद्धत्वाची ही एक बाजू. ज्येष्ठ नागरिकांना साथच मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणा-यांची दु:खे वेगळीच; पण आर्थिक पातळीवर चांगली परिस्थिती असूनही ही साथ मिळतेच, असे नाही. अगदी पैसे देऊन ‘केअरटेकर’ म्हणजे वैयक्तिक सहायक नेमला तरी तो जिवावर उठू शकतो.

सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वात दे,उन्हामधल्या म्हाताºयाला फक्त तुझा हात दे !वृद्धत्वाची ही एक बाजू. ज्येष्ठ नागरिकांना साथच मिळत नाही. आर्थिकदृष्ट्या परावलंबी असणा-यांची दु:खे वेगळीच; पण आर्थिक पातळीवर चांगली परिस्थिती असूनही ही साथ मिळतेच, असे नाही. अगदी पैसे देऊन ‘केअरटेकर’ म्हणजे वैयक्तिक सहायक नेमला तरी तो जिवावर उठू शकतो. पुण्यातील दीपाली कोल्हटकर यांच्या भीषण खुनाच्या प्रकारातून ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आला आहे. हा केवळ एकच प्रकार नाही. मुंबईतही ज्येष्ठांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्याची राजधानी ज्येष्ठांसाठी असुरक्षित बनली आहे; असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. संपूर्ण राज्यात गेल्या काही वर्षांत एकाकी वृद्धांच्या खुनाच्या घटनांतही वाढ होत आहे. बहुतांश वेळा घरातील नोकरांकडून असे प्रकार होतात. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत या घटनांचे प्रमाण मोठे आहे. राष्टÑीय गुन्हे अहवालातही याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. वैद्यकीय उपचारांच्या सुविधा आणि चांगले जीवनमान यामुळे देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत आहे. अनेक जण आर्थिक प्रश्नांमुळे जर्जर झालेले आहेत. पण, ज्यांनी आयुष्याचे व्यवस्थित नियोजन केले, मुलांनीही माता-पित्यांना वाºयावर सोडले नाही अशांचेही प्रश्न यानिमित्ताने पुढे आले आहेत. राज्यात ज्येष्ठ नागरिकांचे धोरणच तयार नाही. यामध्ये ज्येष्ठांना विविध सुविधा पुरविण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेची हमीही देण्याचे प्रस्तावित आहे. यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शहरांमध्ये अनेक ज्येष्ठ नागरिकांना एकटे राहावे लागते. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांना नोकर किंवा परिचारिकांची सेवा घेता येते. परंतु, शॉप अ‍ॅक्टच्या एका परवान्यावर सुरू होणाºया या संस्थांची माहिती पोलिसांनी संकलित करणे आवश्यक आहे. आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी याबाबत विधान परिषदेत लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर प्रत्येक शहरातील पोलीस आयुक्तालयात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात आला. सामाजिक न्याय मंत्रालयाच्या अखत्यारीत हा विषय आहे. परंतु, या मंत्रालयाला ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष द्यायलाच वेळ नाही. वृद्धाश्रम या कल्पनेकडे वाईट अर्थाने पाहिले जाते; परंतु चौकोनी कुटुंबांमुळे ते आता गरजेचे आहेत. किमान सुरक्षितता तेथे लाभते. मात्र, शासनाने चार वर्षांपासून वृद्धाश्रमांचे अनुदान बंद केले आहे. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढणार आहे. वैद्यकीय, निवास यासारख्या आर्थिक पातळीवरील सुविधांचा विचार करताना सुरक्षिततेचा मुद्दा डोळ्यांआड करून चालणार नाही. यासाठी केवळ शासनानेच नव्हे, तर समाजानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र