शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

शिष्यवृत्तीची खैरात! वेतन मर्यादा अध्यादेशाने वाढवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 20:02 IST

स्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली, मात्र आजही आपल्याकडे शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांची संख्या मोठी आहे़, त्याची कारणे वेगवेगळी असतील. 

- विनायक पात्रुडकरस्वातंत्र्य मिळून सहा दशके झाली, मात्र आजही आपल्याकडे शिक्षण घेऊ न शकणाऱ्यांची संख्या मोठी आहे़, त्याची कारणे वेगवेगळी असतील. शिक्षण सर्वांना मिळावे यासाठी मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा केंद्र सरकारने मंजूर केला. हा कायदा करून दहा वर्षे झाली, तरीही आपला देश अर्धाही साक्षर झालेला नाही, अशीही शिक्षण संस्थेची व्यथा. त्यातच राज्य शासनाने आता नवीन अध्यादेश जारी केला आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या शिष्यवृत्तीची वेतन मर्यादा या अध्यादेशाने वाढवण्यात आली आहे. दहावीला ५० टक्के गुण मिळाले असतील व त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३० हजार रुपये असेल तर त्याला दोन वर्षांसाठी १६०० रुपये व त्या पुढील तीन वर्षांसाठी ३२०० रुपये शिष्यवृत्ती मिळते. नव्या अध्यादेशानुसार उत्पन्न मर्यादा ३ लाख रुपये करण्यात आली आहे. ३ लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलाला शिष्यवृत्ती मिळावी की नाही हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. मात्र गरजू विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळतो का यावर आधी संशोधन व्हायला हवे. गेल्या दोन वर्षांचा काळा बघितला तर काही मुलींनी आईवडिलांकडे शिक्षण खर्चासाठी पैसे नसल्याने आत्महत्या केली आहे. एका मुलीने बस पाससाठी पैसे नाहीत म्हणून आत्महत्या केली. ही प्रकरणे घडल्यानंतर सर्व स्तरातून सरकार व प्रशासनावर टीका झाली. पुढे सर्व निवळले. या दोन्ही घटना ग्रामीण भागातील होत्या. शहरी भागात तर शाळेचे शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्याला थेट शाळेतून घरी पाठवले जाते. शुल्क न भरल्यास परीक्षेला बसू दिले जात नाही. अशी प्रकरणे वारंवार घडतच असतात. ही प्रकरणे हाताळण्याऐवजी शासनाने शिष्यवृत्तीची दालने सर्वांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. शिक्षण प्रगत समाज घडवतो, शिक्षणाने वैचारिक पिढी तयार होते, त्यामुळे शिक्षणाचा आग्रह आजवरच्या प्रत्येक राष्ट्रीय नेत्याने केला. शिक्षणाची द्वारे सर्वांसाठी खुले करण्यासाठी संर्घष झाला. संघर्ष यशस्वीही झाला. तरीदेखील शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात कोणतेच सरकार यशस्वी ठरले नाही. कोट्यवधी रूपयांच्या योजना शिक्षणासाठी आखल्या जातात. या योजनांचा लाभ मूळ लाभार्थींना मिळेल याची व्यवस्था केली जात नाही़ दुसरीकडे शिक्षणाचा बाजार मांडून अनेक जण शिक्षण महर्षी झाले. शिक्षणाचा मात्र दिवसेंदिवस दर्जा खालावत गेला. अशा परिस्थितीत गरजूंना मिळणा-या लाभाचा वाटा काढणे योग्य नाही. गरजूंना शिक्षण कसे मिळेल याकडे अधिक लक्ष द्यायला हवे. तरच भविष्यातील आदर्श पिढीची स्वप्ने आपण बघू शकतो.