शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

सदाभाऊ, दगडांचा मार आता लागला का ?

By वसंत भोसले | Updated: February 27, 2018 00:29 IST

सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या वाहनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्यामुळे सदाभाऊ खोत आणि खासदार राजू शेट्टी यांच्यातील वाद पुन्हा तीव्र झाला आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. या संघर्षात शेतकºयांचेच नुकसान होणार आहे.शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी भाजपबरोबर आघाडी करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा ‘गिधाडे राजहंस कधी झाली’ असा सवाल करत ‘स्वाभिमान’ सिद्ध करण्याची शपथ राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत या तरुण कार्यकर्त्यांनी घेतली होती. त्याची पार्श्वभूमी अशी होती की, ‘सर्व राजकीय पक्षांचे नेते शेतकरीविरोधी आहेत आणि भाजप-शिवसेनेचे नेते जातीयवादाचा आधार घेणारी गिधाडे आहेत,’ अशी जहरी टीका त्यांनी केली होती. राजकारण्यांमुळे शेतकरी चळवळीचे अतोनात नुकसान होते, यावर त्यांची ठाम मते होती. याच संघर्षातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना एकविसाव्या शतकाच्या पहाटे झाली.सुमारे वीस वर्षे सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांनी खांद्याला खांदा लावून शेतकºयांच्या हितासाठी म्हणून चळवळ केली. भाजपसारख्या राजकीय पक्षाशी आघाडी करायलाही त्यांचा ठाम विरोध होता. त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांवर वारेमाप आरोप करण्यात येत होते. दरवर्षी गळीत हंगामाच्या प्रारंभी जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) येथे होणाºया ऊस परिषदेत ‘मुलुखमैदान तोफ’ म्हणून सदाभाऊ खोत मिरवत होते. या विशेषणाने त्यांना भरते यायचे आणि शरद पवार, आर. आर. पाटील, अजित पवार, विलासराव देशमुख आदींच्यावर ते जोरदार टीका करायचे.उसाला किफायतशीर भाव मिळावा म्हणून झालेल्या अनेक आंदोलनांत दगडांचा वापर झालाच नाही, असे छातीवर हात ठेवून सदाभाऊ यांनी राजू शेट्टी यांना सांगून टाकावे, म्हणजे एकदा लोकांना ‘कालचे राजहंस आज गिधाडा’सारखे एकमेकांचे लचके कसे तोडत आहेत, हे तरी समजेल. राजू शेट्टी म्हणतात, हा शेतकºयांचा संताप आहे. सदाभाऊ त्यांच्या गाडीत असते तर त्यांच्या पुढची भाषा बोलून मोकळे झाले असते. आपण ‘मुलखावेगळे तोफखाने’ आहोत, हे सिद्ध केले असते.राजू शेट्टी यांना लवकर समजले की, भाजपची धोरणे काही शेतकºयांच्या हिताची नाहीत. सदाभाऊ खोतांना मंत्रिपदावर असेपर्यंत असे वाटणे शक्य नाही; पूर्वी दगडफेक करणारी शेतकरी चळवळ होती आणि आता दगडफेक झाल्यावर अंगाला मार लागतो का? चार क्रांतिकारी निर्णय सदाभाऊ खोत यांनी राज्याचे कृषिमंत्री म्हणून घेतल्याचे सांगावे. मंत्री होताच दररोज आठवडी बाजारपेठांचे उद्घाटन करत होता, त्यापैकी एकतरी सुरू असल्याचे दाखवावे. कोल्हापूर बाजारसमितीलाच गूळ खरेदी करण्याचा प्रस्ताव आपण दिला होता. किती रवे खरेदी झाले ते जाहीर करावे? चाळीस हजार एकराला पाणी देणारी तुमच्या जिल्ह्यातील (सांगली) म्हैशाळ पाणी उपसा योजना या वर्षी सुरू करता आली नाही, हे अपयश कुणाचे आहे?काही तरी कामे करा, शेतकरी चळवळ करण्यासाठी आंदोलने करताना दगड उचलू नये; असे धोरण आधीपासून (तीस वर्षे शेतकरी चळवळीत आपण घालविली) स्वीकारले असते, तर त्याचा मार आता लागला नसता. तुरीविषयी सरकारचे काही चुकलेच नाही, तरीसुद्धा लातूर बाजारसमितीत तूर टाकून शेतकरी रडत- रडत घरी परतला, हे आपण सत्तेवर आल्यानंतर घडलेच नाही, असे कुणी मानावे; तो मान्य करा असा तुमचा हट्ट असेल तर तो कोण पुरा करणार? हट्ट पुरविण्यास आता तुम्ही दोघे (सदाभाऊ व राजू शेट्टी) लहान राहिला नाहीत. तुमच्या भांडणातून महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीचे कसे भले होणार, हे तरी एकदा सांगून टाका, म्हणजे शेतकरी चाबकाचा नाद सोडतील.- वसंत भोसले (  bhosale.vasant@lokmat.com)

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Raju Shettyराजू शेट्टी