शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

यशस्वीपणाच्या मोजमापनातील धोके?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 04:27 IST

कार्यक्रम जलदगतीने प्रस्तुत करणाऱ्या व्यासपीठांचा (ओटीटी) विचार केल्यास तंत्र आणि गुणवत्ता या परस्परसंबंधाचे मूल्यमापन अधिक स्पष्टपणे अधोरेखित करता येऊ शकते

संतोष देसाई

भारतातील दूरचित्रवाणींवरील बातम्या आणि बव्हंशी कार्यक्रम दुय्यम ठरण्यामागचे एकमेव कारण म्हणजे यशस्वीपणा, लोकप्रियता या संबंधीची मूल्यमापन करण्याची पद्धत होय. कार्यक्रमांची गुणवत्ता हीच आज एकमेव मूल्यमापनाची पद्धत असून, तीदेखील मिनिटागणिक आधारावरच केली जाते. तंत्रशास्त्रीयदृष्ट्या प्रत्येक क्षणाला दर्शकांच्या लक्षवेधीपणाची नोंद करता येऊ शकते. प्रेक्षकांना सातत्याने कसे खिळवून ठेवता येईल, हे दूरचित्रवाणी वाहिन्या जाणून असतात. त्यासाठी दर सेकंदाला काही तरी नाट्यमयता दाखविण्यावर भर दिला जातो. जेणेकरून दर्शकांचे लक्ष दुसरीकडे वळणार नाही. अभिरुची नव्हे, तर उदासीनता, बेपर्वाई हाच दूरचित्रवाणींचा मोठा शत्रू आहे. हाच दूरगामी प्रभाव रूढ होत जातो आणि सर्व वृत्त वा मनोरजंन वाहिन्या हा फंडा वापरतात. दर्शकांना सातत्याने उत्तेजन देणे, हीच खरी युक्ती होय.

सत्य, समतोल, हुशारी, चिंतन आणि विश्लेषण या बाबी अलहिदा ठरतात. जेव्हा आपण एक वा दोन वाहिन्यांना दुराचार, तुच्छपणाबाबत सर्वाधिक दोषी मानतो; परंतु काही अपवाद वगळता भारतातील सर्व दूरचित्रवाहिन्या ही संहिता अंगीकारतात. वृत्तपत्रांच्या बाबतीत असला प्रकार खूप कमी प्रमाणात होत असला तरी विषय, आशय यात तफावत असली तरी खरी मेख मूल्यमापनात आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या लोकप्रियतेचा मापदंड दर्शक मानला जातो, त्याचप्रमाणे वृत्तपत्रांबाबतीत खप आणि वाचक संख्येच्या आधारावर लोकप्रियतेचे मोजमाप केले जाते. हे मापन समग्र स्वरूपाचे असते. वाचक वृत्तपत्र वाचण्यासाठी किती वेळ देतात, हे खात्रीने सांगता येणार नाही. तथापि, व्यक्तिश: आधारावर नव्हे, तर वृत्तपत्राचे मूल्यमापन पूर्णत्वाने केले जाते. असे असते तर बव्हंशी अग्रलेख आणि स्तंभलेख नगण्य वाचकांमुळे केव्हाच गायब झाले असते. वास्तविक पाहता दूरचित्रवाणीच्या तुलनेत वृत्तपत्रांत विविध विषयांवरील वाचनीय लेखांसाठी अधिक जागा दिली जाते.

 माहिती, कार्यक्रम जलदगतीने प्रस्तुत करणाऱ्या व्यासपीठांचा (ओटीटी) विचार केल्यास तंत्र आणि गुणवत्ता या परस्परसंबंधाचे मूल्यमापन अधिक स्पष्टपणे अधोरेखित करता येऊ शकते. या व्यासपीठांवरून विषयनिहाय कार्यक्रम प्रसारित केले जातात. तथापि, त्यांची कार्यरचना पूर्णत: वेगळ्या धाटणीची असते. संकुचित मूल्यमापनाच्या दबावापासून मुक्त होता येते. यासाठी एकच सूत्र न वापरता विविध कथासूत्र, सुरस, मनोरंजक कथा आणि तंत्राचा वापर करून दर्शकांची रुची आणि गरज वेळेत पूर्ण करणे शक्य आहे. सदस्य वा वर्गणीदार प्रारूपाचे बलस्थान व्यावहारिकतेत नव्हे, तर अधोमुखी होण्यात असते. वेळ, काळ अंतर्भूत, एकात्मिक असतो, पृथक नसतो. बाजारातील स्थान पूर्ववत करता येते. समग्र अनुभवावर दर्शक, वाचक संख्या राखता येते. प्रत्येक व्यक्तिगत घटनांची चिंता करण्याची गरज नाही, तसेच आलेख कमी झाला म्हणून भरकटण्याचीही आवश्यकता नाही. कार्यक्रमांना आपला दर्शकवर्ग शोधण्यात वेळ लागू शकतो. परिणामी, वृत्तचित्र आणि अपूर्व विषयावर आधारित कार्यक्रमांना लोकप्रियता मिळते. भारतात टेलिव्हिजन ही एक सेवा आहे, यात तीळमात्र शंका नाही; परंतु आजवर ग्राहकांकडे पसंतीच्या वाहिन्या निवडण्याचा पर्याय नव्हता. कोणी ग्राहक असो वा नसो, तरी ग्राहकांची मानसिकता काम करीत असते. उबेरमध्ये चालक आणि प्रवाशाचा सहभाग असतो. हे दोन्ही घटक परस्परपूरक भविष्यातील सेवेची गुणवत्ता आणि अपेक्षित बदल या दृष्टीने व्यवहार करीत असतात. प्रत्येक बाबीच्या अनुषंगाने हे दोन्ही पक्ष एक, दुसºयाला प्रेरक असतात. बाजार यंत्रणा मूल्यनिर्धारण आणि मागणी व पुरवठा या पलीकडे काम करीत असते. आता ही यंत्रणा एखाद्याच्या अनुभवी गुणवत्तेला आकार देते.

खाद्यपदार्थ वितरण कंपन्यांच्या बाबतीतही हीच बाब लागू पडते. ग्राहक मानांकन पूर्णत: नव्याने निश्चित करते आणि प्रतिष्ठा, लौकिक नष्टही करू शकते. चांगला गुणात्मक अनुभव दिल्यास अनधिकृत ठिकाणे लोकप्रिय होऊ शकतात. परिणामी, थोड्याच अवधीत सर्वश्रुत पर्याय कमी होऊ शकतात. हा नवीन उपक्रम आणि सहअस्तित्वाची रचना पूर्णत: बाजारपेठेनेच निर्माण केलेली आहे. तथापि, ती पूर्णत: कसोटीवर उतरणे बाकी आहे. हा नफ्याचा व्यवसाय होईल, याच आशेने उद्योग, भांडवलदारांनी यात पैसा गुंतविलेला असतो. नुकसान वा तोटा होऊ नये म्हणून गुणवत्तेचा विचार केला जातो. हा दृष्टिकोन सर्वत्र अंगीकारला जातो आणि तो ग्राहक आधारित आहे. तत्काळ तोटा वा नुकसान या पलीकडचा विचार न करता अशा प्रकारची जोखीम पत्करावी लागते. ग्राहकी प्रारूप हे आपल्या जीवनानुभवाशी संलग्न असते. संबंध हे ग्राहकाच्या स्वरूपात आहेत. आजची स्थिती फार काळ टिकणार नाही. काळानुसार स्पर्धा वाढत जाईल, तशी व्यासपीठे पृथक होतील, गं्रथालये आकसतील आणि मूल्यमापनावरील दबाव वाढत जाईल. संकुचित मूल्यमापनामुळे उभारी घेण्यास आणि चिरस्थायी मूल्यांसाठी प्रोत्साहन कमी मिळते. समाधानकारक माहिती वा मनोरंजनाच्या मार्गातील आपली वाढती अधीरता हाच मोठा वैरी आहे.(लेखक फ्यूचर ब्रॅण्ड्स कंपनीचे माजी सीईओ आहेत)

टॅग्स :Televisionटेलिव्हिजन