शहरं
Join us  
Trending Stories
1
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
2
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
3
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
4
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
5
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
6
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
7
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
8
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
9
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
10
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
11
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
12
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
13
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
14
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
15
हा घ्या पुरावा! पाकिस्तान पुसतोय 'ऑपरेशन सिंदूर'च्या खुणा; एअर बेसवरील बिल्डिंग लाल ताडपत्रीने झाकली
16
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
17
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
18
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
19
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
20
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
Daily Top 2Weekly Top 5

काळाने घेतलेला सूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:17 IST

प्रत्येक झेंड्याला एक इतिहास असतो तसा तो तिरंग्यालाही आहे. महात्मा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे झेंडा ही प्रत्येक देशाची अत्यावश्यक गरज आहे. कारण तो त्या देशाचा आदर्श असतो, ओळख असते, कारण प्रत्येक माणूस त्याच्यासाठी जगतो, मरतो व त्याच्या सन्मानासाठीच इतिहास लिहिला जातो.

प्रत्येक झेंड्याला एक इतिहास असतो तसा तो तिरंग्यालाही आहे. महात्मा गांधींच्या म्हणण्याप्रमाणे झेंडा ही प्रत्येक देशाची अत्यावश्यक गरज आहे. कारण तो त्या देशाचा आदर्श असतो, ओळख असते, कारण प्रत्येक माणूस त्याच्यासाठी जगतो, मरतो व त्याच्या सन्मानासाठीच इतिहास लिहिला जातो.बाकी काही नाही, पण भारतीय जनता पक्षाकडे विनोदबुद्धी चांगली आहे, हे दिसायला लागले आहे. येत्या प्रजासत्ताकदिनी भाजप एक तिरंगा रॅली काढणार आहे अशी बातमी वाचली म्हणून त्यांच्या विनोदबुद्धीची कल्पना आली.७ आॅगस्ट १९०६ साली कलकत्ता येथील पारसी बागान स्क्वेअर म्हणजे आताचे ग्रीन पार्क येथे हा ध्वज फडकविण्यात आला. या ध्वजामध्ये लाल, पिवळा आणि हिरवा हे तीन रंग होते. सन १९०६ मध्ये मॅडम कामा आणि तिच्या भारताबाहेरच्या क्रांतिकारकांच्या बंदिवासातून पॅरिसमध्ये दुसरा ध्वज फडकवण्यात आला. तो समान रंगाचा होता. तिसरा भारतीय ध्वज अ‍ॅनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांनी Home Rule Movement दरम्यान फडकवला. त्याच्यामध्ये पाच लाल व चार हिरव्या रंगाच्या आडव्या पट्ट्या होत्या. त्यामध्ये एका कोपºयात इंग्लंडचा झेंडादेखील समाविष्ट होता.१९२१ साली आंध्रमधील पिंगाली व्यंकय्या नावाच्या एका तरुणाने बेझवाडा (विजयवाडा) येथे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सत्रामध्ये एक झेंडा तयार केला व तो महात्मा गांधीजींना दाखवला. त्यामध्ये दोन रंग होते लाल आणि हिरवा. गांधीजींनी त्यामध्ये एक पांढ-या रंगाचा पट्टा द्यायला सांगितला आणि त्यामध्ये एक चरखादेखील घेतला. संविधान सभेचे अध्यक्ष असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांच्या नेतृत्वाखालील संविधान सभेने संविधानामध्ये तिरंग्याचा समावेश करून त्याला राष्ट्रीय ध्वज म्हणून २२ जुलै १९४७ ला मान्यता दिली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी स्वातंत्र्याच्या पहिल्या मध्यरात्री इंग्लंडचा झेंडा खाली उतरवला आणि भारतीय अस्मितेची परंपरा असलेला तिरंगा डौलाने फडकू लागला. पण अधिकृतरीत्या २६ जानेवारी १९५० साली जेव्हा हे राष्ट्र प्रजासत्ताक झाले तेव्हापासून या झेंड्याला अधिकृत मान्यता मिळाली.१४ आॅगस्ट १९४७ ला Organiser या संघाच्या मुखपत्रामध्ये दीनदयाल उपाध्याय यांनी लिहिले की, नशिबाने जे स्वातंत्र्य मिळवून सत्तेवर आले आहेत आणि जे आता आम्हाला जबरदस्तीने तिरंगा हातात देत आहेत त्यांनी लक्षात ठेवावे की हिंदू या झेंड्याला कधीच स्वत:चा म्हणणार नाही. गोळवलकर म्हणाले आपले राष्ट्र हे अतिप्राचीन आणि देदीप्यमान इतिहास असलेले आहे. आपण हे कसे विसरू शकतो की आपल्या राष्ट्राला ध्वज आणि झेंडा नव्हता. होय... माझे म्हणणे आहे तो होता आणि त्यामुळेच त्यांनीही त्या तिरंग्याला विरोध केला होता. मात्र वल्लभभाई पटेल यांनी ठणकावून सांगितले होते की भारतातील प्रत्येक व्यक्तीने तिरंगा हाच राष्ट्रीय ध्वज म्हणून स्वीकारला पाहिजे.जेव्हा देशभर स्वातंत्र्याची आतषबाजी होत होती आणि तिरंगा डौलाने फडकत होता तेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात कुठलीही भूमिका न घेणाºयांनी स्वत:च्या दारावर स्वातंत्र्याचा निषेध करणारे काळे झेंडे फडकावले. त्यानंतर ७० वर्षात RSS  च्या जनसंघाच्या कुठल्याही कार्यालयावर कधीच तिरंगा डौलाने फडकताना दिसला नाही. मात्र काही जिगरबाज तरुणांनी २६ जानेवारी, २००१ ला RSS  च्या मुख्य कार्यालयात घुसून तिरंगा फडकवला. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच तिथे तिरंगा फडकला होता. ज्यांनी आयुष्यभर तिरंग्याला विरोध केला, तिरंग्याचा अपमान केला त्यांनाच आज गल्लोगल्ली तिरंगा घेऊन फिरावा लागतो आहे. हा काळाने त्यांच्यावर घेतलेला सूड आहे. म्हणून मला एवढेच म्हणावेसे वाटते... तिरंगा झंडा झंडा नही देश का इतिहास है. कालाय: तस्मै नम:-डॉ. जितेंद्र आव्हाडआमदार, राष्ट्रवादी काँग्रेस