शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

फाशी निर्णयाच्या परिणामाचाही विचार व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 00:09 IST

१२ वर्षांच्या खालील मुलींवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा असा भावनाप्रधान निर्णय घेणे सोपे आहे़ पण, त्यामुळे बलात्कारासाठी फाशी आणि खुनासाठीही फाशीच असेल तर बलात्कारानंतर पीडितेला मारुन टाकण्याच्या घटनेत वाढ होईल, हा परिणाम लक्षात घ्यावा़

अ‍ॅड असीम सरोदे|

१२ वर्षांच्या खालील मुलींवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा असा एक भावनाप्रधान निर्णय सरकारने जाहीर केला़ प्रत्येक बलात्कार हा गंभीर असतो़ बलात्कार म्हणजे स्त्रियांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन करण्याचा अत्यंत अमानुष प्रकार आहे आणि बलात्कारासारख्या गुन्ह्यातील प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे़ परंतु, बलात्कारासाठी फाशी हा भावनिक प्रतिसाद राजकीय खेळी आहे़ सध्या बलात्कारासाठी फाशीची शिक्षा नसल्याने बलात्कारग्रस्त स्त्रीला सोडून दिले जाते़ परंतु, बलात्काराच्या गुन्ह्यासाठी फाशी व खुनासाठीही फाशी असेल तर बलात्कारानंतर पीडितेला मारून टाकण्याच्या घटनांमध्ये वाढ होईल़ हा परिणाम लक्षात घ्यावा लागेल़ १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी फाशी याचा अर्थ सरकारला इतर बलात्कार गंभीर वाटत नाहीत का असाही प्रश्न आपोआप उपस्थित होतो़ मुळातच या निर्णयामध्ये कोणतेच तर्कशास्त्र नाही़ बलात्काराच्या घटनांचा सामाजिक व गुन्हेगारी संदर्भातील अभ्यास नाही़ असोसिएशन फॉर ए डेमोक्रॅटिक रिफॉर्मस या संस्थेने १९ एप्रिल रोजी जाहीर केलेल्या अभ्यास अहवालानुसार भाजपच्या सर्वाधिक आमदार, खासदारांवर महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे आहेत़, असे सर्वत्र प्रसिद्ध झाले आहे़ देशात नुकतेच दोन ठिकाणी खळबळजनक बलात्कार झाले़ जातीय व धार्मिक रंग असलेल्या या बलात्काराबाबत भाजपचे मंत्री आणि खासदार यांनी बेताल विधाने केली़ बलात्कारांच्या घटनांबाबत तज्ज्ञ असल्याप्रमाणे बोलू नये, अशी सक्त ताकीद पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या पक्षातील लोकांना दिली़मुळात संस्कृती व धर्माच्या नावाखाली पुनरुत्पादनाची क्षमता असलेल्या स्त्री शरीरावर सतत नियंत्रण ठेवण्याची पुरुषी व्यवस्था नष्ट व्हावी़ प्रेम करणाऱ्यांना पकडून जबरदस्तीने लग्न लावून देणे बंद व्हावे़ मुलींनी जिन्स पँट, टीशर्ट घालू नका अशी बंदी घालणाºया हिंदुत्ववादी संघटना किंवा मुलींनी बुरखा वापरावा, असा आग्रह धरणाºया मुस्लीम कट्टरवादी या स्वयंघोषित संस्कृती रक्षकांचे प्रबोधन होण्याची गरज आहे़फाशीसारखी शिक्षा असण्याने गुन्हेगारी कमी होईल, हा चुकीचा समज असल्याचे सिद्ध करणारे अनेक अभ्यास आहेत़ त्यामुळे खरोखर गुन्हे थांबवायचे असतील तर कायद्यात आज लहान मुलांवर झालेल्या बलात्कारासाठी १० ते २० वर्षेपर्यंतच्या शिक्षा आहेत़ त्या शिक्षा खरोखर व्हाव्यात, चार्जशिट दाखल झाल्यावर सहा महिन्यात खटले निकालात निघावेत, हे जरी झाले तरी कायद्याचा दबदबा व आदर निर्माण होईल़चाईल्ड फ्रेंडली पोलीस स्टेशन, बालकांवरील बलात्कारांसंदर्भात संवेदनशीलतेने चौकशी करणारे पोलीस अधिकारी, लिंगाधारित राजकारण, पुरुषप्रधानता व लैंगिकता याबाबत विवेकनिष्ठ, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले विशेष न्यायालय व वकील यांची गरज पूर्ण करण्यासाठी खूप मूलभूत व सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची गरज आहे़ १२ वर्षांखालील मुलींवरील बलात्कारासाठी फाशीची शिक्षा असा अध्यादेश काढणे सोपे असते. बलात्कारांबाबत कडक भूमिका घेणाºयांचा संवदेनशील पक्ष असे मिरविण्यापेक्षा स्त्री सन्मानाची आवश्यकता वागणुकीचा भाग असल्याचे मान्य करणे म्हणजे खरा विकास आहे़ ही बाब लोकशाहीचे व्याकरण माहिती असली की लगेच लक्षात येऊ शकते़

टॅग्स :Deathमृत्यूRapeबलात्कार