शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जैन पर्युषण पर्वाचे धार्मिक महत्त्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 00:21 IST

कोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते.

- भरत जैनकोणताही धर्म असो, त्याच्या आचरणाने धार्मिक संस्कार मानवी मनावर होऊन त्याची वैचारिक बैठक चांगली राहते. शिवाय यामुळे पुण्यार्जन होऊन मोक्ष मार्गही प्रशस्त होतो. जसे दहा दिवस गणेशोत्सव, नऊ दिवस नवरात्र, २५ ते ३१ नाताळ तसा जैन समाजाचा हा दहा दिवसांचा पर्वकाळ म्हणजे एक धार्मिक सोहळा असून, सर्व जण पुण्यार्जनाचा लाभ घेतातच. ‘पर्युषण’ म्हणजे ‘उपासना’, जी स्वकल्याणासाठी केली जाते. ‘आत्मकल्याण’ म्हणजे मोक्षप्राप्तीचे ध्येय! हे फक्त मानवी जीवनातच शक्य आहे. इतर एकेंद्रीय द्विइंद्रिय जी इंद्रियांना नाही. जैन शास्त्राप्रमाणे तर स्वर्गातील देवांनाही पुण्याश्रयाने शेवटी मानवी शरीर धारण करूनच धर्माचरणाने मोक्ष मिळविता येतो. म्हणूनच याला अनन्यसाधारण महत्त्व असून, ते कसे साध्य करता येते हे आपण थोडक्यात पाहू. चिंतन सामायिक (रोजच होते) व ते पाळण्याचा संकल्प केला जातो. एखाद्याने आपले मन दुखावले, मनाविरुद्ध केले, न ऐकले तर आपल्याला राग येतो. मग शब्दाने शब्द वाढून बदल्याची भावना होते. अनेक जन्म दोघांचे त्यातच खर्ची होतात. जसे पार्श्वनाथ भगवान व कमठचे बरेच जन्म वैर भावनेतच गेले. यापेक्षा समोरच्याला त्याची चूक समजून सांंगून त्याला क्षमा करणे; मग तो लहान असो, मोठा असो, हा धर्म म्हणजे घाबरटपणा नाही. याला मोठे मन लागते. म्हणूनच म्हटले आहे, ‘क्षमा वीरस्य भूषणम्’ दुसऱ्या दिवशीचा धर्म उत्तम मार्दव आहे. ‘मार्दव’ म्हणजे मृदू स्वभाव धारण करून नम्र बनणे, नम्रता अंगीकारणे. सर्व मोठी म्हणवणारी माणसे नम्र असतात. आदिनाथ भगवंतापासून महावीरांपर्यंत सर्व अति मृदू-नम्र होते. नम्रता माणसाला मोठेपण तर देतेच शिवाय पुण्यही लाभते. तिसरा दिवस ‘आर्जव’चा आहे. म्हणजे मनाचा सरळपणा, निर्मळपणा, कोठेही कपट मनात नसते, मायाचार न करणे. शौच म्हणजे शुचिता, पवित्रता, निर्मलता, लोभाचा नाश करणे. आजचा बोकाळलेला भ्रष्टाचार ‘हा’ धर्म न अंगीकारण्यानेच आहे. सत्य बोलणे, वागणे, खोटे-लबाड न बोलणे. सत्याची नेहमीच जीत होते असे म्हटले जाते. म्हणूनच म्हणतात ‘सत्यमेव जयते’.मनाविरुद्ध घडणाºया घटनांनी मन विचलित न होऊ देता संयम बाळगणे म्हणजे स्वत:ला त्रासही होत नाही व पुण्यार्जनही होते. हे इंद्रियांना जिंकणे होय.