शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

नोंदणी आणि मिळणारे फायदे

By admin | Updated: April 24, 2016 03:42 IST

स्टार्ट अप्स विश्वाला चालना मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना चालू केल्या आहेत. मात्र, त्याचे फायदे मिळवण्यासाठी स्टार्ट अप्सची सरकारी नोंदणी करणे अनिवार्य

- कुणाल गडहिरे स्टार्ट अप्स विश्वाला चालना मिळावी, यासाठी केंद्र शासनाने अनेक महत्त्वाकांक्षी योजना चालू केल्या आहेत. मात्र, त्याचे फायदे मिळवण्यासाठी स्टार्ट अप्सची सरकारी नोंदणी करणे अनिवार्य आहे. यासाठी १ एप्रिलपासून पहिल्या टप्प्यात www.startupindia.gov.in ही स्वतंत्र वेबसाइट आणि मोबाइल अप्लिकेशन उपलब्ध केले आहे. यामुळे सरकार दप्तरी कोणतेही हेलपाटे न मारता, या माध्यमातून स्टार्ट अपची आॅनलाइन नोंदणी करणे सहज शक्य झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात कंपनीची कायदेशीर स्थापना करण्यापासून त्याची स्टार्ट अप म्हणून नोंदणी करणे, हे थेट या वेबसाइट आणि मोबाइल अप्लिकेशनच्या माध्यमातून शक्य होणार आहे. यशस्वी नोंदणी केल्यानंतर, त्याविषयीच्या प्रमाणपत्राची प्रत लगेच डिजिटल स्वरूपात (पीडीएफ स्वरूपात) मिळवता येईल. मात्र, स्टार्ट अपची नोंदणी करण्यापूर्वी त्यासाठी काही निकषांची पूर्तता करणे हे आवश्यक आहे. त्यासाठी एक निश्चित नियमावली करण्यात आली असून, त्यांची पूर्तता करणाऱ्या कंपन्यांनाच स्टार्ट अपचा दर्जा प्राप्त होईल आणि आणि त्यांच्यासाठी सुरू केलेल्या सरकारी योजनांचा लाभ घेता येईल.यात कोणत्या कंपनीला नोंदणी करता येईल ?१. प्रायव्हेट लिमिटेड कंपनी किंवा भागीदारीत सुरू केलेली कंपनी (पार्टनरशिप फर्म) अथवा एलएलपी (लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप) या प्रकारात कंपनीची नोंदणी आवश्यक आहे. २. कंपनीच्या स्थापनेला ५ वर्षे पूर्ण झालेली नसावीत. ३. कंपनीची कोणत्याही आर्थिक वर्षातील उलाढाल ही २५ कोटींपेक्षा जास्त नसावी. ४. कंपनीकडे संबंधित बौद्धिक हक्क संपदा असावी अथवा कंपनी त्यांच्या वस्तू, सेवा यांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्पादन, निर्मिती व्यवसायिकीकरण करण्याच्या क्षेत्रात काम करत असणे आवश्यक आहे. ५. कंपनीची स्थापना ही एकाच कंपनीतून वेगळी होऊन नव्याने सुरू केलेली नसावी. ६. कंपनीची स्थापना ही सध्या अस्तित्वात असलेल्या व्यवसायाची पुनर्रचना करून झालेली नसावी. वरील सर्व निकष पूर्ण करणाऱ्या कंपन्यांना, त्यांची कंपनी स्टार्ट अप म्हणून नोंदणी करण्यास योग्य आहे, हे सिद्ध करण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही एका पयार्याच्या माध्यमातून कागदोपत्री पुरावा/प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे.१औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने निश्चित केलेल्या मसुद्यानुसार कोणत्याही पदव्युत्तर महाविद्यालयातील इनक्युबेटर संस्थेकडून किंवा केंद्र अथवा राज्य शासन मान्यताप्राप्त इनक्युबेटर संस्थेकडून आपली कंपनी ही नावीन्यपूर्ण उत्पादन अथवा सेवा पुरवण्यासाठी काम करत असल्याचे शिफारसपत्र देणे. २केंद्र अथवा राज्य शासनाकडून गुंतवणूक मिळवलेल्या इनक्युबेटर संस्थेकडून मदत अथवा सहकार्य मिळत असल्यासंबंधीचे प्रमाणपत्र. ३सेबीकडे नोंदणी केलेल्या कोणत्याही गुंतवणूकदारांकडून, किमान २० टक्के इक्विटीच्या मोबदल्यात कंपनीमध्ये गुंतवणूक केली असल्याचे प्रमाणपत्र. ४केंद्र अथवा राज्य शासनाकडून एखाद्या संबंधित योजनेद्वारे कंपनीमध्ये गुंतवणूक केल्याचे प्रमाणपत्र.५व्यवसाय क्षेत्राशी संबंधित पेटंट (स्वामित्व हक्क) दाखल केल्याचा आणि त्यासंबंधी अधिकृत सरकारी जर्नलमध्ये प्रसिद्धी अथवा नोंदणी झाली असल्याचा पुरावा. नोंदणी केल्यानंतर मिळणारे प्रमुख फायदे १. स्टार्ट अप्सची कामगार कायद्यानुसार तीन वर्षे कोणतीही तपासणी केली जाणार नाही . २. स्वामित्व हक्क नोंदणी करण्यासाठी ८० टक्के सवलत दिली जाणार आहे. ३. स्वामित्व हक्क आणि बौद्धिक हक्क संपदा यांची नोंदणी जलद गतीने करता येईल. तीन वर्षे आयकर भरावा लागणार नाही. मात्र, यासाठी इंटर मिनिस्ट्रिअल बोर्डाची अनुमती मिळवणे आवश्यक आहे. ४. भांडवलाच्या गुंतवणुकीवर लागणाऱ्या करावर सवलत. कंपनी कायदेशीररीत्या बंद करण्याची प्रक्रिया आणखी जलद गतीने पूर्ण करता येईल.