शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

ना कर्जमाफी ना हमीभाव, आयटी विभाग आणि मार्केट कमिट्यांमधील ढिसाळपणाने सरकारची इभ्रत दावणीला..!

By अतुल कुलकर्णी | Updated: November 20, 2017 03:13 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देताना विशिष्ट पद्धतीचे फॉर्म भरून घेतले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी देताना विशिष्ट पद्धतीचे फॉर्म भरून घेतले. त्यात ज्या शेतक-यांना कर्जमाफी हवी आहे त्यांच्या आधारकार्डापासून ते त्यांची कोणत्या बँकेत किती खाती आहेत, त्यात नेमके कर्ज किती आहे, अशी सगळी माहिती मागितली गेली. त्यातून अनेक गंभीर गोष्टी समोर आल्या. कर्जमाफीच्या आकडेवारीत स्टेट लेव्हल बँकर्स कमिटीने ८९ लाख शेतक-यांच्या कर्जमाफीचा आकडा दिला होता. मात्र सरकारने जी माहिती आणि तपशील मागवला त्यातून आपली अडचण होत आहे हे लक्षात येताच राष्ट्रीयीकृत व व्यावसायिक अशा पाच बँकांनी आधी दिलेल्या खातेदारांची संख्या तब्बल १३,३६,१५९ लाखांनी कमी केली. सगळ्या बँकांचा मिळून हा आकडा आज किमान १६ लाखांच्यावर गेला आहे. जर पारदर्शकता ठेवली गेली नसती तर सरकारचे पर्यायाने तुमचे-आमचे पैसे बँकांच्या गंगाजळीत विनासायास गेले असते.यासाठी सरकारचे कौतुक केलेच पाहिजे. पण त्यानंतर कर्जमाफीचा जो घोळ सरकारच्या आयटी विभागाने घातला आहे त्याला तोड नाही. दिवाळीत कर्जमाफी करणार अशी मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा मागे पडली. आता २५ नोव्हेंबरपर्यंत ८० टक्के कर्जमाफी होईल, असे मुख्यमंत्र्यांना सांगावे लागले. आता त्यासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत. तरीही कर्जमाफीची गाडी तसूभरही पुढे सरकलेली नाही. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी ५५ हजार शेतकºयांची कर्जमाफी झाली असे सांगितले असले तरी वास्तव वेगळेच आहे. खासगीत या विषयाशी संबंधित सगळे अधिकारी आपली बोटे आयटी विभागाकडे दाखवून मोकळे होत आहेत. केवळ या विभागाच्या हेकेखोरपणामुळे आणि आपण सांगू ती पूर्वदिशा या वृत्तीमुळे आज ही वेळ सरकारवर आली आहे. ज्या पद्धतीची पारदर्शकता मुख्यमंत्र्यांनी या कर्जमाफीत आणण्याचा प्रयत्न केला होता तो त्यांच्याच आयटी विभागाने हाणून पाडल्याचे चित्र आज तरी आहे. मंत्रालयात कोणत्याही सचिवांना जाऊन खासगीत आयटी विभागाबद्दल मत विचारा, प्रत्येक जण टोकाची नाराजी व्यक्त करताना दिसेल. या विभागाने घातलेला घोळ सरकारला प्रचंड महागात पडला आहे. कर्जमाफीसाठी वित्त विभागाने दिलेले तब्बल पाच हजार कोटी रुपये बँका वापरत आहेत आणि शेतकरी मात्र याद्यांमध्ये आपले नाव तपासण्यात व्यस्त आहेत.जे कर्जमाफीचे झाले तेच हमी भावाच्या खरेदीचे. सहकार विभागांतर्गत येणाºया अनेक मार्केट कमिट्यांवर आजही काँग्रेस-राष्टÑवादीचा ताबा आहे. तर ग्राऊंडवर काम करणाºया अधिकाºयांच्या निष्ठा सरकारपेक्षा व्यापाºयांशी जास्त बांधल्या गेल्या आहेत. त्यामुळेच अनेक शेतकºयांच्या नावावर हजारो एकर शेतजमीन दाखवण्याचे प्रकरण उघडकीस आले. या गोष्टी उघडकीस आल्याबरोबर चौकशी करून दोषींवर तातडीने कारवाई होणे आवश्यक होते, तेही झाले नाही. कुठे तरी दोन अधिकारी निलंबित करण्याची मलमपट्टी झाली. परिणामी अधिकाºयांवर सरकार म्हणून कसलाही वचक राहिलेला नाही. तूर, मूग, उडीद आणि सोयाबीनचे पीक किती आले आणि सरकारच्या खरेदी केंद्रांनी त्यापैकी किती विकत घेतले याचीही आकडेवारी सरकार ठामपणे देऊ शकलेले नाही या सगळ्या ढिसाळपणाची जबाबदारी कोण घेणार?

टॅग्स :Mantralayaमंत्रालयDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस