शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
3
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
4
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
5
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
7
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
8
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
9
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
10
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
11
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
12
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
13
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
14
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
15
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
16
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
17
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
18
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
19
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
20
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
Daily Top 2Weekly Top 5

नूतनची पुनर्भेट..!

By admin | Updated: March 20, 2016 03:42 IST

आपल्या आवडीची माणसं तसं बघायला गेलं, तर आपल्या आसपासच असतात. कारण ती आपल्या मनात घर करून राहिलेली असतात. भले मग ती दूरवर न परतीच्या वाटेवर गेली असली तरी.

(कलाक्षरे)- रविप्रकाश कुलकर्णी

आपल्या आवडीची माणसं तसं बघायला गेलं, तर आपल्या आसपासच असतात. कारण ती आपल्या मनात घर करून राहिलेली असतात. भले मग ती दूरवर न परतीच्या वाटेवर गेली असली तरी. अभिनेत्री नूतनला जाऊन २५ वर्षे झाली (२१ फेब्रु २०१६) हे कळलं, तेव्हा असंच काहीसं मनात आलं. कारण अजूनही ‘मनमोहना बडे झुठे’ किंवा ‘काली घटा छाए मोरा जिया ललचाए’ अशी किंवा यासारखी गाणी कानावर आली की, फक्त नूतन आणि नूतनच डोळ्यापुढे येते आणि यापुढेदेखील येत राहील. मग अशा वेळी नूतनला जाऊन इतकी वर्षे झाली, असं तरी कसं वाटेल?२१ फेब्रु. २०१६ ला नूतनला जाऊन २५ वर्षे झाली. असं असूनसुद्धा नूतनसंबंधात वर्तमानपत्रात ना लेख आले, ना दूरदर्शनवर - चॅनलवर त्यासंबंधात कार्यक्रम. म्हणजे नूतन गेली आहे, असं कुणालाच वाटत नसावं, अशी माझी मीच समजून घालून घेतो... झालं. स्मरणमात्र, हे स्मरण ठेवलं लेखिका ललिता ताम्हणे यांनी. त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नूतनच्या स्मृतिजागरणाचा ‘चाँद फिर निकला’ हा कार्यक्रम केलाच, शिवाय त्या निमित्ताने ‘नूतन, असेन मी... नसेन मी...’ या पुस्तकाचं प्रकाशन केलं. प्रकाशन झालं माधुरी दीक्षित हिच्या हस्ते!आता माधुरी दीक्षित काय म्हणते पहा.गौतम राजाध्यक्ष तिचं फोटो सेशन करत होते. तेव्हा ती एकदम म्हणाली, ‘यू नो, देअर इज ओन्ली वन फेस दॅट आय आॅल्वेज फेल्ट परफेक्ट! तिच्यानंतर तुझा चेहरा!’मी म्हटलं, ‘बाप रे, कोण आहे? कोणाचा चेहरा एवढा परफेक्ट आहे?’ती म्हणाली, ‘एकच... नूतनजी!’ परफेक्ट बोन स्ट्रक्चर आणि त्याचं बोलणं पूर्णपणे पटलं! म्हणजे तुम्ही नूतनजींना जेव्हा स्क्रीनवर बघता, तेव्हा कुठल्याही अँगलने शूट केलेलं असलं, तरी त्या कधीही वाईट दिसल्या नाहीत. त्या इतक्या सहजपणे अभिनय करून जायच्या की, कुठे ओढाताण केलीय, असं कधीही वाटलं नाही. अतिशय स्वाभाविक अभिनय! म्हणजे, आयुष्यात काय किंवा अभिनयात काय, मला ज्याच्यापासून स्फूर्ती मिळते. अशा व्यक्तींपैकी एक म्हणजे नूतन! एक अभिनेत्री म्हणून मी कायम तिच्याकडे आदराने बघत असे.इथे हेही सांगायला पाहिजे की, ‘नूतन. असेन मी... नसेन मी..’ या स्मृतिगं्रथाची पहिली आवृत्ती २३ जानेवारी २००९ ला निघाली होती. तेव्हा त्याचं प्रकाशन माधुरी दीक्षितच्या हस्ते झालं होतं आणि आता नूतनच्या २५ व्या स्मृतिदिनानिमित्त चौथ्या आवृत्तीचं प्रकाशन माधुरीच्याच हस्ते झालं, हे विशेषच. ही चौथी आवृत्ती मोठ्या आकारात आणि नवीन माहिती मजकुराची भर टाकून केलेली आहे. एकप्रकारे ही नवीन आवृत्तीच म्हणता येईल.या आवृत्तीत भरगच्च मााहिती, मुलाखती बरोबरच पाहावे, अशा फोटोंची लयलूट आहे की, ते पाहताना असंख्य स्मृतींना वाटा फुटतात. या अनुभवासाठी हे पुस्तक घ्यावं...त्याच्याही पुढची गोष्ट म्हणजे, सदर पुस्तकाची इंग्लिश आवृत्तीची तयारी सुरू झाली आहे. ‘नूतन- द अनफर्गेटेबल लीजंड’ हे ४ जून २०१६ रोजी म्हणजे, नूतनच्या ८०व्या जयंतीच्या दिवशी प्रकाशित व्हायचं आहे!आता या संदर्भाने लेखिकेला-प्रकाशकांना सल्ले-सूचना येतच असणार, त्यात आणखी एकाची भर.नूतन अािण दिलीपकुमार हे जेव्हा ऐन तारुण्यात होते, तेव्हा त्यांचा एकत्र असलेला एकही चित्रपट आला नाही. पुढे आले ते म्हणजे, ‘क्रांती’, ‘कर्मा’, ‘कानून अपना अपना’. त्यापैकी ‘कर्मा’तील दोघांचा छोटा फोटो सुभाष घर्इंच्या लेखात आहे. नूतन आणि दिलीपकुमार दोघंही ऐन जवानीच्या जोशात होते, तेव्हा एक चित्रपट ‘शिकवा’ येणार होता. दुर्दैवाने हा चित्रपट आला नाही, पण या चित्रपटाच्या स्टील्स प्रकाशित झाल्या होत्या. मला वाटतं कृष्णा शहाच्या ‘फिल्म ही फिल्म’ चित्रपटातदेखील ‘शिकवा चा तुकडा असावा. सांगायच काय, तर ‘शिकवा’मधील नूतन-दिलीपकुमार असलेला सुंदर फोटो नूतनवरच्या या पुस्तकात मराठीच्या पुढच्या आवृत्तीत आणि येणाऱ्या इंग्रजी आवृत्तीत यावाच. पूर्ण पानभर आला, तर आणखी सुंदर. नूतनवरती भारत सरकारने पोस्टाचे तिकीट काढले आहे. त्याचाही समावेश पुस्तकात करावा. माझे पण थोडेसेनूतनची आणि माझी भेट सर्वसाधारण प्रेक्षकांप्रमाणे पडद्यावर के व्हाच झाली होती, पण प्रत्यक्षात भेटायचा योग काही आगळा वेगळाच.गिरगावात सेंट्रल सिनेमाच्या गल्लीत एक भली मोठी गाडी जाणं अशक्यच होतं. तेव्हा त्यातून उंच शिडशिडीत गौरवर्णी बाई साडी सावरत उतरल्या आणि खटाववाडीत चालू लागल्या. जणू तो रस्ता त्यांना ठाऊक असावा. सराईतपणे लाकडी पायऱ्यांचा जिना चढून त्यांनी विचारलं, ‘मस्त पुस्तक छापायचं आहे.’ तेथील तरुणाने खुणेनेच सांगितलं, ‘समोर.’तो जणू स्वत:शीच म्हणाला, ‘अरे नूतन!’ ती नूतनच होती.तेव्हा ‘मौज’चे छपाई विभाग प्रमुख पाठक म्हणून होते. ते पुढे आले.नूतनने एक वही काढली आणि म्हणाली याचं पुस्तक करायचं आहे.पाठक म्हणाले, ‘करू या.’ मग त्यांनी हिशेब सांगितला आणि विचारलं, ‘तुमचं नाव?’‘नूतन, नूतन बहेल’’‘म्हणजे कुमारसेन समर्थांच्या कोण?’‘ते माझे वडील.’‘मौज’चे पाठक म्हणजे एक ‘अर्क’ होते, त्यांना जगाची माहिती असायची, पण ते दाखवायचे मात्र अज्ञान. म्हणून नूतनला बोलतं ठेवायचं त्यांनी ठरवलं असावं.‘आठ दिवसांनी या...’ पाठकदरम्यान ‘मौज’च्या मजल्यावर सगळ्यांना कळलं की, नूतन आली आहे. सगळे डोकावत राहिले.आठ दिवसांनी नूतन आली. पाठकांनी पुस्तकाचे गठ्ठे तयार ठेवले होतेच. मीही तेथेच होतो.दरम्यान, सुरुवातीलाच ‘समोर’ असं बोटाने दाखवणारा तरुण पुढं आला आणि नूतनला पाहून हसला. नूतननेही त्याला प्रतिसाद दिला.लगेच त्या तरुणाने आपला ताजा कवितासंग्रह-गुरुचरित्र नूतनला दिला.नूतनने तो नम्रपणे स्वीकारला आणि म्हटलं, ‘थँक्यू’’आता हा ‘गुरुचरित्र’ संग्रह देणारा कवी म्हणजे गुरुनाथ सामंत!‘मौज’मध्ये छापलेलं पुस्तक होतं ‘गीत-संगीत ओमके’ त्यावर कर्तीचं नाव होतं, नूतन बहल. ते भजनाचं पुस्तक होतं. तेव्हा मी मात्र विचारलं, ‘मुंब्रा येथील डोंगरावर बंगला आहे तो तुमचाच का हो?’ ‘हो’ इति नूतन. पुढे त्या म्हणाल्या, ‘भेटू या कधीतरी.’ ती भेट कशी झाली, हे परत के व्हातरी.