शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमादरम्यान झाला गोळीबार  
3
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
4
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
5
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
6
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
7
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
8
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
9
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
10
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
11
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
12
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
13
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
14
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
15
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
16
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
17
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
18
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
19
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
20
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता

राजे प्रतापगडावरून उतरले !, सातारी राजधानीत हसली ‘पेशव्यांची खुर्ची’ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2018 00:11 IST

राजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साता-याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले.

- सचिन जवळकोटेराजे जेव्हा प्रतापगडावरून खाली उतरले, तेव्हा इतिहास घडला होता. गनिमाचा वेढा तोडला होता. साता-याचे थोरले राजेही शनिवारी ‘सर्किट हाऊस’च्या ‘प्रतापगड’ दालनातून स्वत:हून बाहेर पडले. चंद्रकांतदादा अन् गिरीश पंतांना भेटायला गेले. इथंच नव्या भविष्याची पेरणी झाली. फक्त गनिमाचा उलगडा झाला नाही... कारण ‘आपला गनीम नेमका कोण?’ याचा पत्ता जिथं थोरल्या राजेंनाच अद्याप लागला नाही, तिथं बिच्चा-या सातारकरांना कुठून थांगपत्ता लागावा ?गिरीश पंतांचे फ्लेक्स म्हणे राजे लावायचे..शनिवारी सायंकाळी सर्किट हाऊसच्या पोर्चमध्ये कच्कन गाड्या थांबल्या. एका आलिशान गाडीतून चंद्रकांतदादा अन् गिरीशपंत खाली उतरले. पाय-या चढून आत येताना ‘युन्नूस’ नामक सातारी मावळ्यानं त्यांच्या कानात थोरल्या राजेंचा निरोप पोहोचविला, ‘महाराज तुम्हाला भेटू इच्छितात, समोरच्या प्रतापगड सूटमध्ये थांबलेत,’ यावर दादांनी सहेतूकपणे पंतांकडं बघितलं. पंतांनी केवळ ‘बरंऽऽ बरंऽऽ’ म्हणत आपल्या ‘अजिंक्यतारा’ सूटकडे मोर्चा वळविला. बिच्चारा मावळा रिकाम्या हाती राजेंकडे गेला. काही वेळानं तोच निरोप घेऊन पुन्हा आला. यावेळीही दादा-पंत जोडी पुन्हा एकदा ‘बघूऽऽ बघूऽऽ’ म्हणतच कार्यकर्त्यांसोबत गप्पा मारण्यात रमून गेली.राजेंचा संदेश प्राप्त होऊनही शेजारच्या ‘प्रतापगड’मध्ये न जाण्यात या दोन मंत्र्यांचा ‘प्रोटोकॉल’ आडवा येत होता की गेल्या चार वर्षांतली सत्तेची ऊब हलू देत नव्हती, माहीत नाही. मात्र, तिकडं चाणाक्ष राजेंनी पटकन् निर्णय घेतला. ‘तहाला जाताना युद्धाचा आवेश आणायचा नसतो,’ ही चाणक्य निती अवलंबून ते स्वत: या दोघांना भेटण्यासाठी बाहेर पडले. ‘प्रतापगड’मधून ‘अजिंक्यतारा’ सूटमध्ये प्रवेशले.राजेंना बघताच काहीजण दचकले. काहीजण आनंदले. आश्चर्य मात्र कुणालाच वाटलं नाही. ‘हे कधी ना कधी तरी घडणारच होतं,’ असाच अविर्भाव प्रत्येकाच्या चेह-यावर. अशीच खूणगाठ प्रत्येकाच्या मनात. ‘गिरीश पंतांशी माझी खूप जुनी ओळख. ते पुण्यात नगरसेवक असताना त्यांचे फ्लेक्स आम्ही तरुणपणी लावायचो,’ ही कॉलेजमधली जुनी आठवण सांगून राजे आतमध्ये गेले. अ‍ॅन्टी चेंबरमध्ये मुख्य खुर्चीवर बसलेले गिरीश पंत समोर राजेंना पाहताच उठून उभे राहिले, ‘तुम्ही या खुर्चीवर बसा. नाहीतर पेशव्यांसमोर राजे बसले, अशी पुन्हा बातमी व्हायची,’ अशी मिश्किली करत पंतांनी त्यांना मुख्य खुर्चीवर बसविलं.खासगीत उदो-उदो.. सर्वांसमक्ष दुर्लक्ष !स्वत:ला ‘पेशवे’ म्हणवून घेत गिरीश पंतांनी ‘राजें’ना मुख्य खुर्चीवर बसविलं खरं.. परंतु, सुरुवातीला त्यांच्या निरोपानंतरही त्यांना भेटायला मात्र गेले नव्हते. ‘खासगीत उदो-उदो... सर्वांसमक्ष दुर्लक्ष,’ ही गिरीश पंतांची ‘पेशवे निती’ साता-याच्या राजेंसाठी नवी असली तरी थोरले काका बारामतीकरांच्या दरबारातील मनसबदारांकडून हाच अनुभव त्यांना आजपावेतो पदोपदी आलेला. त्यामुळं ‘पार्टी’ बदलली तरी ‘सत्तेची नशा’ तीच असते, हे ओळखण्याइतपत राजेंचे सल्लागार राजकारणात नक्कीच नवखे नसावेत. रायगडाकडे पाठ.. अजिंक्यता-याची वाट !सर्किट हाऊसमधील ‘प्रतापगड’ हा सूट काही नेत्यांचा अत्यंत आवडता. सातारी मुक्कामी अनेकांचा ठिय्या याच दालनात. याला पाठीमागूनही ये-जा करण्याची सोय असल्यानं इथं कधी आलं अन् कधी गेलं, कुणालाच समजत नाही म्हणे ( ! ). आता ‘असं का?’ हा भाबडा प्रश्न कुण्या सरळसोट सातारकरानं विचारू नये म्हणजे मिळविली. असो, याच सर्किट हाऊसमधील शेजारचा ‘अजिंक्यतारा’ सूट हा फलटणच्या राजेंचा आवडता. त्यांचा मुक्कामही नेहमी याच दालनात. त्यामुळं फलटणचे राजे ‘अजिंक्यतारा’मध्ये असताना तिकडं ढुंकूनही न बघणारे साता-याचे थोरले राजे जेव्हा पंत अन् दादांना भेटायला स्वत:हून या दालनात आले, तेव्हाच आगामी लोकसभेतल्या बदलत्या भविष्याची नांदी उपस्थितांना कळून चुकली.काळसुद्धा किती जबरी असतो पाहा. गेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी रायगडावर ‘कमळ’वाल्यांचा भलामोठ्ठा सोहळा रंगलेला. ‘मोदीं’च्या या ‘इव्हेंट’ला साता-याचे राजेही जाणार म्हणून गावोगावी त्यांच्या फोटोचे फ्लेक्स झळकलेले. मात्र, शेवटच्या क्षणी अनेक ‘कमळ’वाल्या नेत्यांच्या विनवणीला भीक न घालता राजे रायगडाकडं पाठ करून बसलेले. आज हेच राजे आपला ‘प्रतापगड’ सोडून गनिमाच्या ‘अजिंक्यतारा’वर स्वत:हून दादा-पंतांना भेटायला आलेले. यालाच म्हणतात.. काळाचा महिमा अन् सत्तेचा चमत्कार... अजून दुसरं काय? दादांकडून घड्याळाची तर राजेंकडून कमळाची चाचपणी !‘अ‍ॅन्टी चेंबर’मध्ये राजे, पंत अन् दादा जवळपास अर्धा तास बोलत बसलेले. ‘साता-याचं हवापाणी’ या विषयावर तर नक्कीच इतका वेळ चर्चा नव्हती. मात्र, जी काही झाली, ती एकमेकांना चाचपडण्याचीच... ‘राजेंनी कमळ हाती घेतलं तर बारामतीकरांचे किती बुरुज उद्ध्वस्त होतील. त्यांचे इथले किती सरदार कामाला लागतील?’ याचा शोध म्हणे पंत अन् दादा समोरच्या राजेंकडून घेत होते... तर ‘भविष्यात कमळ शंभर टक्के फुलणार काय?’ याचा अंदाज म्हणे राजे या दोघांच्या बोलण्यातून बांधत होते.‘राजेंचा बॉम्ब आपण टाकला तर जिल्हाभर कसा धुरळा उडेल ?’ याचं समीकरण हे दोघे जुळवत होते.. तर ‘बॉम्ब न फोडता केवळ कमळाचं फूल दाखवून आपल्या लाडक्या मित्राला कसं बेजार करता येईल ?’ याचं गणित म्हणे राजे बांधत होते... कारण अजितदादा रविवारपासून दोन दिवस सातारी मुक्कामी आहेत ना रावऽऽ’.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसले