शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

प्रज्ञा-प्रतिभेचे प्रश्नोत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 00:23 IST

प्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता.

- डॉ. रामचंद्र देखणेप्रज्ञा आणि प्रतिभा ही मानवी जीवनाला लाभलेली निसर्गत: देणगी आहे. कल्पनाशक्ती आणि तर्क यांच्या पलीकडे जाऊन मन थक्क होऊन जाते. राजाभोज हा प्रतिभावान राजा होता तर माघ हा प्रज्ञा-प्रतिभेचे वरदान लाभलेला विरग्ध महाकवी होता. एकदा दोघेही अरण्यातील वनश्री पहात पहात वाटचाल करत होते. दोघांचाही काव्यशास्त्र विनोद चालू होता. माघाला उगाच अहंकार वाटू लागला की, या अरण्यात राजा भोजला वनश्री इतकीच माझी प्रतिभाही आनंद देत आहे. तेवढ्यात आकाशात ढग दाटून आले. विजा चमकू लागल्या. अंधार पडला आणि पाऊस पडू लागला. बाजूला एक झोपडी होती. दोघेही झोपडीपाशी आले. आत एक म्हातारी बसली होती. पावसात भिजू नये म्हणून दोघेही आत गेले आणि म्हातारीला विचारले, ‘आजीबाई हा रस्ता कुठे जातो? ‘बाबांनो रस्ता कुठे जात नाही, या रस्त्यावरून चालणारा फक्त जात असतो. आजीच्या उत्तराने दोघेही अवाक् झाले आणि पुढे म्हणाले, ‘आजी आम्ही प्रवासी आहोत’ ‘बाबारे प्रवासी दोनच आहेत. एक सूर्य आणि दुसरा चंद्र. अखंड प्रवास करून जगाला प्रकाश देतात’ या उत्तरापुढे आता काय म्हणावे? राजा म्हणाला, ‘आजी आम्ही पाहुणे आहोत’ ‘पाहुणे तर दोनच आहेत. एक धन आणि दुसरे यौवन’ ‘आजी मी राजा आहे आणि हा पंडित’ ‘काही तरीच काय सांगता? राजा फक्त इंद्र आणि मृत्यू आहे. त्याच्या नियंत्रणात सर्व आहे आणि पंडित म्हणाल तर एक बृहस्पती आणि दुसरा शुक्राचार्य’‘आजीबाई आम्ही मजूर आहोत’‘खोटे बोलू नकोस. मजूरही दोघेच एक भूमी आणि दुसरी स्त्री. आयुष्यभर दुसऱ्यांचे भार वाहते’... ‘आजी आम्ही हरलो’‘जगात दोघेच हरलेत. एक कर्जदार आणि दुसरा मुलीचा बाप...’ प्रज्ञावान महाकवी आणि व्यासंगी राजाही आजीच्या उत्तराने निरुत्तर झाला. भोजराजाच्या दरबारातच केवळ प्रज्ञावंत माणसे नव्हती तर त्याच्या राज्यातील सामान्य झोपडीतली माणसेही किती प्रतिभावान होती. जर समजा ही घटना आजच्या वर्तमानात घडली असती तर... राजा आणि माघ आजीबाईला म्हणाले असते.‘आजीबाई तुमच्या उत्तराने आम्ही निर्भय झालो. त्यावर आजीने भाष्य केले असते, ‘निर्भय तर दोघेच असतात. एक साहित्यिक आणि दुसरा पत्रकार’ खरंतर दोघेही जीवनाचे भाष्यकार. साहित्यिकाची लेखणी ही धनुष्यासारखी असते तर पत्रकाराची लेखणी ही बाणासारखी.

टॅग्स :Natureनिसर्गnewsबातम्या