शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांका चोप्रा म्हणते, जगावरचं संकट गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 09:45 IST

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत

“आज जगात ‘विश्वबंधुता’ या मूल्याची जितकी गरज  आहे तेवढी याआधी कधीही नव्हती.” असे विधान प्रियांका चोप्राने २० सप्टेंबर रोजी संयुक्त विश्वसंघाच्या संसदेत केले. प्रियांका चोप्रा गेल्या दहा वर्षांपासून अधिक काळ ‘युनिसेफ’ची सदिच्छादूत म्हणून काम करते. या काळात तिने अनेक सामाजिक संस्थांना भेटी दिल्या आहेत आणि अनेक ठिकाणी ‘युनिसेफ’ची प्रतिनिधी म्हणून भाषणदेखील केलेले आहे. मात्र, तिच्या २० सप्टेंबर रोजी केलेल्या या भाषणाकडे एका वेगळ्या दृष्टीने बघितले जाते आहे. कारण, या भाषणात तिने काही मूलभूत मुद्दे उपस्थित केले आहेत. या भाषणात प्रियांका चोप्रा म्हणाली,  “कोरोनानंतरच्या काळात जगात, माणसांच्या आयुष्यात फार जास्त उलथापालथ झाली आहे. काेरोनाने कित्येक लोकांचे बळी घेतले. त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबीयांना पुढे टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेल्या रोजगाराच्या संधीदेखील या काळात त्यांच्याकडून हिरावल्या गेल्या. सगळ्या जगाची आर्थिक गणिते कोविडने उलटीपालटी करून टाकली; पण जगावरचे संकट काही फक्त तेवढेच नाहीये!’’प्रियांकाने या संकटाची तपशीलवार मांडणीही या व्यासपीठावरून केली.

जागतिक हवामानबदलाचे दृश्य परिणाम आता ठळकपणे दिसू लागले आहेत. बदलता पाऊस, खूप जास्त उन्हाळा किंवा थंडी या सगळ्यातून माणसांच्या आयुष्यावर अनेक नकारात्मक परिणाम होत आहेत. हवामानात होणाऱ्या बदलांमुळे शेती, पशुपालन अशा उद्योगांवर तर परिणाम होतोच आहे; पण अनेक उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालापासून अनेक बाबींवर जागतिक हवामानबदलाचा परिणाम होतो आहे आणि त्यामुळे जगभर लोकांचे रोजगार जात आहेत. रोजगाराच्या शोधात लोकांना स्वतःचे मूळ ठिकाण सोडून स्थलांतर करणे भाग पडतेय. एकीकडे भूकबळी आणि दुसरीकडे उत्पन्नातील रुंदावणारी दरी यामुळे लोकांच्या मनात अशांतता खदखदते आहे.  या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून जगाचा मूळ आधारच डळमळीत झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

 ‘‘आज असलेले जग निर्माण करण्यासाठी अनेक पिढ्यांनी वर्षानुवर्षं कष्ट घेतले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर हे सगळेच ढासळताना दिसते आहे. अर्थात ही सगळी संकटे काही आपोआप आलेली नाहीत. आपल्या सगळ्यांचीच यातील अनेक प्रश्नांकडे केलेली डोळेझाक त्याला काही प्रमाणात कारणीभूत आहे. हवामानबदल हे काही अचानक आलेले संकट नाही. तसेच गरीब आणि श्रीमंत यांच्या उत्पन्नातील दरी हे काही निसर्गनिर्मित संकट नाही. त्यामुळे आपण असं म्हणून शकत नाही की ही संकटे अचानक आली आहेत. ही संकटे निश्चितपणे सोडवता येऊ शकतात. मात्र, त्यासाठी सगळ्या जगाने एकत्र येऊन ठरलेला प्लॅन अमलात आणला पाहिजे. आपल्याकडे तो प्लॅन आहे! 

संयुक्त राष्ट्रसंघाचा सस्टेनेबल गोल्स ( शाश्वत मुल्य) हा तो प्लॅन आहे. जर सगळ्या जगाने या प्लॅनप्रमाणे वागायचं ठरवलं, तर आपण ही आलेली संकटे निश्चितपणे परतवून लावू शकतो” असा आशावादही प्रियांका चोप्राने व्यक्त केला. यापैकी प्रत्येक प्रश्नावर अनेक वेळा वेगवेगळे बोलले गेले आहे. मात्र प्रियांका चोप्राने या सगळ्या संकटांमधील अन्योन्य संबंध उलगडून दाखवल्यामुळे तिच्या या भाषणाची जगभर चर्चा होते आहे. त्याचबरोबर तिच्या या भाषणाच्या संबंधातील एक महत्त्वाचा भाग असा की बहुतेक लोकांची अपेक्षा असते की एखादी महिला, त्यातही एके काळी जगतसुंदरी असलेली महिला, त्यातही व्यावसायिक अभिनेत्री असेल तर ती जेव्हा बोलेल तेव्हा प्रामुख्याने महिलांचे प्रश्न मांडेल किंवा कुठलाही प्रश्न मांडताना महिलांना त्याच्या केंद्रस्थानी ठेवेल. मात्र, प्रियांका चोप्राने तसे केलेले नाही. तिने मांडलेला विषय हा संपूर्ण मानवजातीला संबोधित करणारा आहे. त्याअर्थी तिने अजून एक समजूत खोडून काढली आहे. ख्यातनाम स्त्री जागतिक व्यासपीठावरुन बोलते आहे म्हणजे ती केवळ स्त्रियांचे  प्रश्न मांडणार याही कल्पनेला तिने सुरुंग लावला आहे.

१७ शाश्वत विकास उद्दिष्टेगरिबी नाहीशी करणे, भूक मिटवणे, चांगले आरोग्य, उत्तम शिक्षण, स्त्री- पुरुष समानता, स्वच्छ पाणी व मलनिःस्सारण स्वस्त व स्वच्छ ऊर्जास्रोत, चांगले काम व आर्थिक वाढ, उद्योजकता, संशोधन व पायाभूत विकास, असमानता कमी करणे, शाश्वत शहरे व समाज, जबाबदार उत्पादन व वापर, हवामानबदलावर कृती, पाण्याखालील सृष्टी, जमिनीवरील सृष्टी, शांतता, न्याय व भक्कम यंत्रणा, व्यवस्था आणि ध्येय गाठण्यासाठी भागीदारी.

टॅग्स :Priyanka Chopraप्रियंका चोप्राUnited Statesअमेरिका