शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

प्रणवदांची संघवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:38 IST

प्रणव मुखर्जी हे ७ जूनला संघाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यास शिबिरात समारोपाचे पाहुणे म्हणून येत असल्याच्या घटनेने एका जुन्या वादाला देशात नवा रंग चढविला जात आहे

माजी राष्टÑपती प्रणव मुखर्जी हे ७ जूनला संघाच्या तृतीय वर्षाच्या अभ्यास शिबिरात समारोपाचे पाहुणे म्हणून येत असल्याच्या घटनेने एका जुन्या वादाला देशात नवा रंग चढविला जात आहे. प्रणव मुखर्जी ज्या दिवशी राष्ट्रपती झाले त्याच दिवशी ते पक्षातीत झाले व त्यांचा कोणताही पक्ष राहिला नाही. त्याआधीचे त्यांचे आयुष्य काँग्रेस पक्षात व त्यातील वरिष्ठ पदे भूषविण्यात गेले. ते देशाचे अर्थमंत्री होते, गृहमंत्री, परराष्टÑमंत्री, पक्षाचे प्रवक्ते आणि त्याच्या धोरणाची आखणी करणारेही ते एक नेते होते. राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांची भूमिका पक्षनिरपेक्ष व अपक्ष झाली. त्यामुळे ते आज संघाच्या किंवा उद्या कुणा संघटनेच्या व्यासपीठावर गेले तर त्याला कुणी हरकत घेण्याचे कारण नाही. संघ ही काँग्रेसविरोधी संघटना आहे आणि तिचा इतिहासही तसाच आहे. मात्र तिच्यावर बंदी नाही. त्या संघटनेने जन्माला घातलेल्या पक्षाचे सरकार लोकांनी केंद्रात सत्तेवर आणले आहे. अशावेळी प्रणव मुखर्जींनी त्या संघटनेचे निमंत्रण स्वीकारले असेल तर त्याचा एवढा गदारोळ करण्याचे कारण नाही. मुखर्जींंनी त्यांच्या भूमिका सदैव धर्मनिरपेक्ष राखल्या आहेत व त्यांच्याशी ते प्रामाणिक आहे. संघात पाऊल ठेवल्याने त्यांचा त्यांना विसर पडेल असे समजणे हा बालीशपणा आहे. एवढ्यावरही ते त्या विसरले तर उतारवयात त्यांच्या बुद्धीने घेतलेले वळण म्हणून ते साऱ्यांनी समजून घेतले पाहिजे. फार पूर्वी नेपाळच्या राजाने संघाचे असे निमंत्रण स्वीकारले होते. आंतरराष्ट्रीय राजशिष्टाचाराचे फारसे ज्ञान नसलेल्या त्या राजाला तेव्हा एका परक्या सत्तेने दुसºया देशातील राजकारणात असा हस्तक्षेप करू नये अशी समज परराष्टÑ खात्याने दिल्यानंतर त्याने तो दौरा रद्द केला होता. प्रणव मुखर्जी परके नाहीत आणि त्यांना साºयांसारखेच मतस्वातंत्र्य व संचारस्वातंत्र्यही आहे. शिवाय त्यांच्याएवढा नेता जेव्हा असा निर्णय घेतो तेव्हा त्यामागे त्याचा निश्चित विचारही असणार. प्रणव मुखर्जी हे एस.एम. कृष्णा नाहीत आणि ते कोणत्या मोहाने तेथे जात नाहीत. तसेही राष्ट्रपतीचे पद भूषविलेल्या व्यक्तीला नंतरच्या काळात कोणतेही राजकीय वा खासगी पद स्वीकारता येत नाही. प्रणव मुखर्जींना व्यासपीठांचीही गरज नाही. त्यांना ती जगभर उपलब्ध आहेत. खरे तर त्यांना बोलविण्यामागे संघाचा हेतू कोणता याचीच चर्चा या तुलनेत अधिक होणे आवश्यक आहे. आपली नकारात्मक प्रतिमा काहीशी धुवून काढणे, गांधी खुनाच्या आरोपापासून आताच्या धर्मांध प्रतिमेचे आपल्याला चिकटलेले लेपन जरा स्वच्छ करणे किंवा आम्ही फक्त सांस्कृतिक आहोत हे जगाला दाखविणे हा संघाचा हेतू यामागे नसणारच असे नाही. संघातली माणसे बोलत नाहीत आणि जे बोलतात ते कमालीचे वरवरचे व प्रचारी असते. याउलट काँग्रेसमध्ये वाचाळांची भरती मोठी आहे. परिणामी प्रत्येकच लहान-सहान गोष्टींचा प्रश्न बनविणे व त्यात गुंतणे हा त्याही रिकाम्या माणसांचा आवडता उद्योग आहे. एक कोणत्याही पदावर नसलेला व दीर्घकाळ आपल्यासोबत राहिलेला माणूस कोठे जातो, काय करतो आणि काय बोलतो या गोष्टीला एवढे महत्त्व त्यांनी तरी देण्याचे कारण काय? त्यामुळे ज्याची प्रतिमा बदलते वा डागाळते तो इसम ती सांभाळायला समर्थ आहे. त्यासाठी आपण अगोदरच पाणी आणि साबण घेऊन घाटावर पोहचण्याचे कारण नाही. आपली प्रतिमा सुधारण्याची खरी गरज संघाला आहे. त्याने सरकार जिंकले, पण त्याचा इतिहास तसाच राहिला आहे. तो स्वातंत्र्यलढ्यात सहभागी नव्हता आणि त्याचे गोडसेशी असलेले नातेही त्याने लपविले नाही. त्याचा उच्चवर्णीय तोंडवळा अजून तसाच आहे. अशावेळी लोक आपल्याशी जुळल्याचे दाखविणे ही त्याची गरज आहे आणि ती तो अबोलपणे पूर्ण करीत आहे. माणसे महत्त्वाची नसतात, संघटना महत्त्वाच्या असतात. त्यांच्या राजकीय गरजांचा विचार त्याचमुळे अधिक आवश्यक आहे. सबब प्रणवदांना येऊ द्या, त्यांना बोलू द्या, त्यांना तेथेच राहायचे असेल तर तो त्यांचा मताधिकार माना. त्यामुळे ते मोठे व्हायचे नाहीत आणि संघही स्वच्छ व्हायचा नाही. ज्याने त्याने आपले घर सांभाळायचे व प्रतिष्ठा राखायची हेच आजच्या काळात महत्त्वाचे आहे.