शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है..’

By सचिन जवळकोटे | Updated: May 27, 2021 06:15 IST

Political: इंद्रदेवांच्या आज्ञेनुसार नेत्यांच्या आवडीची गाणी शोधायला नारद बाहेर पडले. त्यांनी जे जे पाहिले, ऐकले त्याने मुनींना घाम फुटायची वेळ आली!

- सचिन जवळकोटे(निवासी संपादक, लोकमत, सोलापूर) 

‘इंडियन आयडॉल’मधल्या लेकरांच्या गाण्याला टाळ्या वाजवण्यासाठी गुपचूप पैसे मिळतात, असा गौप्यस्फोट अमितकुमारांनी करताच भूतलावर गहजब झाला. इंद्रांनी चमकून नारदांना विचारलं, ‘भूतलावर गाण्यांची एवढी क्रेझ असते का? असं असेल तर राजकीय नेत्यांच्या आवडीची गाणी शोधा. जा.’ मग काय.. मुनी झाले मुंबईत हजर !! तिथं वर्षभराच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’चं ॲडव्हान्स बुकिंग करून बसलेले किरीटभाई भेटले. भविष्यात घडणाऱ्या घटनांवरही अगोदरच भाष्य करणाऱ्या प्रेस नोट्स त्यांच्याकडे तयार होत्या. मुनींना पाहून ते गुणगुणू लागले, ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है’ ‘होम’चा नाद सोडून आता ‘हाउसिंग’मध्येच रमलेल्या आव्हाडभाऊंच्या रसिकतेला दाद देत मुनी पुढं निघाले. नुकतेच दिल्लीहून आलेले रामदास दिसले. मुनींनी गाण्याची गळ घालताच त्यांना वेगळेच काहीतरी ‘आठवले’. ते गुणगुणू लागले, ‘मै शायर तो नहीं.. मै शायर बदनाम’ दोन वेगवेगळी गाणी एकत्र ऐकताना मुनींना कसंतरी विचित्रच वाटलं. तेव्हा शेजारी उभा असलेला त्यांचा पीए कानात हळूच पुटपुटला, ‘यमक जुळवण्यासाठी आमचे साहेब काहीही करतात. त्यांना सवयच आहे तशी.’- कपाळावरचा घाम पुसत मुनी मंत्रालयाजवळ पोहोचले. तिथं सारेच प्रमुख नेते गाण्याच्या स्पर्धेत रमलेले. देवेंद्र नागपूरकर समोरच्या घोळक्यातल्या अजितदादांना खुणावू लागलेले, ‘बावीस तारखेची पहाट आठवते का हो दादा तुम्हाला? मन क्यों बहका रे बहका.. आधी रात को,’ ...मात्र दादांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तेव्हा ‘क्या हुआ तेरा वादा.. वो कसम वो इरादा,’ हा सूर देवेंद्रनी पकडताच त्यांचे सहकारीही त्यांना साथ देऊ लागले. अस्वस्थ दादांच्या मदतीला झटकन उद्धो धावले, ‘कस्मे वादे निभायेंगे हम.. मिलते रहेंगे जनम जनम,’ हे पाहून बाळासाहेब संगमनेरकरांनाही जोश आला. ते एकनाथभाई ठाणेकरांच्या सोबत गाऊ लागले, ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे.. तोडेंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे’ - मग जयंतरावांनाही भरून आलं. त्यांनी पाटोले नानांना मिठी मारत, ‘लग जा गले.. शायद इस जनम में मुलाकात हो ना हो’ म्हटलं. या तिन्ही पक्षांचा जिगरी दोस्ताना पाहून चंदूदादा कोथरूडकरांची सटकली. त्यांनी उद्धोंकडं बघत वेगळाच सूर आळवला, ‘दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है.. उम्र भर का गम हमें इनाम दिया है,’ त्यांना मुनगंटीवारांनीही लगेच साथ दिली, ‘दोस्त दोस्त ना रहा... प्यार प्यार ना रहा’ या साऱ्या गोंधळात नाथाभाऊ जळगावकर एकटेच पडलेले. त्यांना गिरीशभाऊंनी गमतीनं चुचकारण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘हम तो चले परदेस, हम परदेसी हो गये.. छूटा अपना देस, हम परदेसी हो गये’ म्हणत थोरले काका बारामतीकरांना हुडकू लागले. कोपऱ्यात संजयभाऊ यवतमाळकर अन् अनिल नागपूरकर यांचा वेगळाच काहीतरी ‘ट्रॅजेडी प्रोग्राम’ रंगलेला, ‘जाने कहां गये वो दिन.. कहते थे तेरी राह में’... एवढ्यात ‘थोरले काका’ गाडीतून उतरले. त्यांना पाहताच राज हस्तांदोलन करण्यासाठी पुढं सरसावले. मात्र त्याचवेळी उद्धोंनी घाईघाईनं काकांचा हात धरून गाणं सुरू केलं, ‘आपकी नज़रों ने समझा, प्यार के काबिल मुझे.. दिल की ऐ धड़कन ठहेर जा, मिल गयी मंजिल मुझे..’ ... मग काय.. तिथून रागारागानं राज परत निघाले, ‘तेरी गलियों में ना रखेंगे कदम.. आज के बाद’! आता थोरले काका कुमार गंधर्वांच्या आलापात गाऊ लागले, ‘ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी.. भेटीत तृष्टता मोठी.’ या गाण्यातल्या ‘कधी गहिवरलो.. कधी धुसफुसलो’ या ओळीवर बाकीचे दोन्ही पक्षनेते इमोशनल झाले.  त्याचवेळी ‘रौतांचे संजय’ अन् ‘रौतांचे नितीन’ यांनीही भलताच सूर काढला, ‘आज फिर मरने का इरादा है’ - हे ऐकताच त्यांचे नेते खुर्चीला घट्ट धरून उभे राहिले... ‘या दोघांना कुणीतरी आवरा रे.. यांचा आवाज थांबवा रे..’ - गालातल्या गालात हसत मुनी परत फिरले. नारायण!! नारायण!!!

 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण