शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

पोलिटिकल लोचा

By दिलीप तिखिले | Updated: May 5, 2018 00:33 IST

आपल्या खोलीत कुठलेतरी पुस्तक वाचण्यात मग्न असलेला सर्किट त्या आवाजाने दचकलाच. खोलीत तर कुणीच नाही. आवाज कुठून येतो आणि आवाजही ओळखीचा वाटतो

सर्किट... बेटा कुठे आहेस तू.आपल्या खोलीत कुठलेतरी पुस्तक वाचण्यात मग्न असलेला सर्किट त्या आवाजाने दचकलाच. खोलीत तर कुणीच नाही. आवाज कुठून येतो आणि आवाजही ओळखीचा वाटतो...! कोण आहे ?... म्हणण्याआधीच पुन्हा आवाज आला. बेटा डावीकडे कोपऱ्यात बघ! सर्किटने नजर वळविली आणि... सोफ्यावरून दोन हात वर उडालाच!बापू, आ...प?हो... बापूच होते ते. ‘लगे रहो...’मध्ये मुन्नाभाईला वेळोवेळी दर्शन देणारी तीच बापूंची मूर्ती. पण यावेळी बापूंच्या चेहºयावर नेहमीचे स्मितहास्य नसून चिंतेची छटा होती.इकडे सर्किटची अवस्था भांबावलेलीच.‘बापू आप...’ म्हणताना तोंडाचा वासलेला ‘आ...’ अजूनही तसाच होता.मग बापूच म्हणाले...! बेटा सर्किट, आधी तो ‘आ’ बंद कर आणि मला सांग मुन्ना कुठे आहे?सर्किट भानावर आला...गद्गद् होऊन म्हणाला, बापू धन्य झालो... ‘लगे रहो मुन्नाभाई’मध्ये अख्खे तीन तास डोळे फाडून बघत होतो, पण एकदाही दर्शन झाले नाही. आणि आज अचानक... व्वा मजा आया...!मुन्ना कुठाय?- बापूंची पुन्हा विचारणा.सर्किट : बापू आप सिरियस लग रहे हो... कोई लफडा... किसी की हड्डी तोडना है? या कोई मकान खाली करवाना है?बापू : सर्किट, ये हिंसा की बात मत कर. मुझे मुन्नासे बात करना है.सर्किट : मुन्ना, बोले तो संजूबाबा... वो तो गुजरात मे शुटिंगपर है.बापू : गुजरातेत..? मग बरोबर आहे. म्हणूनच त्याचा मोबाईल नंबर नॉट रिचेबल येत होता आणि व्हॉटस्-अ‍ॅपवर पाठविलेले मॅसेजही बाऊन्स होत होते.बापूंच्या तोंडून हे ऐकून सर्किटने पुन्हा आ वासला.सर्किट : बापू, अपुन के भेजे मे तो कुछ नही जा रहा. ये आपके पास मोबाईल, व्हाटस्-अ‍ॅप कहाँ से आया आणि...मला एक समजत नाही, तुम्ही कुणालाही, कुठेही आणि केव्हाही भेटू शकता. मग मुन्नाला डायरेक्ट न भेटता माझ्याकडे कसे आलात?बापू : सांगतो बाबा...मी कुणालाही, कुठेही भेटू शकतो. पण गुजरात सोडून.सर्किट : गुजरात क्यू नही ? वो तो आपका नेटिव्ह स्टेट है.बापू : नाही बेटा. तेथे आता दुसरा ‘महात्मा’ आहे. त्याला गांधी व्हायचे आहे. पटेल, आंबेडकर यांना तर त्यांनी त्याब्यात घेतलेच. आता मलाही हायजॉक करू पाहत आहेत. काँग्रेसपासून तोडू पाहत आहेत. उपोषण, सत्याग्रह, दलितोद्धार हे माझे लक्ष्य होते. त्यांच्या गांधी बनण्याला माझी हरकत नाही पण, सकाळी भरपेट नाश्ता करून काही तासाचे उपोषण करणे, दलितांच्या घरी जाऊन हॉटेलचं मागवून जेवण करणे हा गांधीवाद नाही हे त्यांना मुन्नाखारख्याने सांगण्याची गरज आहे.सर्किट : बापू... एक बात कहूं...हे सब पोलिटिकल लोच्या है. अभी इलेक्शन आ रहा है नां!बापू : बरं ते जाऊ दे. आता राहिली तुझी मोबाईल, व्हॉटस्-अ‍ॅपबाबतची शंका. तर मित्रा, वर सर्वकाही उपलब्ध आहे. नारदमुनीकडे इंटरनेट आहे. तिन्ही जगाला ते त्यानेच बातम्या पुरवितात. महाभारतातल्या संजयकडे सॅटेलाईट सेवा होती. मग मोबाईल तर क्षुल्लक आहे. नाही पटत. मग जा, बीजेपीच्या कोणत्याही नेत्याला विचार. एवढे बोलून बापू ‘मिस्टर इंडिया’ झाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणIndiaभारत