शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्राणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 00:46 IST

आमच्यात सध्या मुली मिळत नाहीत. तरणीबांड पोरं सुकून चाललीत. मुलींचा भाव वाढत चाललाय.

किशोर पाठक|मनुष्य हा एक प्राणी आहे, म्हणून तो जनावरासारखा वागतो. त्याच्या हिंस्र नखांवर कातडी चढवलीय. वेळ येताच तो कातडी दूर करतो. मग ती लहान मुलगी असो वा म्हातारी. स्त्रीला जात नसते, धर्म नसतो. ती फक्त योनीची वाहक असते. घडणाऱ्या प्रत्येक अत्याचाराला सामोरी जात ती मरते, मारली जाते. पुरुषांना असेच मारले तर... मित्र रडत होता. पूर्वी छान होतं. माणसांना माणसांची जाण होती. एकीकडे मुलीवर अत्याचार होताहेत तर दुसरीकडे मुलींची संख्या कमी होतेय. पैसे काय चाटायचेय. आमच्यात सध्या मुली मिळत नाहीत. तरणीबांड पोरं सुकून चाललीत. मुलींचा भाव वाढत चाललाय. उलट हुंडा द्यायची वेळ आलीय. पैसा पैसा करीत माणूस मरतो आहे. शहरातला दुकानदार नको, खेड्यातला शेतकरी नको. मुलाला शहरात गलेलठ्ठ पगाराची नोकरी हवी, गाडी हवी. नाती नकोत, बॅँक बॅलन्स हवा. अविवाहित तरुणांची फौज तयार होतेय. नवीन प्राण्यांची. आईबापांना आपण म्हातारे नाहीत, हे सांगावं लागतं. कारण मुलांना म्हाताºयांची सेवा करायला वेळ नाही, घरात जागा नाही. पुरेसा पगार नाही. टीव्हीचा एक चांगला उपयोग. सतत म्हातारे तोंड खुपसून. मग मुलांशी चर्चा आणि वादविवाद करायला वेळ नाही. हे नवे प्राणी. मुलांना खेळायला कशाला पाठवता. हातात मोबाईल द्या. लवकर डोळे खाचा होतील. गुडघे धरतील. म्हातारपण लवकर येईल. शिक्षित समाजात एकीकडे प्रचंड स्पर्धा आहे. दुसरीकडे प्रचंड नैराश्य. कॉन्स्टेबल पोलीस शिपायांच्या मुलाखतीसाठी पीएचडी झालेले लायनीत उभे. काय उपयोग शिकून. त्यात पुन्हा जातीय राजकारण वेगळंच. त्यापेक्षा एखादा गडगंज श्रीमंत नेता धरावा. त्याचा चमचा म्हणून जगावं. निदान दारू आणि जेवणाची सोय तर होते. त्याच्या जीवावर दादागिरी तर करता येते. मधेच कुणी आपला निकाल लावला तर सुटलो एकदाचे. हे एक प्राणी. माणूस प्रचंड भेदरलेला, घाबरलेला आहे. धर्म आणि नास्तिकतेचे चाबूक घेऊन समोर उभे आहेतच. एक तर जय म्हण नाही तर पाठ सोलून काढायला तयार हो. जन्म, मृत्यू, मोकळी हवा, शिक्षण, नोकरी, सामाजिक पत आणि पद, प्रतिष्ठा, माणसं वापरून घेण्याची कला या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्यात माणूस नावाचा प्राणी हुंगत फिरतो आहे. त्याला दिसलं काही तर झडप घालून मोकळा. थोड्या कला पांघरूण तो जगण्याची हुडहुडी कमी करू शकतो. पण तेवढ्यापुरतीच. पुन्हा माणूस नावाचा अजस्र प्राणी माणसाला मारायला आणि गिळायला सज्ज!

टॅग्स :spiritualअध्यात्मिक