शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

लोकहो, चंद्रावर पोचलो, आतातरी ‘पत्रिका’ बघणे थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2023 08:53 IST

वैवाहिक जीवन सुखी व्हायचे, तर जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम हवे, तिथे चंद्र आणि मंगळ यांचे खरे म्हणजे काय काम आहे?

- श्यामसुंदर झळके, नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समिती

नुकतीच भारताने अंतराळ क्षेत्रात गरुडझेप घेऊन २३ ऑगस्ट रोजी चंद्रयान ३ चे यशस्वी लँडिंग करून जगात दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारा पहिला देश म्हणून वाहवा मिळवली व त्या ठिकाणी तिरंगा फडकावून देशाचे नाव उज्ज्वल केले. यात इस्रोच्या वैज्ञानिकांचे अलौकिक योगदान आहे. त्यामुळे चंद्राविषयी असणाऱ्या अनेक समजुती, गैरसमजुती याला आळा बसेल, अशी आशा करूया ! या आधीच भारताचे मंगळयान मंगळावरही पोहचले आहे.

याचा उल्लेख मुद्दाम अशासाठी केला, की विवाह जमवताना मंगळ व चंद्र या ग्रहांना आपल्याकडे विशेष महत्त्व दिले जाते. मुलीच्या पत्रिकेत मंगळ असेल तर अशी अडचण येते, की काही विचारुच नका! असे म्हणतात, की मंगळाची मुलगी असेल तर मंगळाचाच मुलगा असावा लागतो तरच लग्न जमते. आणि अशीही समजुत आहे की लग्नाची मुलगी आणि मुलगी या दोघांनाही चंद्रबळ चांगले असेल तर सर्व काही ठीक होते. त्यांचा भावी संसार सुखाचा व्हायचा असेल, तर पत्रिकेत मंगळ नसणे आणि दोघांनाही उत्तम चंद्रबळ असणे, ही आपल्या समाजात जणू पूर्वअटच आहे!

आता आपला भारत देश मंगळावर, चंद्रावर  पोहचला तरी या मंगळाचे आणि चंद्राचे पत्रिकेतील स्थान मात्र अढळ आहे. - खरेतर या ग्रहताऱ्यांचा आपल्या जीवनात  काडीचा संबंध नाही. लाखो किलोमीटरवरील ग्रह आपल्या जीवनात काय लुडबुड करणार ? ही शुद्ध अंधश्रद्धा आहे, याबद्दल वारंवार सांगीतले गेले आहे, तरी अगदी एरवी शास्त्रावर विश्वास ठेवणारी जाणती माणसेसुध्दा लग्नाचा विषय आला की "पत्रिका बघुया जुळते का, नंतर उगीच त्रास कशाला?"- अशी सोयीस्कर भुमिका घेतात.

खरेतर आपल्या विवेकाची कसोटी अशा प्रसंगीच लागत असते, पण कोण कुणाला सांगणार? वैज्ञानिक युगात असूनही कर्मकांडात आपण कुठपर्यंत अडकणार याचा डोळसपणे विचार करायला हवा. जोपर्यंत विवेकी विचार व वैज्ञानिक जाणीव होणार नाही तोपर्यंत आपण असेच चाचपडत राहणार का, हा प्रश्न प्रत्येकाला पडायला हवा. विज्ञानाने सर्व गोष्टी सिद्ध करूनही आपण फलज्योतिषाला कवटाळून बसणार का याचाही जाणत्या जनांनी विचार करावा. वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी दोन्ही जोडीदारांचा परस्परांवरचा विश्वास, प्रेम आणि जुळवून घेण्याची तयारी याची गरज असते, हे कुणीही सांगेल. तिथे ग्रहतारे काय करणार? - याचे भान ठेऊन आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे.

एकतर विविध कारणांमुळे सध्या विवाह जुळणे हेच अवघड होऊन बसलेले आहे. त्यात हजारो मुलामुलींची लग्ने या ग्रहदशेमुळे जमत नाहीत, ही शोकांतिका आहे. कळते पण वळत नाही अशी समाजाची स्थिती आहे. विज्ञानाची पदवीधर मुले-मुलीसुद्धा पालकांच्या आग्रहास्तव पत्रिका बघतात व लग्न करण्या / न करण्याचा निर्णय घेतात. तेव्हा आपसातील नातीगोती, स्वभाव, एकमेकांची पसंती, समविचारी व कुटुंबाला विश्वासात घेऊन विवाह करण्याची गरज निर्माण झाली आहे.