शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

परभणी : खर्च नोंदवही तपासण्यास न देणाऱ्या दोन उमेदवारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 23:35 IST

लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : लोकसभा निवडणुकीतील दैनंदिन खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यास खर्च निरीक्षकांकडे न दिल्या प्रकरणी दोन उमेदवारांना तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस निवडणूक विभागाने दिली आहे़केंद्रीय खर्च निरीक्षक व त्यांच्या पथकाने १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जिल्हा कचेरीत निवडणूक लढविणाºया उमेदवारांना त्यांच्या दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासण्यासाठी बोलावले होते़ त्यानुसार शिवसेनेचे संजय जाधव, कम्युनिस्ट पार्टीचे राजन क्षीरसागर, राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, बसपाचे डॉ़ वैजनाथ फड, स्वतंत्र भारत पक्षाचे डॉ़ आप्पासाहेब कदम, वंचित आघाडीचे आलमगीर खान, बहुजन मुक्ती पार्टीचे उत्तमराव राठोड, भारतीय प्रजास्वराज्यचे किशोर गवारे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड़ यशंतव कसबे, आंबेडकर नॅशनल काँग्रेसचे सुभाष अंभोरे, भारतीय बहुजन क्रांती दलाचे संतोष राठोड, संघर्ष सेनेचे हरिश्चंद्र पाटील, अपक्ष किशोर मुन्नेमाणिक, गोविंद देशमुख, संगीता निर्मल या १५ उमेदवारांची नोंदवही व अभिलेखे तपासण्यात आली़ त्यापैकी राजन क्षीरसागर, राजेश विटेकर, आलमगीर खान, किशोर गवारे, संतोष राठोड, हरिश्चंद्र पाटील यांनी दैनंदिन खर्चाची नोंदवही तपासणी दरम्यान, अद्ययावत न ठेवल्यामुळे त्यांना याबाबत सूचना देण्यात आल्या़ तर संजय जाधव यांचे प्रतिनिधी उशिराने आल्याने त्यांच्या खर्चाची तपासणी पूर्ण करता आली नाही़ त्यानुसार १५ एप्रिल रोजी त्यांना तपासणीस हजर राहण्याचे सूचित करण्यात आले़ बहुजन महापार्टीचे शेख सलीम शेख इब्राहीम व अपक्ष सखाराम बोबडे यांनी ७ व १२ एप्रिल असे दोन्ही वेळा खर्चाची नोंदवही व अभिलेखे तपासण्यासाठी उपलब्ध करून दिले नाही़ त्यामुळे त्यांना कायद्यानुसार तुमच्यावर गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्यात आली असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले़ १६ एप्रिल रोजी खर्चाची तृतीय तपासणी होणार आहे़

टॅग्स :parabhaniपरभणीparbhani-pcपरभणीElectionनिवडणूकlok sabhaलोकसभा