शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

इसिसचे नाव घेणे पाकिस्तानच्या फायद्याचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2019 02:02 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांना खात्री आहे, की इसिस या संघटनेचा वापर करून तरुणांना भारताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. विशेषत: जम्मू-काश्मीरमधील तरुणांना या पद्धतीने बहकविण्यात येत असल्याने त्याचा समूळ नायनाट करण्याची गरज आहे.

- आलोक जोशी(‘रॉ’ संघटनेचे माजी प्रमुख व एनटीआरओचे संचालक)रा ष्ट्रीय सुरक्षा संघटनेने उत्तर प्रदेश आणि दिल्लीत वेगवेगळ््या ठिकाणी छापे टाकून दहशतवादी गटातील तरुणांना अटक केल्यामुळे अनेकांना हायसे वाटले असेल. त्यांच्याजवळून देशी बनावटीची शस्त्रास्त्रे आणि गावठी बॉम्ब जप्त केल्यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका घेण्याचे कारण उरत नाही. या दहशतवादी गटावर सुरक्षा संघटना चार महिन्यांपासून नजर ठेवून होत्या असे मीडियातील वृत्तावरून समजते. हा दहशतवादी गट दहशतवादी कृत्ये घडवून आणण्यास सक्रिय होत आहे, हे बघून सुरक्षा संघटनेने झटपट हालचाल करून त्यांना पकडले, असे दिसते. या गोष्टीमुळे दोन सकारात्मक गोष्टी प्रकाशात आल्या. एक म्हणजे केंद्रीय संस्था अािण पोलीस दलात वाढत असलेला समन्वय आणि दुसरी म्हणजे दहशतवादी गटांना चांगली शस्त्रास्त्रे मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे त्यांना आता गावठी शस्त्रांकडे वळावे लागले आहे. पण हा गट इसिसकडून प्रेरणा घेत होता, अशा तºहेने त्यांच्याबद्दल आलेले वर्णन ही बाब मात्र तितकीच चिंताजनक आहे.तसे पाहता सततच्या कारवाईमुळे इसिस ही संघटना नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पण त्या संघटनेचा विचार अजूनही जिवंत असल्याचे दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इसिसवर ताबा मिळविला असल्याचे घोषित करून सिरियामधून आपले सैन्य मागे घेण्याचे समर्थन केले आहे. पण जागतिक स्तरावर इसिसची विचारधारा अद्याप जिवंत असल्याचे आणि ती तरुणांची मने कलुषित करीत असल्याचे या घटनेतून दिसून येते. हे तरुण त्याच विचारधारेखाली इसिसच्या नाही तर अन्य झेंड्याखाली काम करू लागले आहेत, त्यामुळे इसिस संपली आहे असा कुणी प्रचार करू नये, हा धडाही या घटनेमुळे मिळाला आहे. हायड्रा या प्राण्याचे मस्तक तोडले तरी तेथे नवे मस्तक जन्म घेत असे. त्यासारखेच हे आहे. त्यामुळे भारताने तरी वाट पाहा आणि लक्ष ठेवा हीच भूमिका घ्यायला हवी. भारतातील नव्याने पकडला गेलेला दहशतवादी गट हा इसिसपासून प्रेरणा घेत होता, असे थेट म्हणणे हे अनेक कारणांनी चुकीचे ठरणारे आहे. त्यापेक्षा तो इसिसच्या विचारधारेखाली काम करत होता, असे म्हणणे नेमकेपणाचे ठरेल.पाकिस्तानची आयएसआय संघटना अनेक दहशतवादी संघटनांना बळ देत असते. इस्लामिक स्टेट आॅफ खोरासान प्रॉव्हिन्स (आयएसकेपी) ही अफगाणिस्तानातील संघटना हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मुल्ला ओमर यांच्या मृत्यूनंतर अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये सुरू झालेल्या सत्ता संघर्षातून या संघटनेचा जन्म झाला असून तिचे धागेदोरे आयएसआयसी जुळले आहेत. त्यामुळे ही संघटना पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवर सक्रिय झाली आहे. त्यामुळे भारतात पकडण्यात आलेले दहशतवादी थेट इसिस नव्हे, तर आयएसआय या संघटनेसाठी काम करीत असल्याची शक्यता अधिक आहे.इंडियन मुजहिदीन ही संघटना संपुष्टात आल्यावर २०१४ साली आयएसआयने इसिसच्या नावाखाली तरुणांची भरती करणे सुरू केले होते. त्यावेळी इराकमध्ये खालिफत स्थापन करण्यासाठी तरुणांना आवाहन करण्यात आले होते. मोसूल येथे जाण्याचा मार्ग हा कराचीमार्गेच होता. या मार्गाने तरुणांना आणून त्यांना प्रशिक्षण देऊन पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या इंडियन मुजाहिदीनच्या नेतृत्वाखाली त्यांना सोपविण्यात आले होते. त्यामुळे काही काळ इंडियन मुजाहिदीनमध्येही तणावाचे वातावरण होते. परिणामी काही तरुणांनी ती संघटना सोडूनही दिली होती.या परिस्थितीत भारतातील सुरक्षा संस्थांनी झटपट कारवाई करून, छापे टाकून आणि काही जणांची धरपकड करून संभाव्य दहशतवादी हल्ले रोखण्याचे काम केले आहे. पण आता त्यांना चुकीच्या पद्धतीने प्रसिद्धी मिळून त्याचा फायदा देशाच्या शत्रूंना मिळू नये, याची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. इसिस ही संघटना जरी संपली असली, तरी त्या नावाखाली त्या संघटनेचे तत्त्वज्ञान जिवंत ठेवून त्याचा वापर तरुणांना शस्त्रसज्ज करण्यासाठी होण्याची भीती संपलेली नाही आणि भविष्यात त्यांचा उपयोग भारताच्या हिताविरोधात होणार आहे, असा प्रचार भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर करण्याची गरज आहे. या तरुणांचा वापर भारताच्या शत्रूंच्या हातातील बाहुले म्हणून होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी पावले उचलण्याची खरी गरज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री राजनाथसिंग यांना खात्री आहे, की इसिस या संघटनेचा वापर करून तरुणांना भारताच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रेरित करण्यात येत आहे. विशेषत: जम्मू-काश्मीरमधील तरुणांना या पद्धतीने बहकविण्यात येत असल्याने त्याचा समूळ नायनाट करण्याची गरज आहे. या दहशतवादी गटाला पकडल्यानंतर त्यांच्या पकडण्याचा वापर चुकीच्या पद्धतीने होऊ देणे हे देशहितासाठी अपायकारक ठरू शकते याची जाणीव भारताच्या तपास संस्थांनी ठेवायला हवी आणि आपल्या शत्रूचे हात बळकट करणे टाळायला हवे. त्यासाठी या कारवाईपुरते न थांबता पुढील व्यूहरचना तितकीच महत्त्वाची ठरणार आहे.

टॅग्स :ISISइसिस