शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या मुसंडीमुळे पाकिस्तान हादरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 05:45 IST

आंतरराष्ट्रीय दबावापोटी भारत स्वत:हून लाइन आॅफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) स्वत:हून कधीच ओलांडणार नाही.

आंतरराष्ट्रीय दबावापोटी भारत स्वत:हून लाइन आॅफ कंट्रोल (नियंत्रण रेषा) स्वत:हून कधीच ओलांडणार नाही. भारताचा प्रतिकार केवळ भारत भूमीपुरताच मर्यादित असेल, या भ्रमात पाकिस्तान आजवर होता. कारण १९६५ आणि १९७१चा अपवाद वगळता, त्यानंतर भारताने कधीही नियंत्रण रेषेचे उल्लंघन केलेले नाही. आज मात्र, भारतीय वायुसेनेने मंगळवारी पहाटे खोलवर घुसून हल्ला केला. गाफील पाक सैन्यासाठी हा मोठा दणका आहे. पाकच्या हद्दीत ऐंशी किलोमीटर मुसंडी मारून केलेला हा हल्ला पाकिस्तानला हादरविणारा आहे.

भारताच्या मिराज-२००० या एकूण बारा लढाऊ विमानांनी एलओसी ओलांडून हल्ला केला. परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्ताननेही त्याला दुजोरा दिला आहे. बालाकोट हा परिसर पख्तुनिस्तान म्हणजेच सध्याच्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये आहे. हा आपलाच भाग होता. तिथे तर आपण हल्ला केलाच, पण त्याच्याही पलीकडे पाकिस्तानमध्ये आपल्या विमानांनी घुसून हल्ला केला. पहिल्यांदाच आपण एलओसी क्रॉस केली. त्याचे कारण दहशतवाद्यांचे अड्डे जमिनीवरून हल्ला करण्याच्या मर्यादेबाहेर पाकव्याप्त काश्मिरात आहेत. पाक सैन्याकडून शस्त्रास्त्रे, दारूगोळा यांची रसद मिळविणे, अशा ठिकाणी त्यांना सुलभ असते. पाक सैन्यालाही त्यांना प्रशिक्षण देणे, मार्गदर्शन करणे या दृष्टीने सोईच्या ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे वसविण्यात आले आहेत. ते उद्ध्वस्त करण्यासाठी केवळ विमानांनीच हल्ला करणे शक्य आहे. कारण आपली कोणतीही हानी होऊ न देता, दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करून आपल्याला सुरक्षित परतायचे असते. एअरफोर्सने हे काम अगदी अचूक केले आहे.

आजच्या हल्ल्यातही आपण बराच अभ्यास केलेला होता. शत्रूच्या रडार यंत्रणेला गाफील ठेवून आपल्या रडार यंत्रणेकडून शत्रूची बित्तमबातमी मिळवित राहिलो. भारतीय बनावटीची नेत्रा एडब्ल्यूसी ही यंत्रणा हल्ल्यासाठी मदत करत होती. ड्रोन नजर ठेवून होते. हल्ल्याचे सखोल नियोजन झाले होते. महत्त्वाचे म्हणजे एलओसी ओलांडण्यासंदर्भातला निर्णय घेण्याचे अधिकार एअरफोर्सकडे होते. त्यामुळे मिराज विमानांच्या लेझर गायडेड बॉम्बनी दहा-बारा किलोमीटर दूर अंतरावरून लक्ष्याचा अचूक वेध घेतला. त्यानंतर, ते सुरक्षितपणे मागे वळू शकले.

हल्ल्याची वेळ फार महत्त्वाची असते. पहाटे दोन ते चार ही वेळ त्या दृष्टीने अगदीच महत्त्वाची. कारण त्या वेळी बहुतेक सगळे गाफील असतात. पाकला गाफील ठेवण्यात आपण यशस्वी झालो, यात शंकाच नाही. कारण एवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर भारत एलओसी ओलांडणार नाही, असेच पाकिस्तान समजत होता. अगदी कारगील युद्धातसुद्धा, भारताच्या मिराज विमानांनी एलओसीचे उल्लंघन न होऊ देता, टायगर हिलवरून लेझर गायडेड बॉम्बचा हल्ला चढविल्याने विजय समीप आला. आपली जीवितहानी वाचली. सर्जिकल स्ट्राइकसाठी अचूक माहिती असल्याशिवाय धाडस दाखविणे अंगलट येऊ शकते. माहिती गोळा करण्याचे अनेक मार्ग असतात. एअरफोर्सने ट्रेनिंग कॅम्प उद्ध्वस्त केले, याचा अर्थ असा की, ही सगळी माहिती आधी आपल्याकडे होती. दहशतवादी अड्ड्यावर किती दहशतवादी होते, तिथे शस्त्रास्त्रे, दारूगोळ्याचा साठा किती होता, या सगळ्याबद्दलची खात्री पटल्याखेरीज असा हल्ला केला जात नसतो.

देश स्वतंत्र झाला, तेव्हा १९४७ मधली परिस्थिती वेगळी होती, पण ६५मध्ये ‘आॅपरेशन जिब्रॉल्टर’ म्हणून पाकिस्तानने भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. श्रीनगरच्या लाल चौकात आणि पुढे दिल्लीत पाकिस्तानी झेंडा फडकविण्याची भाषा भुट्टोंनी केली. त्या वेळी आपण एलओसीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सीमादेखील ओलांडली होती. ७१च्या युद्धात तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तिन्ही दळांच्या ताकदीचा वापर भारताने केला. लाहोर, सियालकोटपासून आपण फक्त वीस किलोमीटर अंतरावर जाऊन पोहोचलो होतो. त्यानंतर, पहिल्यांदाच आपण पाकिस्तानात घुसलो आहोत.या हल्ल्यासंदर्भात चीनचा अपवाद वगळता जग भारतासोबत आहे. पुलावामा हल्ल्यानंतर त्याची जबाबदारी जैशने घेतली होती. जैशचे प्रमुख नेते आणि त्यांचे अड्डे पाकिस्तानात असल्याचे जगापुढे आले आहे. हाफीज सईद पाकिस्तानात उघडपणे फिरतो, हे जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताने स्वसंरक्षणासाठी हल्ला केला आहे, हे उघड आहे. उलट यातून चीनलाही योग्य तो संदेश मिळाला आहे. पाकिस्तानने हल्ला केला, तरी भारत त्यांना कडक उत्तर देण्यास तयार असेल, पण मुद्दा हा आहे की, पाकिस्तान हल्ला करण्याची क्षमता राखून आहे का? जनरल मुशर्रफ यांनी स्वत:च कबुली दिल्याप्रमाणे, मोठे युद्ध झाले, तर पाकिस्तान बेचिराख होईल. त्यामुळे आता शहाणपणा दाखवायचा की नाही, हा पाकिस्तानपुढचा प्रश्न आहे. ‘कीप इंडिया ब्लिडिंग’ असे चालणार नसल्याचा कडक इशारा आजच्या हल्ल्याने दिला आहे. ७१च्या युद्धात पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. यापुढे चांगले वागाल तरच हित आहे, असा सज्जड इशारा आपण दिला आहे. आपला हल्ला अतिरेक्यांवर आहे, पाकिस्तानी नागरिकांवर नाही. त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांनीही पाक सरकारवरचा दबाव आणला पाहिजे़- भूषण गोखलेमाजी एअर मार्शल