शहरं
Join us  
Trending Stories
1
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
2
Beed: अजित पवारांच्या ताफ्यासमोरच दोन तरुणांनी पेटवून घेण्याचा केला प्रयत्न, पोलिसांची धावपळ
3
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
4
७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
5
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
6
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
7
६० मुस्लीम देशांच्या बैठकीत पाकिस्ताननं दिला 'इस्लामिक नाटो'चा प्रस्ताव; भारतासाठी किती चिंताजनक?
8
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 
9
ind vs oman: ओमानविरुद्धच्या सामन्याआधी भारतीय खेळाडूंनी मैदानात गाळला घाम, पाहा फोटो!
10
कॅनडातील वाणिज्य दूतावास ताब्यात घेणार; खलिस्तान समर्थकांची भारताला खुली धमकी...
11
"नक्कीच जुळं होणार", प्रिया बापटचा बेबी बंपचा व्हिडीओ पाहून चाहत्यांच्या कमेंट्स
12
२० वर्षांनंतर घेता येणार स्वेच्छा निवृत्ती, पण पूर्ण पेन्शनसाठी एवढ्या वर्षांची असणार अट
13
PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींचा डुप्लिकेट कोण? राजकीय सभांपासून बॉलिवूड सिनेमांमध्ये केलंय काम
14
Urban Company IPO Listing: ५६ टक्क्यांचं लिस्टिंग गेन, ₹१०३ च्या शेअरची धमाकेदार एन्ट्री; गुंतवणूकदार मालामाल
15
Nupur Bora : पैसाच पैसा! ५ वर्षांच्या सेवेत ९२ लाख, १ कोटीचे दागिने...; कोट्यवधींच्या कमाईने मुख्यमंत्रीही हैराण
16
"तुमच्या सक्षम मार्गदर्शनाखाली..."; शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना दिल्या खास शुभेच्छा
17
PM Modi Birthday: जिथे गेले तिथे गाजवलं वर्चस्व! जगातील 'या' मोठ्या देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिला सर्वोच्च सन्मान 
18
Astro Tips: शुभ मुहूर्त पाहून मूल जन्माला घालणे शक्य आहे का? त्रेतायुगात सापडते उत्तर!
19
सगळे सलमानची बाजू घेत होते, ब्रेकअपनंतर ऐश्वर्याची इंडस्ट्रीनं सोडली साथ, दिग्दर्शकाचा खुलासा
20
सोने तारण कर्जाला सोन्याचे दिवस! जूनमध्ये झाली तब्बल १२२ टक्क्यांची वाढ

...अन्यथा आपली शहरे ई-कचऱ्याची स्मशाने बनतील!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 04:09 IST

- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)सध्या सा-या जगभरात प्लॅस्टिक कच-याच्या संकटाविषयीची चर्चा सुरू आहे. प्लॅस्टिकचे रिसायकलिंग करून ते नष्ट करण्याविषयी बरेच काही बोलले गेले. अनेक राष्टÑांनी, तसेच आपल्या देशातील काही राज्यांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदीदेखील घातली आहे. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च, २०१८ रोजी एका आदेशान्वये राज्यात प्लॅस्टिकचे ...

- डॉ. एस. एस. मंठा(माजी चेअरमन, एआयसीटीई एडीजे, प्रोफेसर, एनआयएएस, बंगळुरू)सध्या सा-या जगभरात प्लॅस्टिक कच-याच्या संकटाविषयीची चर्चा सुरू आहे. प्लॅस्टिकचे रिसायकलिंग करून ते नष्ट करण्याविषयी बरेच काही बोलले गेले. अनेक राष्टÑांनी, तसेच आपल्या देशातील काही राज्यांनी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदीदेखील घातली आहे. महाराष्ट्र सरकारने २३ मार्च, २०१८ रोजी एका आदेशान्वये राज्यात प्लॅस्टिकचे उत्पादन, त्याचा वापर, त्याची विक्री, साठवणूक, वाहतूक आणि वितरण करण्यावर बंदी घातली आहे, तसेच प्लॅस्टिक बॅगची आयात करणे आणि थर्माकोलची निर्मिती आणि वापर हेही थांबविले आहे. सध्या प्लॅस्टिक कचºयाचा विचार करणे आपण सोडून देऊ, पण आपण जो इलेक्ट्रॉनिक कचरा फेकून देतो, त्याचे पुढे काय होते, याचा आपण कधी विचार केला आहे का? ई-कच-यावर प्रक्रिया केल्यावर त्याचा मानवी शरीरावर होणाºया वाईट परिणामांचा आपण कधी विचार केलाय का? इलेक्ट्रॉनिकच्या टाकाऊ घटकामध्ये जस्त, कॅडमियम, बेरिलीयम किंवा ब्रॉमिनेटेड फ्लेम रिटार्डन्ट्स यासारख्या धोकादायक पदार्थांची निर्मिती होत असते. या पदार्थांचे रिसायकलिंग करताना, कामगारांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होत असतात आणि त्यांचे दुष्परिणाम समाजालाही भोगावे लागतात. तेव्हा रिसायकलिंगच्या प्रक्रियेत सुरक्षित नसलेल्या घटकांना सामोरे जाताना पुरेशी काळजी घेण्याची गरज असते. कारण त्यातील काही घटकांपासून कॅन्सर होण्याची शक्यता असते!इलेक्ट्रॉनिक वेस्ट किंवा ई-कचरा हा टाकून दिलेल्या विद्युत उपकरणांपासून किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून निर्माण होत असतो. जसे रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, कॉम्प्यूटर्स, प्रिन्टर्स, टेलिव्हिजन सेटस् मोबाइल्स, आयपॉडस् इ. हा ई-कचरा सातत्याने वाढत असून, तोही संकट म्हणून साºया जगासमोर उभा ठाकला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या एका अहवालानुसार, चार वर्षांपूर्वी सुमारे ४ कोटी १८ लाख टन इतका ई-कचरा जगभरात निर्माण झाला होता. २०१८ पर्यंत तो ५ कोटी टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला फार मोठा धोका निर्माण होऊ शकतो. हे म्हणजे दर सेकंदाला ८०० लॅपटॉप कचरा म्हणून फेकून देण्यासारखे आहे. एकूण ई-कचºयापैकी ९३ लाख टन ई-कचरा हा वैयक्तिक वापरलेल्या कॉम्प्यूटर्स, स्मार्ट फोन्स टॅबलेट आणि टी.व्ही. सेटमुळे होतो. याशिवाय घरगुती वापराचे एसी., हिटर्स आणि उपकरणे यामुळेही त्यात भर पडत असते.ई-कचºयाची निर्मिती करणारे राष्ट्र म्हणून भारत हा पाचव्या क्रमांकावर आहे. त्यातही सरकारची खाती, सार्वजनिक आणि खासगी उपक्रम हे ७५ टक्के ई-कचरा निर्माण करीत असतात. त्यापैकी ९५ टक्के ई-कचºयावर जी प्रक्रिया केली जाते, ती शहरी भागातील झोपडपट्ट्यातून केली जाते. तेथे व्यक्तिगत सुरक्षेच्या उपायांशिवाय अप्रशिक्षित कामगार हे ई-कचºयांची विल्हेवाट लावण्याचे काम करीत असतात. तेव्हा ई-कचºयावर नियंत्रण ठेवण्याचे आणि त्याच्या पुनर्वापरासाठी (रिसायकलिंगसाठी) साहाय्य करण्याचे काम सरकारनेच पार पाडायला हवे, असे म्हटले, तर ते चूक ठरू नये.विकसित राष्टÑांनी स्वत:ची ई-कचºयापासून सुरक्षा करण्याचे मार्ग शोधून काढले आहेत. चीनमध्ये ई-कचरा जाळण्याचे ठिकाण ‘गायु’ नावाने ओळखले जाते. तेथे डायआॅक्सिन आणि हेवी मेटल्सचे प्रमाण जास्त आढळते. सुरक्षित पातळीपेक्षा तेथील पाण्यात जस्ताचे प्रमाण २४०० पट अधिक आढळते. तेथे अनेक मुले काम करीत असतात. तेथील जमीन प्रदूषित असल्याने तेथील खेड्यातील लोक स्वत:चे अन्नही निर्माण करू शकत नाहीत, पण उपजीविकेसाठी त्यांना रिसायकलिंगचा व्यवसाय करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचते.एखादी वस्तू मुदतबाह्य ठरली की, आपण फेकून देतो, तितके ई-कचरा फेकून देणे सोपे नाही. त्या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या उत्पादकांनी ई-कचरा परत घेण्याचा कार्यक्रम आखला पाहिजे. त्यातून अनेक गोष्टीचे योग्य तºहेने रिसायकलिंग होऊन त्यांच्या पुनर्वापराच कार्यक्रम अंमलात आणता येईल, तसेच उत्पादनांचा दीर्घकाळपर्यंत वापर करण्याची तरतूद उत्पादनाच्या निर्मितीत केली, तर त्या उत्पादनांचा ई-कचरा होण्यासही वेळ लागेल. ई-कचºयाची विल्हेवाट लावताना हार्ड डिस्कमध्ये साठवलेला डेटाही नष्ट करावा लागतो. त्यानंतर, बॅटरीतील तांबे वेगळे करावे लागेल. अशातºहेने ई-कचºयाचे सर्व घटक वेगळे केल्यावर त्यांची पुनर्विक्री करता येईल.इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी २०२० पर्यंत ४१ टक्क्याने वाढणार आहे. त्यामुळे ई-कचºयांची निर्मितीही अधिक प्रमाणात होणार आहे. तेव्हा जी इलेक्ट्रॉनिक उत्पादने कार्यक्षम आहेत, त्यांचा शक्यतोवर फेरवापर केला पाहिजे. त्यासाठी ती गरजवंतांना दान केली पाहिजे. उर्वरित कचºयाचे मात्र रिसायकलिंगच करावे लागेल, अन्यथा आपली शहरे ई-कच-यांची स्मशाने बनतील!

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी