शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

हाडांच्या ठिसूळतेचे कारण आॅस्टियोपोरोसिस

By admin | Updated: June 19, 2016 00:23 IST

आॅस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. उतारवयात साधारणपणे वयोवृद्ध स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा पाच ते सहा पटीने अधिक आढळते. उतारवयात कमरेत वा पाठीच्या मणक्यात येणारा बाक

- डॉ. व्यंकटेश शिवणेआॅस्टियोपोरोसिस म्हणजे हाडांची ठिसूळता. उतारवयात साधारणपणे वयोवृद्ध स्त्रियांमध्ये याचे प्रमाण पुरुषांपेक्षा पाच ते सहा पटीने अधिक आढळते. उतारवयात कमरेत वा पाठीच्या मणक्यात येणारा बाक, उतारवयात मांडीचे वा पायाचे हाड मोडणे यासाठी हाडांची ठिसूळता कारणीभूत असते. स्त्रियांमध्ये रजोनिवृत्तीनंतर हाडे ठिसूळ होेण्याचे प्रमाण अधिक असते व अधिक वेगाने होते. हल्लीच्या निष्कृष्ट दर्जाचा आहार, व्यायामाचा अभाव, सूर्यप्रकाशात न जाणे या व इतर गोष्टी आॅस्टियोपोरोसिससाठी कारणीभूत आहेत. हाडांच्या मजबुतीसाठी ‘ड’ जीवनसत्वाची आवश्यकता असते. पुरेशा ‘ड’ जीवनसत्वामुळे आहारातील कॅल्शियम हाडांपर्यंत पोहोचते.हाडांच्या वाढीची व मजबुतीची सुरुवात आईच्या गर्भातच होते. जन्मापासून ते वयाच्या २५ ते ३५ वर्षांपर्यंत हाडामध्ये जमा होणाऱ्या कॅल्शिअमला पीक बोन मास अथवा हाडांची बँक असे म्हणतात. हीच बँक आपल्या उतारवयात हाडे मजबूत ठेवण्यास मदत करते. मुळातच जर या बँकेची कॅल्शिअमची मर्यादा कमी असेल, तर वयाच्या ३५शीनंतर आॅस्टियोपोरोसिसचा धोका अधिक असतो. जगभरात आॅस्टियोपोरोसिसचे प्रमाण वाढते आहे. मधुमेह, हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार यासारखाच आॅस्टियोपोरोसिस हा आजार आर्थिक बोजा वाढवणारा व तितकाच धोकादायक आजार आहे. म्हणूनच हाडांची काळजी घेणे, कॅल्शिअमयुक्त आहार घेणे, भरपूर व्यायाम करणे या गोष्टी बालवयातच शिकवल्या गेल्या पाहिजेत. आॅस्टियोपोरोसिसचा प्रतिबंध शक्य आहे, पण याची सुरुवात ही बालपणापासूनच व्हायला हवी. पुरेसा कल्शिअमयुक्त आहार जसे दूध, दही, बटर, ताक, नाचणी, फळे, मासे, भरपूर हिरव्या भाज्यांचे सेवन, कडधान्ये व पुरेसा प्रथिनेयुक्त आहार फार महत्त्वाचा! ‘ड’ जीवनसत्व हे भरपूर प्रमाणात उन्हापासून मिळते किंवा ‘ड’ जीवनसत्वाच्या गोळ्याही उपलब्ध आहेत. गरोदरपणात व स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी कॅल्शिअम व ड जीवनसत्वाच्या गोळ्या अवश्य घ्याव्यात. भरभर चालणे, धावणे सायकल चालवणे, पोहणे, जिने चढउतार करणे, यासारखे व्यायाम आपल्या स्नायंूना मजबुती देतात. पुरुषांनीही धूम्रपान, मद्यपान वर्ज्य करावे. या आजाराविषयी अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपले आरोग्य हे आपल्या जीवनशैलीवर अवलंबून आहे आणि आॅस्टियोपोरोसिस हा निरोगी जीवनशैलीने रोखता येतो.कुणाला होऊ शकतो?१) रजोनिवृत्ती२) दोनपेक्षा अधिक वेळा बाळंतपण झालेल्या स्त्रिया३) गरोदरपणात कॅल्शिअमच्या गोळ्या न खाणे४) व्यायामाचा अभाव५) निष्कृष्ट दर्जाचा आहार६) ड जीवनसत्वाची कमतरता७) स्टिटॉइडस, टी. बी. (क्षयरोग), अपस्मार (फीट येणे) मनोविकृतीच्या गोळ्या, यासारख्या औषधांचे सेवन८) धूम्रपान व मद्यपान९) मूत्रपिंड व यकृताचे विकार१0) कर्करोग व तत्सम आजारलक्षणे१) सतत मान, पाठ व कंबर दुखणे२) पाय दुखणे३) पाठीत बाक येणे४) गुडघे दुखणे५) उंची कमी होणे६) मांडीचे वा हाताचे हाड मोडणे७) हातापायात पेटके येणे इत्यादीकुणाला होऊ शकतो?१) रजोनिवृत्ती२) दोनपेक्षा अधिक वेळा बाळंतपण झालेल्या स्त्रिया३) गरोदरपणात कॅल्शिअमच्या गोळ्या न खाणे४) व्यायामाचा अभाव५) निष्कृष्ट दर्जाचा आहार६) ड जीवनसत्वाची कमतरता७) स्टिटॉइडस, टी. बी. (क्षयरोग), अपस्मार (फीट येणे) मनोविकृतीच्या गोळ्या, यासारख्या औषधांचे सेवन८) धूम्रपान व मद्यपान९) मूत्रपिंड व यकृताचे विकार१0) कर्करोग व तत्सम आजार‘आॅस्टियोपोरोसिस’चे निदान पूर्वी या आजाराचे निदान एक्स-रे फिल्मवरून केले जात असे. विशेषत: पाठीच्या व कमरेच्या मणक्याचे फ्रॅक्चर यांचे निदान एक्स-रे वरून होते.डेक्झा स्कॅन : या अद्ययावत मशिनद्वारे हाडांच्या कल्शिअमचे मोजमाप करणे शक्य आहे. या स्कॅनद्वारे कमरेच्या, पाठीच्या मणक्यातील, तसेच मांडीच्या हाडातील कॅल्शिअमद्वारे आॅस्टियोपोरोसिसचे निदान केले जाते, तसेच उपचाराला मिळणारा प्रतिसादही मोजता येतो.उपचार : कॅल्शिअमयुक्त आहार व कॅल्शिअमच्या गोळ्या, ड जीवनसत्वाच्या गोळ्या व इंजेक्शन, हाडांची ठिसूळता रोखणाऱ्या गोळ्या, अ‍ॅलेनड्रोनेट व झोलेनड्रोनेट अ‍ॅसिडचे इंजेक्शन, हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी, हाडे मजबूत करणारी इंजेक्शन, जसे पॅराथॉयराइड हार्मोनची इंजेक्शनस.