शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
2
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
3
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
4
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
5
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
6
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
7
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
8
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
9
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
10
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
11
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
12
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
13
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
14
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
15
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
16
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
17
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
18
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
19
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
20
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
Daily Top 2Weekly Top 5

शंभर वर्षांपूर्वी व आता ...; भविष्यात जीवघेण्या विषाणूचा सामना करण्यासाठी राष्ट्रशक्ती निर्माण होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 06:37 IST

CoronaVirus News : कोरोना प्रतिबंधक लसीच्या कुपी केवळ भारतच नव्हे तर जगाच्याच दरवाजावर टकटक करीत असताना या फैलावाचा सामना भारताने कसा केला, याचे सिंहावलोकन गरजेचे ठरते.

शंभर वर्षांपूर्वी, पहिले महायुद्ध संपता संपता जगभर पसरलेल्या इन्फ्ल्यूएंझा किंवा स्पॅनिश फ्लूच्या महामारीने भारतात पावणेदोन कोटींच्या आसपास बळी घेतले होते. जवळपास ५ टक्के लोकसंख्येचा घास तापाने घेतला होता. ब्रिटिश इंडियातील मृत्यूचे हे प्रमाण जगात सर्वाधिक होते. सार्वजनिक आरोग्य सुविधा जणू नावालादेखील नव्हती. आता शंभर वर्षांनंतर कोविड-१९ विषाणू संसर्गाच्या साथीने त्या आठवणी जाग्या केल्या असल्या तरी लागण, मृत्यू अशा अनेक बाबतीत देश खूप सुधारला, असे म्हणावे लागेल. विज्ञानाची प्रगती लाखो लोकांचे जीव वाचविण्यासाठी सहाय्यभूत ठरली. परवा शनिवारी भारतातील कोविड-१९ रुग्णसंख्येने एक कोटीचा टप्पा ओलांडला. १ लाख ४५ हजार जणांचे जीव गेल्या साडेदहा महिन्यात गेले आहेत, तर तब्बल ९५ लाख लोकांनी या जीवघेण्या विषाणूचा यशस्वी सामना केला, ते बरे होऊन घरी परतले.कोरोना प्रतिबंधक लसीच्या कुपी केवळ भारतच नव्हे तर जगाच्याच दरवाजावर टकटक करीत असताना या फैलावाचा सामना भारताने कसा केला, याचे सिंहावलोकन गरजेचे ठरते. एकतर हा अज्ञात शत्रू कसा,  कुठून हल्ला करील याची अजिबात कल्पना नसल्याने सुरुवातीला सगळेच गोंधळलेले दिसले. एक दिवस जनता कर्फ्यू किंवा तीन आठवड्यांचे लॉकडाऊन पुरेसे ठरेल, असे मानणारे खूप होते. जिथून हा विषाणू जगभर गेला, त्या चीनमधील वुहान शहराने याच मार्गाने त्यावर नियंत्रण मिळवल्याने तसे वाटणे साहजिक होते. पण देशादेशांमधील माणसांचा आहार, आरोग्याची स्थिती आणि रोगप्रतिकारकशक्ती, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेचा दर्जा, वैयक्तिक व सार्वजनिक शिस्त अशा अनेक बाबतीत वेगळेपणामुळे देशादेशांमधील प्रादुर्भावामध्ये फरक पडलेला दिसला. अमेरिकेसारख्या अतिप्रगत देशात जगातील सर्वाधिक पावणेदोन कोटींहून अधिक रुग्ण व तीन लाखांवर बळी नोंदविले गेले. भारताप्रमाणेच टाळ्या-थाळ्या व दिव्यांसारखे चित्रविचित्र प्रकार करणाऱ्या ब्राझीलमध्ये  भयंकर उद्रेक अनुभवायला मिळाला. महामारीच्या पहिल्या टप्प्यात जगाचा थरकाप उडविणाऱ्या इटलीमध्ये जवळपास पाच महिने मृत्युदर चौदा टक्क्यांहून अधिक राहिला. अमेरिका, युरोपमध्ये आधुनिकतेसोबतच जंकफूड व अन्य कारणांनी रोगप्रतिकारकशक्ती प्रचंड खालावल्याचे उघड झाले. परिणामी जगाची रुग्णसंख्या साडेसात कोटींच्या पुढे गेली.  या उलट भारतात कष्टकऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या काटक शरीरांनी विषाणूला जुमानलेच नाही. आपल्याकडील बहुतेक मृत्यू चाळिशी- पन्नाशीच्या पुढच्या वयोगटातील आहेत, हे येथे महत्त्वाचे.  लॉकडाऊनमुळे पोटापाण्याचा गाडा थांबला तेव्हा महाभयंकर पायपीट व उपासमार आणि ‘विषाणू परवडला; पण स्थलांतरित मजूर म्हणून या हालअपेष्टा नकोत’, असे म्हणायची वेळ कष्टकरी वर्गावर आली.  रुग्णसंख्येबाबत बंगळुरू, पुणे, मुंबई, ठाणे व चेन्नई ही शहरे देशात पहिल्या पाच क्रमांकावर आहेत. दिल्लीने तीन लाटांचा  सामना केला आहे. या पार्श्वभूमीवर, एक कोटी रुग्ण संख्येचा टप्पा ओलांडतानाच देशातील कोविड-१९ प्रादुर्भावाची स्थिती झपाट्याने सुधारत असणे खूप दिलासादायक आहे. पहिल्या दहा लाख रुग्णांची नोंद १६८ दिवसांमध्ये झाली होती, तर शेवटच्या ९० लाखांवरून एक कोटीसाठी २९ दिवस लागले. ८० ते ९० लाख हा टप्पा २२ दिवसात गाठला गेला. या उलट सप्टेंबरमध्ये रोज ९० हजारांहून अधिक रुग्ण बाधित होत होते तेव्हा अवघ्या ११ दिवसात ४० ते ५० लाख हा टप्पा गाठला गेला.  अर्थात स्थिती सुधारत असली तरी गाफील राहता येणार नाही. प्रत्येकापर्यंत लस पोहोचण्यासाठी खूप वेळ लागणार आहे. अन्य देशांच्या तुलनेत महामारीचा सामना आपण बऱ्याच यशस्वीपणे केला असला तरी, सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेची स्थिती काही अपवाद वगळता चांगली नाही. रुग्णसंख्या अधिक असली तरी महाराष्ट्र, केरळ आदी प्रगत राज्ये आणि अन्य गरीब राज्ये यांच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठी तफावत आहे. दसरा-दिवाळीच्या काळातील लाटेसारखी नवी मोठी लाट येण्याची शक्यता नाही, असे तज्ज्ञ सांगत असले तरी प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेणे गरजेचे आहे. गेल्या ११ महिन्यांमध्ये व्यवस्थेतील ज्या त्रुटी, दोष उघडे पडले त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्य व केंद्र सरकारनेही कामाला लागायला हवे. ही समज व विज्ञान हातात हात घालून पुढे जात राहिले तरच शंभर वर्षांपूर्वीच्या तुलनेत आता जो विषाणूवर विजय मिळविला आहे, त्याला अर्थ राहील. भविष्यातील अशा संकटाचा सामना करण्यासाठी राष्ट्रशक्ती निर्माण होईल.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या