शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या निमित्ताने

By admin | Updated: July 18, 2016 05:41 IST

तीन आठवडे घालवायचे की एकमेकांची राजकीय धुणी धुण्यासाठी त्यांचा वापर करायचा हे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातून दिसून येईल!

जनतेच्या भल्यासाठी हे तीन आठवडे घालवायचे की एकमेकांची राजकीय धुणी धुण्यासाठी त्यांचा वापर करायचा हे आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनातून दिसून येईल!आजपासून सुरू होणाऱ्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाद्वारे राज्यातल्या ११ कोटी जनतेला काय द्यायचे, याचा निर्णय सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी घ्यायचा आहे. अधिवेशनाचा वापर परस्परांची धुणी धुण्यासाठी करायचा, की राज्याच्या हिताचे विषय घेऊन एकत्रित चर्चेद्वारे मार्ग काढायचे, याचा निर्णय आजच घ्या. राज्यात सर्वत्र दमदार पाऊस झाला आहे. लोक शेतीच्या कामाकडे वळले आहेत. तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत आहात हे पाहण्यास आता त्यांच्याकडे वेळ नाही. येणारे पाच-सहा महिने त्यांना शेती आणि त्यातून येणारे पीक याशिवाय अन्य विषय नाहीत. विरोधकांकडेही अधिवेशनाला सामोरे जाताना नवे विषय नाहीत. पंकजा मुंडेंचा चिक्की घोटाळा, विनोद तावडेंचा अग्निरोधक यंत्रखरेदी घोटाळा, एकनाथ खडसेंचा जमीन घोटाळा, दीपक सावंत यांच्या खात्यात झालेला औषध खरेदी घोटाळा यामुळे सरकारी बाकांवर सगळेच धास्तावलेले आहेत. चांगले केले तर का केले, आणि काहीच केले नाही तर का केले नाही अशी दोहो बाजूने टीका होते, हे पाहून अधिकारीही काम करायला तयार नाहीत. हे वातावरण बदलवण्याची जबाबदारी सत्ताधारी-विरोधक दोघांचीही आहे. चांगल्या कामांना चांगले म्हणावेच लागेल. डोक्यावर घ्यावे लागेल तर राज्यात चांगल्या गोष्टी घडून येतील. अन्यथा एकमेकांची उणीदुणी काढण्याशिवाय काहीच होणार नाही. १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते, त्यावेळी एकदाही शरद पवारांनी पत्रकारांवरील हल्ले रोखण्यासाठी कायदा करण्याची जाहीर भूमिका घेतली नव्हती. मात्र सरकार गेल्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे ते म्हणू लागले. हे असले राजकारण राज्याच्या हिताचे नाही. असो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दहा जणांची टीम मैदानात आणली आहे. त्यात तरुण आहेत. पांडुरंग फुंडकर यांच्यासारखे मुंडेंच्या फळीतले अनुभवी नेतेही आहेत. तीन वेळा खासदार, चार वेळा आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, विरोधी पक्षनेता म्हणून काम पाहिलेल्या फुंडकरांचे नाव मंत्रिमंडळ यादीत मात्र खालच्या नंबरवर आहे. सगळ्यांचा योग्य तो सन्मान ठेवण्याची जबाबदारी सरकारची आहे. यातून कुरबुरी वाढीस लागणार नाहीत, याची काळजी घ्यावी लागेल. पंकजा मुंडे समर्थकांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन करणे, राम शिंदेंनी पंकजा मुंडे यांची भेट होईपर्यंत मंत्रिपद न स्वीकारणे या गोष्टी वरकरणी जरी रागलोभाच्या वाटत असल्या, तरी पक्षाचे अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या किती गंभीरपणे घेतल्या आहेत, याची भनकदेखील राज्यातील अनेक नेत्यांना नाही. त्यामुळे रागलोभ सोडून मिळालेल्या खात्याचा राज्याच्या भल्यासाठी कसा वापर करता येईल, हे दाखवून देण्याच्या मागे जे लागतील, त्यांच्याच मागे पक्षश्रेष्ठी राहतील, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नसावी.राज्य विधिमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक दर्जेदार भाषणे या सभागृहाच्या भिंतींनी ऐकलेली आहेत. विधिमंडळाचे ग्रंथालय अशा अनेक भाषणांच्या पुस्तकांनी भरलेले आहे. मात्र किती आमदार या भाषणांचा अभ्यास करतात, याचा शोध घेतला तर धक्कादायक निष्कर्ष समोर येतील. एकेकाळी सभागृहात अभ्यासू सदस्य बोलायचे, त्यातून कधी चांगल्या तर कधी धक्कादायक बातम्या बाहेर पडायच्या. आता चित्र बदलले आहे. आधी माध्यमांमध्ये बातम्या येतात, नंतर राजकीय नेते सभागृहात बोलतात. हे चित्र बदलायचे असेल तर विरोधी पक्षाने गंभीर झाले पाहिजे. आपण किती गंभीर आहोत, याचे भान येत्या अधिवेशनात जनतेला दिसून येईलच. विधानसभा-विधान परिषद या दोन्हींच्या कामकाजाची तुलना गेल्या काही अधिवेशनापासून होत आहे. धनंजय मुंडे आणि राधाकृष्ण विखे यांच्यातही तुलना होते आहे. त्यातच नारायण राणेंसारखे अनुभवी नेतृत्व परिषदेत आले आहे. राणे विरोधी बाकावर जास्त खुलतात. त्यामुळे माध्यमांमध्येही परिषदेचे कामकाज कव्हर करण्याकडे ओढा दिसू लागला तर आश्चर्य नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्याच्या भल्यासाठी तीन आठवड्याचे अधिवेशन कामी यावे हीच सदिच्छा..!- अतुल कुलकर्णी