शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अब कौन ‘सहारा’?

By admin | Updated: February 7, 2017 23:17 IST

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचे हजारो कोटी रुपये कवड्या मोजून परत करण्याच्या ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांच्या वेळकाढू युक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला हे बरेच झाले.

सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबांचे हजारो कोटी रुपये कवड्या मोजून परत करण्याच्या ‘सहाराश्री’ सुब्रतो रॉय यांच्या वेळकाढू युक्त्यांना सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा दणका दिला हे बरेच झाले. याच सर्वसामान्य लोकांच्या बळावर ‘सहारा’ने आपले साम्राज्य उभे केले आणि नंतर त्यांना वाऱ्यावरही सोडले. करोडो रुपये कमावणाऱ्या आपल्या क्रिकेटपटूंच्या अंगात याच सहाराचे जर्सी कधीकाळी झळकत होते.

जवळपास तीन कोटी लोकांनी पै-पैसा गोळा करून जमवलेल्या या पैशावर सहारांनी नुसता डल्लाच मारला नाही, तर हा पैसा त्यांना परत द्यावा लागू नये यासाठी जमेल त्या साऱ्या कुलंगड्याही त्यांनी केल्या. अजूनही त्यांचे तेच सुरू आहे. पण सर्वोच्च न्यायालयाने लोणावळ्यातील त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट अ‍ॅम्बी व्हॅलीवरच जप्तीचे आदेश दिल्यानंतर सर्वसामान्यांचा सहारा हिरावून घेणाऱ्या ‘सहारा’ परिवाराचे आता धाबे दणाणले आहे. सर्वसामान्य लोकांच्या तब्बल २४ हजार कोटी रुपयांवर सहारांनी डल्ला मारला. १५ टक्के व्याजासह सहारांना ही रक्कम समभागधारकांना द्यावी लागणार असून, ही रक्कम आजच्या घडीला ४८ हजार कोटी इतकी झाली आहे. त्यातील केवळ ११ हजार कोटी रुपयांची रक्कम सहाराने जमा केली आहे. या ४८ हजार कोटी रुपयांतीलही २४ हजार कोटी रुपयांची केवळ मूळ रक्कमच आम्ही जुलै २०१९ पर्यंत भरू शकू, असा हात वर करण्याचा प्रकारही सहारांनी केला.

खरे तर ही सारीच रक्कम एकरकमी भरणे सहज शक्य होते. पण २०१० ला त्यांच्यावर खटला दाखल झाल्यापासून त्यांनी केवळ वेळकाढूपणाच केला. त्याआधी म्हणजे २००८ ते २०११ या कालावधीत सामान्य लोकांनी मोठ्या आशेने त्यांच्याकडे गुंतवलेला पैसा ते आजही वापरत आहेत. सर्वाेच्च न्यायालयाने जप्तीचा आदेश दिलेल्या अ‍ॅम्बी व्हॅली प्रोजेक्टची किंमत ३९ हजार कोटी रुपयांची असल्याचा अंदाज आहे. सहारांच्याच म्हणण्यानुसार या प्रकल्पाची किंमत एक लाख कोटी रुपये आहे. कोणतेही कर्ज व बोजा नसलेल्या अनेक मालमत्ताही सहारांकडे आहेत.

आठवडाभरात या मालमत्तांची यादी द्या, त्या विकून आम्ही भागधारकांचे पैसे चुकवू नाहीतर तुम्हाला पुन्हा जेलची हवा तर खावी लागेलच, शिवाय अ‍ॅम्बी व्हॅलीच आम्ही लिलावात काढू असे न्यायालयाने सुनावले आहे. दरवेळी दोनचारशे कोटी रुपये जमा करून न्यायालयाचा वेळ घेणाऱ्या सहाराला न्यायालयाने आता चांगलाच चाप लावला आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना आपला पैसा त्यातल्यात्यात लवकर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पण प्रत्येक वेळी न्यायालयालाच दंडुका का उगारावा लागतो, आपल्या यंत्रणा त्यावेळी काय करत असतात हा प्रश्न कधी तरी सुटेल का? प्रश्नच आहे..