शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

...आता उमेदवार शोधण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 16:37 IST

मिलिंद कुलकर्णी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने ...

मिलिंद कुलकर्णीलोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकीची चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. भाजप-शिवसेनेने २०१४ च्या कामगिरीची पुनरावृत्ती केल्याने त्यांची स्थिती भक्कम आहे. मोदी लाटेचा लाभ विधानसभा निवडणुकीतही मिळविण्यासाठी दोन्ही पक्षांचे प्रयत्न राहतील. सुमारे अडीच महिने राज्य सरकारच्या हाती असल्याने जनहिताचे, लोकप्रिय निर्णय घेऊन जनमत आणखी आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न केले जातील.प्रश्न काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचा राहील. राष्टÑवादीने महाराष्टÑात गेल्या निवडणुकीप्रमाणेच यंदाही चार जागा जिंकल्या. याउलट काँग्रेसची एक जागा कमी झाली. खान्देशच्यादृष्टीने विचार केला तर पक्षीय ताकद ही नंदुरबार व धुळे जिल्ह्यात चांगली आहे, मात्र जळगाव जिल्ह्यात तशी स्थिती नाही, हे लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी निश्चितीवरुन दिसून आले. राष्टÑवादीचे उमेदवार गुलाबराव देवकर यांचे नाव निश्चित होण्यापूर्वी पक्षाने कितीतरी नावांचा विचार केला होता. काही प्रतिष्ठीतांची नावे माध्यमांमध्ये पोहोचवून जनमानसाचा कानोसा घेण्यात आला होता. रावेरला तर राष्टÑवादीला सक्षम उमेदवार न मिळाल्याने अखेर ही जागा काँग्रेसला द्यायला राजी व्हावे लागले. माजी मंत्री डॉ.सतीश पाटील यांनी पक्ष मेळाव्यात अलीकडे केलेले विधान पक्षस्थितीचे अचूक मूल्यमापन करणारे आहे. या निवडणुकीत नेते व कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले नाही, तर रावेरप्रमाणे जळगावसाठी उमेदवार शोधण्याची वेळ येऊ शकते. कोणी उमेदवारी घ्यायला तयार होणार नाही.दुर्देवाने दोन्ही पक्ष, त्यांचे पक्षश्रेष्ठी, नेते आणि कार्यकर्ते हे अजूनही जुन्या मानसिकतेतून बाहेर पडत नाही. तुमचा प्रतिस्पर्धी हा तगडा, नियोजनपूर्वक वाटचाल करणारा आणि साम, दाम, दंड भेद नीतीचा अवलंब करणारा असताना तुम्ही ऐनवेळी उमेदवार दिल्यानंतर काय निभाव लागणार आहे, याचा विचार करायला हवा. २०१४ ची निवडणूक जिंकल्यानंतर मोदी आणि शहा हे २०१९च्या तयारीला लागले होते. त्यामुळे अशा प्रतिस्पर्धी समोर दोन्ही काँग्रेसला नव्या रणनीतीने सामोरे जावे लागणार आहे.स्थानिक नेते आणि कार्यकर्ते अजूनही सत्ताधीशांच्या मानसिकतेतून बाहेर पडलेले नाही.हे नेते शिक्षण संस्था, सहकारी संस्था यांच्या व्यापात एवढे बुडालेले आहेत, की पक्षासाठी वेळ त्यांच्याकडे नाही. स्वत:ला उमेदवारी मिळाली तरच ही मंडळी सक्रीय होतात, दुसऱ्यासाठी तोंडदेखले काम केले जाते हा अनुभव आहे. शेंदुर्णी नगरपंचायत, जळगाव, धुळे महापालिकेच्या निवडणुका अलिकडे झाल्या; त्यासाठी दोन्ही काँग्रेसने ज्या पध्दतीने काम केले, त्यावरुन हा निष्कर्ष काढावा लागतो. जळगावातील काँग्रेस पक्ष कार्याची स्थिती पाहून पक्ष निरीक्षक अब्दुल सत्तार यांना वैफल्य आले. दुसरीकडे सत्तेत राहण्याची जी सवय लागली आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्थांमध्ये नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेशी तडजोड करुन सत्तेचा वाटा मिळविला आहे. पाच वर्षे विरोधात बसायची कुणाची तयारी नाही, मग पक्ष वाढणार कसा? संयम, प्रतीक्षा हे गुण कालांतराने लाभदायी ठरतात, हा सुविचार आमच्या गावी नाही.हे झाले स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांचे तर पक्षश्रेष्ठींची तºहा वेगळीच आहे. सामान्यांमधून आलेल्या नेतृत्वापेक्षा घराणे, लांगुलचालन करणारे नेते, कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. नेता डोईजड होऊ लागला की, त्याचे पंख कापण्याचे काम केले जाते हा अनुभव खान्देशने वारंवार घेतला आहे. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. काहींनी कुटुंबातील सदस्य भाजप-सेनेत पाठवून संस्थाने सुरक्षित राहण्याची धडपड केली. पक्ष जर पाठीशी खंबीरपणे राहत नसेल तर कोण सत्ताधाऱ्यांशी वैर घेईल, अशी भावना नेते व कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आहे. पक्षाची संघटनात्मक पदे घ्यायला कोणी तयार नाही, उमेदवारी घ्यायला तयार नाही, हे चित्र निर्माण होण्यास पक्षश्रेष्ठी आणि स्थानिक नेते, कार्यकर्ते हे समप्रमाणात जबाबदार आहेत, हे नाकारुन चालणार नाही.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव