शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांवर आता पाण्यासाठी आंदोलनाची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 00:54 IST

मिलिंद कुलकर्णी दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण आता देशभर पसरत असून, ...

मिलिंद कुलकर्णीदिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचे लोण आता देशभर पसरत असून, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवरून थेट आंदोलन करण्याच्या मनोभूमिकेपर्यंत शेतकरी वर्ग आला आहे. नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील बंद असलेल्या २२ उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीसाठी प्रकाशा येथील जलसंघर्ष समितीने जलसमाधी आंदोलन पुकारले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर जरी ते मागे घेतले असले, तरी शेतकरी आश्वासनाविषयी समाधानी नाहीत. कृषी कायद्यांमधील तरतुदी, हमीभाव यासंबंधी देशभरातील शेतकऱ्यांच्या मनात संशय आहे. हा संशय दूर व्हावा, यासाठी केंद्र सरकारने कायदे मंजूर करण्यापूर्वी शेतकऱ्यांशी चर्चा केली नसल्याचा मुख्य आक्षेप आहे. हीच स्थिती या भागातील शेतकऱ्यांची आहे. प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेज पूर्ण होऊन २० वर्षे उलटली, तरी हे पाणी शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. या भागातील २२ उपसा सिंचन योजनांच्या माध्यमातून पाणी उचलण्यात येईल, असे पाटबंधारे विभागातर्फे सांगण्यात आले होते, पण योजना दुरुस्ती आणि योजना चालविणारी मंडळी व पाटबंधारे विभागाच्या मिलीभगत, दुर्लक्ष यामुळे त्या बंद पडल्या आहेत. दोन्ही बंधाऱ्यांमध्ये अथांग जलाशय आहे. त्याचा लाभ शेतकरी घेऊ शकत नाही. तापीमाईचा जन्मोत्सव दरवर्षी साजरा करताना, या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आसवांचे थेंब येतात. तापीमाईविषयी कृतज्ञता असते, शिवाय तिने दिलेले पाणी अडवूनही त्याचा लाभ घेता येत नसल्याचे दु:ख असते. याची कल्पना ना राज्यकर्त्यांना, ना शासकीय यंत्रणांना आहे. दिल्लीच्या सीमेवर ज्याप्रमाणे काटेरी कुंपण, अनेक पदरी अडथळे उभारले गेले आहेत, तशीच मनोभूमिका या ठिकाणच्या राज्यकर्त्यांची आहे. बंधाऱ्यांमधील पाणी शेताच्या बांधापर्यंत जावे, या रास्त मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी आंदोलन करणार म्हटल्यावर प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले. आंदोलन करण्यावर प्रतिबंध लावले. आंदोलक शेतकऱ्यांना नोटिसा दिल्या गेल्या. आंदोलन स्थळाला छावणीचे स्वरूप आले. दिल्ली असो की, प्रकाशात राज्यकर्त्यांची मानसिकता तीच असते, हे पुन्हा अधोरेखित झाले.आता काय पाठपुरावा करणार आहे?केंद्र सरकारने कृषी कायदे घिसाडघाईने लागू केल्याने देशभर गदारोळ उठला. शेतकऱ्यांशी चर्चा करून, विश्वासात घेऊन कायदे आणले असते तर एवढा विरोध झाला नसता. सुरुवातीला केवळ पंजाबमध्ये आंदोलन सुरू होते. दोन महिन्यांनंतर हे आंदोलन दिल्लीच्या सीमेवर आले. पंजाबपाठोपाठ हरियाणा, पश्चिमी उत्तर प्रदेशातील शेतकरी सहभागी झाले. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभाग व पाठिंबा दिला. तेव्हा कुठे सरकार चर्चेला तयार झाले. अकरा फेऱ्या झाल्या, पण सरकार मागे हटायला तयार नाही. कोणतेही सरकार स्वत:ला शेतकरी हितापेक्षा मोठे मानते. दिल्लीप्रमाणे प्रकाशाच्या शेतकऱ्यांना तोच अनुभव आला. उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्ती, देखभाल व पर्यवेक्षणाची जबाबदारी असलेल्या तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी चर्चेत सांगितले की, दुरुस्तीचा प्रस्ताव आम्ही राज्य शासनाकडे सादर केला आहे. आम्ही त्याचा पाठपुरावा करीत आहोत. २० वर्षात उपसा सिंचन योजना दुरुस्त होऊ शकल्या नाहीत, आता कोणत्या प्रकारचा पाठपुरावा केल्याने ही कामे मार्गी लागतील, याचे उत्तर तापी पाटबंधारे विकास महामंडळाचे अधिकारी देणार? की, हेच उत्तर लेखी स्वरूपात देणारे नंदुरबारचे जिल्हाधिकारी देणार? विशेष म्हणजे, खान्देशला दोन जलसंपदामंत्री या काळात मिळाले. एकनाथ खडसे यांच्या काळात हे महामंडळ अस्तित्वात आले. बंधारे तयार झाले, मात्र उपसा सिंचन योजनांचा विषय तसाच प्रलंबित राहिला. गेल्या पंचवार्षिक काळात गिरीश महाजन यांच्याकडे जलंसपदा मंत्रिपद होते. त्यातही नंदुरबारचे पालकमंत्रिपद तीन वर्षे त्यांच्याकडे होते. तरीही हा प्रश्न सुटला नाही. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा विभाग आहे. पुढील आठवड्यात ते परिवार संवाद यात्रेनिमित्त खान्देशात येत आहेत. त्यांनी तरी किमान न्याय द्यावा, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या उफराट्या कारभाराची प्रचिती गेल्या महिन्यात आली. इकडे उपसा सिंचन योजनांच्या दुरुस्तीचा प्रश्न गाजत असताना राज्य सरकारने जळगाव जिल्ह्यातील वरणगाव व तळवेल उपसा सिंचन योजनेला सुधारित प्रशासकीय मान्यता दिली. हतनूर धरणातील पाणी उपसा करून ओझरखेडा येथील मातीच्या धरणात ते साठविणार आहे, असा नवा प्रस्ताव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू समजून घेण्यासाठी शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत हे दिल्ली सीमेवर जातात, पण त्यांना महाराष्ट्रातील प्रकाशा येथील शेतकऱ्यांच्या व्यथा, वेदना दिसत नाही, याला काय म्हणावे. इथून तिथून सारेच एका माळेचे मणी.

टॅग्स :Jalgaonजळगाव